Festive

असा ब्लाऊज शिवल्यास जाड हातही दिसतील बारीक

Aaditi Datar  |  Dec 17, 2019
असा ब्लाऊज शिवल्यास जाड हातही दिसतील बारीक

आपल्यापैकी साडी प्रत्येकीलाच नेसायला आवडते. कारण साडीत तुम्हाला मिळणारा लुक हा अगदी हटके असतो. साडीमुळे तुमचं सौंदर्य खुलून येतं आणि फिगरही छान दिसते. पण ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना मात्र साडी नेसल्यावर थोडी कसरतच करावी लागते. कारण त्यांना पदराने कंबरेला आणि पोटाला कव्हर करावं लागतं. आता कंबरेला तर तुम्ही पदराने झाकून घ्याल पण हाताचं काय करणार. यावर उत्तम उपाय आहे तो म्हणजे ब्लाऊजसोबत काही एक्सपेरिमेंट. आजच्या आर्टिकलमध्ये आम्ही अश्याच काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्या तुम्ही ब्लाऊज खरेदी करताना किंवा शिवून घेताना फॉलो केल्यास तुम्हाला मिळेल परफेक्ट लुक.

वेडिंग सीझनमध्ये बॅकलेस ब्लाऊज किंवा चोळी घालण्याआधी घ्या ही काळजी

ब्लाऊजचं कापड निवडताना नेहमी हलकं फॅब्रिक निवडा. यामुळे तुमचे हात बारीक दिसतील. सिल्क, रेयॉन, कॉटन आणि शिफॉनसारखे फॅब्रिक हेवी हातांना कव्हर करण्यासाठी आहते परफेक्ट ऑप्शन्स. तर जाडसर हात असणाऱ्यांनी कधीच व्हेलवेट, वुलन फॅब्रिकचा वापर करू नये. 

डिझाईन आणि प्रिंटसोबतच स्लीव्ह्सच्या लांबी म्हणजेच लेंथबाबत तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. जर तुमचे हात हेवी असतील तर नेहमी एल्बो लेंथ किंवा क्वार्टर स्लीव्ह्सचे ब्लाऊज शिवण्यास प्राधान्य द्या. स्लीव्हलेस किंवा फुल स्लीव्ह्स घालू नका. कारण यामुळे तुमचे हात अजून हेवी दिसतील. एवढंच नाहीतर बटरफ्लाय किंवा केप स्लीव्ह्स डिझाईनही शिवून घेऊ नका. कारण या पॅटर्नमध्येही तुम्हाला कंफर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटणार नाही.

तुम्हालाही हे वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल ना. पण हे खरं आहे. योग्य रंगाची निवड केल्यास तुम्ही स्लिम दिसू शकता. हेवी दंडाना कव्हर करण्यासाठी नेहमी डार्क कलरचे ब्लाऊज शिवा. 

कोणत्याही आऊटफिटमध्ये परफेक्ट लुकसाठी योग्य फिटींग असणं गरजेचं आहे. जर तुमचा ब्लाऊज जास्त घट्ट असेल तर तुमचा हात जाड असल्याचं दिसून येईल. तर जास्त सैल असल्यासही ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे ब्लाऊजचं फिटींग ना जास्त घट्ट ना जास्त सैल असलं पाहिजे. 

जर तुमचे हात बारीक दिसावे असं तुम्हाला वाटत असेल तर असा ब्लाऊज शिवून घेऊ नका ज्यावर चंकी किंवा जास्त प्रिंट्स असतील. तसंच तुम्ही कधीही आडव्या प्रिंट्सचे ब्लाऊज शिवून घेऊ नका. नेहमी कमी आणि उभ्या प्रिंट्सचे ब्लाऊज घाला. 

हाताच्या दंडाचे फ्लॅब्स कव्हर करण्यासाठी हेवी वर्कचं ब्लाउज घालणं टाळा. हेवी वर्कच्या ब्लाऊजमुळे तुमचे दंड जास्त जाड वाटू शकतात. याऐवजी तुम्ही अशा ब्लाऊज पीसची निवड करा ज्यावर नेकला वर्क केलेलं असेल. यामुळे लोकांचं तुमच्या हाताकडे कमी लक्ष जाईल. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. 

हेही वाचा –

नववधूसाठी बेस्ट ब्रायडल ब्लाऊज डिझाईन्स

टीव्ही सेलिब्रिटी अनिता हसनंदानीचे ’61’ सुंदर आणि स्टाईलिश ब्लाऊज डिझाईन्स

 

Read More From Festive