DIY लाईफ हॅक्स

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

Aaditi Datar  |  Jun 5, 2019
Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

घरातील दैनंदिन वापरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रिज. एका गृहिणी आणि घरच्यांसाठी फ्रिजचं महत्व फार जास्त असतं. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात नाही का? जसा आपण वापर करतो तसंच फ्रिजची साफसफाईही तेवढीच आवश्यक आहे. फ्रिजची साफसफाई आपण सगळेच करतो पण खूप कमी लोकांना फ्रिज योग्य पद्धतीने साफ करण्याची माहिती असते. चला जाणून घेऊया फ्रिजची योग्य साफ-सफाई कशी करावी.

– शिळ्या भाज्या

सर्वात आधी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी नव्या भाज्या खरेदी करण्याआधी फ्रिजमध्ये आधी असलेल्या भाज्या एकदा नक्की पाहून घ्या. फ्रिजमधल्या जुन्या भाज्या संपल्यावरच नवी भाज्या खरेदी करा.  

खाज सुटण्याची कारणे देखील वाचा

– डीफ्रॉस्टिंग

आठवड्यातून एकदा तरी फ्रिज डीफ्रॉस्ट नक्की करा. असं नाही केलं तर फ्रिजचं सगळं कूलिंग फक्त फ्रिजर पुरतं राहील. डीफ्रॉस्ट केल्याने फ्रिजचं कूलिंग बॅलन्स राहतं.

– फ्रिजमधल्या गोष्टी झाकून ठेवा

फ्रिजमध्ये उरलेलं जेवण किंवा एखादा पदार्थ ठेवायचा असल्यास तो नेहमी झाकूनच ठेवा. पदार्थ झाकून ठेवल्याने फ्रिजमध्ये कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही. तसंच भाज्यांमधील पोषक तत्त्वंही कायम राहतील. अनेकवेळा उन्हाळ्यात लाईट गेल्यावर फ्रिजरमधून पाणी गळतं. जर तुम्ही पदार्थ आणि भाज्या नीट झाकून ठेवल्यास ते पाणी भाज्या आणि दूध-दह्यात पडणार नाही.

– नियमितपणे करा स्वच्छता

बरेचदा रोजच्या धावपळीत आपण फ्रिजची साफसफाई करायला विसरतो. पण फ्रिजची स्वच्छताही किमान दर 15 दिवसांनी केलीच पाहिजे. जास्तकरून जर तुम्ही फ्रिजमध्ये मासांहारी पदार्थ ठेवत असल्यास वेळोवेळी स्वच्छता करणं खूपच गरजेचं आहे.  

वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टीप्स

– एक टेबलस्पून बेकिंग सोड्यात लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करून घ्या. फ्रिज रिकामा करून घ्या. एका स्पाँजवर हे मिश्रण घेऊन ते फ्रिजमध्ये नीट लावून घ्या. 5 ते 10 मिनिट तसंच राहू द्या. मग ओल्या कपड्याने ते स्वच्छ पुसून घ्या. फ्रिजमधला सगळा वास नाहीसा होईल.

– कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने फ्रिज साफ करा. फ्रिज साफ करून झाल्यावर किमान 15 ते 20 मिनिटं फ्रिजचा दरवाजा उघडा ठेवा.

– प्रयत्न करा की, शक्यतो फ्रिजमध्ये उरलेले पदार्थ ठेवावे लागू नये किंवा ठेवल्यास जास्त दिवस राहू देऊ नका. जेव्हा उरलेला पदार्थ फ्रिजमध्ये ठेवाल तेव्हा आठवणीने तो झाकून ठेवा. नाहीतर पूर्ण फ्रिजमध्ये त्याचा वास पसरेल.

– लक्षात ठेवा की, फ्रिजची साफसफाई करताना खाण्यापिण्याचा कोणताही पदार्थ त्यात राहू नये. तसंच फ्रिजचा मेन स्वीचही ऑफ केलेला असावा.

जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर या ’20’ किचन ट्रीक्स आणि टीप्स नक्कीच उपयोगी पडतील 

– अनेकदा फ्रिजरमध्ये जास्त बर्फ जमा झाल्यावर महिला तो बर्फ काढण्यासाठी चाकूचा वापर करतात. पण असं केल्यास फ्रिजचं नुकसान होऊ शकतं किंवा तुम्हालाही इजा होऊ शकते. चाकूऐवजी बर्फ काढण्यासाठी वापर करा वर्तमानपत्राचा.

तसंच सर्वात शेवटी सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रिज कोणत्याही जास्त वजन असलेल्या गोष्टी ठेऊ नका.

You Might Like These:

उन्हाळ्यात जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज

आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स

उंदीर मारण्याचे घरगुती उपाय (Home Remedies To Get Rid Of Rats)

Read More From DIY लाईफ हॅक्स