Weight Loss

बेली फॅट नियंत्रणात आणून परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

Dipali Naphade  |  Nov 26, 2018
बेली फॅट नियंत्रणात आणून परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

तुमचं वाढतं पोट अर्थात ढेरी शरीरासाठी खूपच मोठ्या समस्या घेऊन येत असते. तसंच तुमच्या लुक्समध्येही ही वाढती ढेरी अर्थात बेली खूपच खराब दिसते. बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या समस्यांमुळं तुमची बेली वाढू लागते आणि तुमच्या संपूर्ण शरीराला बेढब बनवते. लहान असो वा मोठी तुमचे बेली फॅट्स कमी करणं हे सर्वात कठीण काम आहे. ही चरबी घटवण्यासाठी तुम्ही जिम, योगा, अॅरोबिक्स करा अथवा जॉगिंग करा मात्र व्यायाम सोडला की, पुन्हा एकदा चरबी जमायला सुरुवात होते. पोटावर वाढणारी ही चरबी तुम्हाला हृदयरोगाशिवाय मधुमेह आणि डिमेंशिया असे आजारही देते. यासाठी तुमचे बेली फॅट्स सतत बर्न करत राहणं आणि वेटलॉस करून आपलं शरीर योग्य आकारात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात बेली फॅट नियंत्रणात आणण्यासाठी सोपे उपाय सांगणार आहोत.

लिंबू अतिशय फायदेशीर
लिंबू हे विटामिन सी आणि अँटीअॉक्सिडंट्सचा एक महत्त्वाचा स्रोत आहे आणि शरीराला यामुळं बऱ्याच तऱ्हेने फायदा होत असतो. नेहमी लिंबू पाणी पित राहिल्यास, वजन कमी होतं, तसंच एक्स्ट्रा कॅलरी बर्न होते आणि तुम्हाला काम करण्यासाठी अधिक ऊर्जादेखील मिळते. तसंच लिंबामुळं तुमची पचनशक्ती सुधारते आणि तुमचं शरीर सुडौल राहण्यासाठी मदत होते. लिंबू पाणी पित राहिल्यामुळं तुमचं यकृतही योग्यरित्या काम करतं आणि तुमची पचनक्रिया योग्य राहण्यासाठी मदत होते.

शरीरासाठी लिंबाचा फायदा  
बऱ्याचदा आपलं शरीर जेवणातील हवी असलेली पोषक तत्व योग्य तऱ्हेने शोषून घेत नाही आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्व कमी होतात. या कमतरतेमुळे बेली फॅट्स वाढू लागतात. लिंबू हे एक असं फळ आहे ज्यामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणामध्ये असतं. विटामिन सी आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारी पोषक तत्व योग्य प्रकारे शोषून घेण्यासाठी मदत करत असतं. हेच कारण आहे की, लिंबू वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. विटामिन सी व्यतिरिक्त लिंबामध्ये मॅग्नेशियम, सायट्रिक अॅसिडदेखील असतं जे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे.

लिंबू पाण्याचा योग्य उपयोग कसा करावा

जर तुम्ही खरचं बेली फॅट कमी करण्यास इच्छुक असला, तर त्यासाठी रोज सकाळी सकाळी एक ग्लास गरम पाण्ययात अर्ध लिंबू पिळून उपाशी पोटी नक्की प्या. तुम्हाला हवं असल्यास, यामध्ये तुम्ही मधदेखील घालू शकता. हा फॉर्म्युला बेली फॅट कमी करण्यासाठीच नाही तर तुमच्यामध्ये ऊर्जा आणण्यासाठी, तुमची त्वचा उजळ बनवण्यासाठी आणि तुमची फिगर परफेक्ट बनवण्यासाठी योग्य आहे. मात्र लक्षात ठेवा, हे लिंबू पाणी कमीत कमी सहा महिने रोज प्यायला हवे तरच तुम्हाला फरक जाणवेल. जर तुमच्या शरीराला लिंबू पाणी योग्य असेल तर कायमस्वरूपी हे पित राहावे. काही दिवसातच तुम्हाला चांगल्या कॉम्प्लिमेंट्स मिळू लागतील.

You Might Like This:

Home Remedies For Weight Loss In Marathi

Read More From Weight Loss