डाळ अथवा कडधान्य रात्रभर भिजत ठेवलं तर ते चांगलं फुगतं आणि लवकर शिजतं. म्हणूनच जर दुसऱ्या दिवशी डाळ अथवा कडधान्याची भाजी बनवायची असेल तर ते आदल्या दिवशी रात्री भिजत घालतात. राजमा, चवळी, छोले असे कडधान्य लवकर शिजत नसल्यामुळे ते रात्रीच भिजत घालावे लागतात. पण जर एखाद्या दिवशी तुम्ही चुकून डाळ अथवा कडधान्य भिजत घालायला रात्री विसरला तर काहीच हरकत नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही लगेच डाळ अथवा कडधान्य शिजवू शकता. फॉलो करा या टिप्स…सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi, चटपटीत आणि स्वादिष्ट राजमा रेसिपीज (Rajma Recipe In Marathi),
डाळ शिजवण्यासाठी
मूगडाळ अथवा मसूरडाळ अशा डाळी लगेच शिजतात. त्यामुळे त्या फार काळ भिजत ठेवण्याची गरज नसते. पण जर तुम्हाला चणाडाळ शिजवायची असेल तर ती काही वेळ भिजत ठेवावी लागते. जर तुम्ही चणाडाळ भिजत घालायला विसरला तर लगेच कोमट पाण्यात मीठ घालून त्यात मिनीट भिजत ठेवून तुम्ही चणाडाळ शिजवू शकता. मात्र हा नियम कडधान्यांना लागू पडत नाही. कडधान्य न भिजवता लगेच शिजत नाही यासाठी खालील टिप्स फॉलो करा.
बेकिंग सोडा आणि मीठ
अनेक महिला कडधान्य पटकन शिजण्यासाठी ही टिप फॉलो करत असतीलच. पण जर नसेल माहीत तर नक्की वापरा. कारण यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो. बेकिंग सोडा आणि मीठ टाकून शिजल्यामुळे राजमा, छोले सारखे कडधान्यही सहज शिजून नरम होतात. कुकरच्या फक्त तीन शिट्या द्या आणि गरमागरम भाजी, डाळ तयार… तसंच वाचा बेकिंग सोड्याचे हे ‘25’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का (Benefits Of Baking Soda In Marathi)
इनो टाकून भिजवा
आजकाल अनेकांना पोटाच्या समस्या असतात त्यामुळे घरात इनो असतोच. जर तुम्ही रात्री कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर काळजी करू नका कडधान्य कोमट पाण्यात भिजत घाला आणि त्यात इनो मिसळा. तीस मीनिटांमध्ये कडधान्य चांगलं फुगेल. त्यानंतर तुम्ही कुकरमध्ये भाजी बनवू शकता.
डाळ अथवा कडधान्य आयत्या वेळी शिजवण्यासाठी सोप्या टिप्स
डाळ आणि कडधान्य न भिजत घालता आयत्या वेळी शिजवताना या गोष्टी ठेवा लक्षात
- डाळ अखवा कडधान्य नेहमी कुकरमध्ये शिजवा, पातेल्यात नाही
- कडधान्य उकडताना त्यात चमचाभर तेल मिसळा म्हणजे ते अति शिजून नरम पडणार नाही
- कडधान्य शिजवताना ते सारखं सारखं ढवळू नका, नाहीतर ते नीट शिजणार नाही
- शिजताना बेकिंग सोड्यासोबत चिमुटभर हळद कडधान्यामध्ये मिसळा ज्यामुळे भाजीला छान चव येईल आणि कडधान्य लवकर शिजेल
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक