लहान मुलं फारच हुशार आणि चिकित्सक असतात. आजूबाजूच्या जगाविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत असतात. अशावेळी त्यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवता येत नाही. शिवाय वेळच्या वेळी त्यांना जर योग्य आणि अचूक उत्तरे मिळाली नाहीत तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर विपरित परिणाम देखील होऊ शकतो. यासाठीच पालकांनी कौशल्याने आपल्या मुलांसोबत संवाद साधणं अपेक्षित असतं. आजची लहान मुलं उद्याचे नागरिक असणार आहेत यासाठी आताच त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचा संस्कार करणं गरजेचं आहे. जसं आपल्खया देशात होऊन गेलेले महान नेते उदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी. गांधीसारखे प्रेरणादायी विचार मुलांच्या मनात रूजवण आवश्यक आहे आणि खरंतर राष्ट्रभक्तीचा संस्कार हा मनापासून व्हायला हवा. लहान वयातच मुलांची मनं राष्ट्रभक्तीने भारून गेली तर मोठेपणी ते सुजाण नागरिक नक्कीच होतील. मग यंदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्याआधी मुलांसाठी फॉलो करा या सोप्या टिप्स.
त्यांना राष्ट्रध्वजाचा आदर करण्यास शिकवा –
लहान मुलांना योग्य वयातच त्यांचे राष्ट्र आणि राष्ट्रध्वज याविषयी योग्य ज्ञान असायला हवे. यासाठी त्यांना वेळीच आपल्या राष्ट्रध्वज, राष्ट्रध्वजाचे रंग, रचना याविषयी माहिती द्या. शिवाय राष्ट्रध्वजाचा मान कसा राखायचा हे ही शिकवा. कारण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला सर्व मुलं शाळेत जातात हे दिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात, मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभाग घेतात, राष्ट्रध्वज घरी आणतात. मात्र त्यानंतर ते राष्ट्रध्वजाचा तितकाच मान ठेवतात का हे आवर्जुन पाहा आणि त्यांना ते करण्यासाठी शिकवा.
मुलांना देशासाठी लढलेल्या महान नेत्यांविषयी माहिती द्या –
भारत भूमीच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक महान नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र आता स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनंतर आपल्याला त्याचा विसर पडू लागला आहे. स्वातंत्र्यवीरांचे हे बलिदान फुकट जाता कामा नये यासाठी तुमच्या मुलांना याविषयी योग्य माहिती द्या. या स्वातंत्र्यवीरांच्या जंयती आाणि पुण्यतिथीला मुलांना त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवा. ज्यामुळे तुमची मुलं मोठी होतील तेव्हा ती भारतभूमीचे खरे सुपूत्र म्हणून जगण्यास पात्र ठरतील. यासाठी तुमच्या मुलांना शिकवा गांधीजीचे अहिंसा विचार आणि गांधीचे सर्वोत्तम विचार. कारण गांधीजीचे हे विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील.
Shutterstock
राष्ट्रीय सुट्या का असतात ते त्यांना समजवा –
वर्षभरात अनेक राष्ट्रीय सुट्ट्या येतात. ज्या मुलांना फक्त शाळेला सुट्टी म्हणून माहीत असतात. या दिवशी शाळेत न जाता घराबाहेर फिरता येतं, हवं तसं वागता येतं असं त्यांना वाटत असतं. मात्र जर तुम्ही त्यांना या सुट्ट्या असण्यामागचं कारण पटवून देऊ शकता. या दिवशी खेळता खेळता कमीत कमी त्यांना त्या दिवसाचं महत्त्व तरी समजावून सांगा. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी घरातील सर्वांनी मिळून तो दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करा. जसं की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती असे दिवस जर तुम्ही घरात आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन साजरे केले तर मुलांच्या मनात आपोआप राष्ट्रभक्ती निर्माण होईल.
मुलांसोबत राष्ट्रभक्तीवर आधारित अॅक्टिव्हिटीमध्ये सहभाग घ्या –
जेव्हा तुम्ही मुलांना एखादा खेळ अथवा व्हिडिओ गेम गिफ्ट करता तेव्हा त्यांचं फक्त मनोरंजन होतं. मात्र जर तुम्ही तुमच्या मुलांना राष्ट्रभक्तीवर एखादा सिनेमा दाखवला, त्यांच्यासोबत एखाद्या नेत्याचं आत्मचरित्र वाचलं अथवा मुलांना समजेल असं एखादं पुस्तक, व्हिडिओ त्यांना गिफ्ट केला तर त्यांना याविषयाचं महत्त्व समजू लागेल.
Also Read – Marathi Patriotic Movies
मुलांना स्वच्छता आणि राष्ट्रीय मालमत्तेचे रक्षण करण्यास शिकवा –
राष्ट्रप्रेम म्हणजे फक्त राष्ट्रपर गीत गाणं अथवा भाषण देणं नक्कीच नाही. आपलं घर, शहर, राष्ट्र यांची स्वच्छता राखणं, राष्ट्राच्या सुरक्षेचे नियम न मोडणं, बिना टिकीट प्रवास न करणं, राष्ट्रीय मालमत्तेची काळजी घेणं अशा अनेक गोष्टी करून तुम्ही त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीचं बीज पेरू शकता. मात्र यासाठी या गोष्टी तुम्ही त्यांच्यासोबत करायला हव्या. कारण मुलं तुमच्या बोलण्यापेक्षा तुमचं आचरण सतत पाहात असतात आणि त्यातून नवनवीन गोष्टी शिकत असतात. मुलांसाठी त्यांचे पालक हेच आदर्श असतात. म्हणूनच तुमच्या मनातील राष्ट्रभक्ती तुमच्या मुलांमध्ये तुमच्या वागण्या-बोलण्यातून रुजत जाते.
Also Read – Marathi Patriotic Songs
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि शुभेच्छा संदेश
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade