नाती जपण्यासाठी अथवा कामानिमित्त तुम्हाला अनेकदा नको त्या लोकांशी संवाद साधावा लागतो. कधी कधी तर काही लोक असे असतात जे विनाकारण तुमच्यासोबत अर्धा ते एक तास बोलत बसतात. तुम्ही घाईत असता मात्र समोरची व्यक्ती तुमच्यासोबत खूप वेळ बोलण्याच्या मूडमध्ये असते. इकडच्या तिकडच्या बिन कामाच्या गप्पा मारणं काही लोकांचा स्वभावच असतो. अशा गप्पा ऐकून तुम्हाला तो कॉल कट करावा अशी खूप इच्छा होते मात्र तुम्ही तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगूही शकत नाही. त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की अशा लोकांसोबत कसं बोलावं ज्यामुळे ते स्वतःहून फोन कट करतील. मात्र हे बोलताना समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही याची काळजीदेखील घ्यावी लागते. नाहीतर एका संवादामुळे तुमचे नातेसंबध कायमचे बिघडू शकतात. यासाठीच या टिप्स फॉलो करा ज्यामुळे तुमचं नातंही टिकेल आणि तुम्हाला सहज फोन कट करता येईल.
ऑफिसमधून फोन आला आहे असं सांगा –
कोरोनामुळे सध्या अनेक लोक घरातून काम करत आहेत. त्यामुळे नात्यातील मंडळी तुम्ही फ्रीच असाल अशा प्रकारे फोनवर बोलत असतात. कधी कधी कामातून वेळ काढून नातेवाईकांशी बोलण्यास काहीच हरकत नाही. मात्र एखादी व्यक्ती खूप वेळ तुमच्यासोबत बिनकामाच्या गप्पा मारत असेल आणि त्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर त्यांना तुमच्या ऑफिसमधून कॉल येत आहे अशी थाप मारा. ऑफिस काम सर्वात महत्त्वाचं आहे हे सर्वांना माहीत असतंच. ज्यामुळे समोरची व्यक्ती स्वतःहून बोलणं थांबवून फोन कट करेल. एखाद्या चिपकू आणि कंटाळवाणा कॉल कट करण्याचा हा एक चांगला बहाणा आहे. ज्यामुळे त्या व्यक्तीला तुमचा रागही येणार नाही.
व्हिडिओ कॉल अथवा ऑनलाईन मिटिंगचा बहाणा करा –
जर तुम्हाला ऑफिसचं काम आहे असं सांगूनही ती व्यक्ती ऐकेल असं वाटत नसेल तर तुम्हाला ऑफिसची व्हिडिओ कॉलवर मिटिंग अटेंड करायची आहे असं सांगा. ज्यामुळे त्यांना खरंच वाटेल की आता बोलणं थांबवणं गरजेचं आहे. कारण मिटिंगसाठी तुम्हाला आणखी काही गोष्टींची तयारी करावी लागेल याची त्यांना कल्पना येईल आणि नंतर बोलू असं म्हणत ते स्वतःहून तुमचा कॉल कट करतील.
बॅटरी लो झाल्याची युक्ती वापरा –
बॅटरी लो झाल्याचा बहाणा नेहमीच कॉल कट करण्यासाठी वापरला जातो. जर तुम्ही एखाद्या बोअर व्यक्तीसोबत खूप वेळ बोलत असाल आणि आता तुम्हाला तुमची महत्त्वाची कामे करायची असतील तर बिनधास्त हा बहाणा करा. तुम्ही त्यांना सांगू शकता की माझ्या फोनची बॅटरी अगदी पाच ते दहा टक्के उरली आहे. ज्यामुळे मला नीट ऐकू येत नाही आहे. फोन चार्ज केल्याशिवाय मला बोलता येणार नाही. मी बाहेर असल्यामुळे मला लगेच फोन चार्ज करता येणार नाही त्यामुळे मी नंतर फोन करेन. असं सांगितल्यामुळे समोरची व्यक्ती न रागावता तुमचा फोन कट करेल.
नेटवर्क इश्यू आहे असं सांगा –
नेटवर्क लो असेल तर बऱ्याचदा फोन कट होतो किंवा नीट बोलता येत नाही. पण हा बहाणा तुम्ही एखादा कंटाळवाणा कॉल कट करण्यासाठी वापरू शकता. अशा फोन कॉलवर थोड्यावेळ बोलल्यानंततर तुम्ही त्यांना तुमचा आवाज नीट ऐकू येत नाही कारण तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे असं सांगू शकता. नीट ऐकू येत नाही असा बहाणा एकादा कंटाळवाणा कॉल कट करण्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. ज्यामुळे कोणी दुखावलं जात नाही.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
असे स्वच्छ करा फोन कव्हर्स, इअरफोन आणि चार्जिंग कॉड
पॉवरबॅंक जवळ नसेल तर या टिप्सने जास्त काळ टिकवा तुमच्या फोनची बॅटरी
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade