DIY लाईफ हॅक्स

केसांना, बुटांना आणि कपड्यांना च्युईंगम लागल्यास कसे काढावे

Dipali Naphade  |  Aug 7, 2020
केसांना, बुटांना आणि कपड्यांना च्युईंगम लागल्यास कसे काढावे

च्युईंगम चघळायची बऱ्याच जणांना सवय आणि आवड असते. यामुळे तोंडाला येणारा दुर्गंध कमी होतो तसंच चेहऱ्याच्या मसल्सचा व्यायामही होतो. या गोष्टीसाठी च्युईंगम चावत राहणं चांगलं असलं तरीही च्युईंगम जेव्हा फेकायचं असतं तेव्हा अतिशय सावधानता बाळगावी लागते. कारण च्युईंगम जर कपड्याला अथवा केसाला चिकटलं तर ते काढणं अत्यंत कठीण होतं. यामुळे डोक्याचा ताप अधिक वाढतो. च्युईंगम केसाला चिकटलं तर केसांचा तितका भाग कापून टाकावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होते. कारण एकदा चिकटलेलं च्युईंगम सहजासहजी निघत नाही. पण असं करण्यापेक्षा आता काही सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही चिकटलेलं च्युईंगम काढून टाकू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज भासणार नाही. तसंच तुम्हाला जास्त काळजीही करावी लागणार नाही आणि घाबरून जाण्याची अजिबातच गरज नाही. या सोप्या टिप्स कोणत्या आहेत ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्हीही या टिप्सचा वापर करून नक्की पाहा  आणि त्याचा तुम्हाला फायदा होतोय की नाही हे आम्हाला कळवा. च्युईंगम काढण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींचा उपयोग करून घेता येतो  पाहूया. 

व्हिनेगर

Shutterstock

च्युईंग काढण्यासाठी तुम्ही घरातील व्हिनेगरचा वापर करू शकता. आजकाल चायनीज बनविण्याच्या निमित्ताने व्हिनेगर हे प्रत्येकाच्या घरात असतंच. जर तुमच्या कपड्याला अथवा केसाला च्युईंगम चिकटलं तर तुम्ही व्हिनेगरचा वापर करा. आता याचा वापर कसा करायचा असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे वापरणंही अतिशय सोपं आहे. व्हिनेगर वापरण्याच्या एक मिनिट आधी साधारण मायक्रोव्हेवमध्ये गरम करून घ्या. आता ज्या जागी च्युईंगम चिकटलं आहे तिथे हे व्हिनेगर लावा आणि काही वेळ तसंच ठेवा. थोड्या वेळानंंतर टूथब्रशने हे रगडा. च्युईंगम सहजपणाने निघून येतं. तुम्हाला च्युईंगम ओढून काढायची गरज भासणार नाही. 

पीनट बटर

Shutterstock

पीनट बटर वाचून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटलं असेल. कारण आतापर्यंत याचा खाण्याचा उपयोग आपल्याला माहीत होता. पण जर तुमच्या केसांना च्युईंगम चिकटलं असेल तर तुम्ही तुमच्या हातांना थोडंसं पीनट बटर लावा आणि मग ते केसांना च्युईंगम लागलेल्या ठिकाणी लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने केस धुवा. च्युईंगम कोणत्याही त्रासाशिवाय तुम्हाला काढता येईल. केसांमधून च्युईंगम अशा पद्धतीने पीनट बटरचा वापर केल्यास, सहजपणाने निघून जाते. यानंतर च्युईंगम केसांना चिकटल्यास, तुम्हाला केस कापण्याची गरज आता भासणार नाही.  हा सोपा उपाय करून तुम्ही पटकन च्युईंगम काढू शकता. 

भाताच्या पेजेचा करा आरोग्यासाठी उपयोग, वाढवा ऊर्जा

मेयोनीज

Shutterstock

मेयोनीजचा वापर करूनही तुम्ही अगदी सहजपणाने च्युईंगम काढून टाकू शकता. बस थोडंसं मेयोनीज तुम्ही तुमच्या हातावर घ्या आणि च्युईंगम चिकटलं असेल त्या ठिकाणी तुम्ही मेयोनीज लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. काही वेळ मसाज करून झाल्यावर तसंच राहू द्या. नंतर तुम्ही बोटांच्या मदतीने अथवा कंगव्याच्या मदतीने केसांना च्युईंगम लागलं असेल तर काढा आणि मग पाण्याने केस धुऊन टाका. कपड्यांना लागलं असेल तर बोटांच्या मदतीने हे लगेच निघू शकेल. तुम्हाला अजिबात च्युईंगमचा कणही कपड्यांवर दिसणार नाही अथवा केसांवर राहणार नाही. 

लॉकडाऊनमध्ये गळू लागलेत केस,त्वचाही झाली निस्तेज तर मग नक्की वाचा

बर्फ

Shutterstock

बर्फाच्या मदतीने तुम्ही केसांना लागलेलेच नाही तर कपड्यांना, कारपेट, चप्पलला लागलेले च्युईंगमदेखील अगदी सहजपणाने काढू शकता. याचा वापर करताना तुम्ही एक बर्फाचा तुकडा कपड्यात गुंडाळा आणि आपल्या केसांवर रगडा. अशा तऱ्हेनेच तुम्ही ज्या ठिकाणी च्युईंगम लागले आहे तिथे रगडून च्युईंगम काढू शकता. बर्फाच्या वापराने च्युईंगम टणक होते आणि मग तुम्ही ते एखाद्या स्टीकरप्रमाणे काढू शकता.

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

हेअर ड्रायर

Shutterstock

ज्या कपड्याला च्युईंगम चिकटले आहे त्यासमोर तुम्ही हेअर ड्रायर ठेवा. गरम हवेमुळे च्युईंगची पकड सैल होते. फक्त असं करताना कपडा जळणार नाही याची काळजी घ्या.  कपड्याबरोबरच तुम्ही हाताचीही काळजी घ्या. सिल्कच्या कपड्यावर असा प्रयोग अजिबात करू नका. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From DIY लाईफ हॅक्स