DIY सौंदर्य

डबल चिनमुळे चेहरा जाड दिसत असेल, तर फॉलो करो सोप्या टिप्स

Dipali Naphade  |  Oct 6, 2021
double chin exercise

डबल चिनचीची समस्या साधारणतः वय वाढ अथवा अनुवंशिकतेचा परिणाम म्हणून सुरू होऊ शकते. वास्तविक याचा वजन वाढण्यासाठीही काहीही संबंध नाही. पण काही जणांच्या बाबतीत वजन वाढल्यामुळेही ही समस्या होताना दिसून येते. काही महिला या मेकअप अथवा अन्य उत्पादनांच्या मदतीने चीकबोन्स वाढवून अथवा मुख्य जॉलाईन मेकअपने झाकून डबल चिन (Double Chin) लवपतात. पण तुम्हाला डबल चिनमुळे चेहरा जाड बघण्याचा कंटाळा आलाय आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने हे कमी करता येते असं सांगितलं तर? आमच्याजवळ यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. या लेखातून त्या तुम्ही जाणून घ्या. शरीराचा व्यायाम आणि मनासाठी योग हे तुम्ही नेहमीच ऐकलं आहे आणि तुम्ही त्याचा वापरही करत असाल. पण तुम्ही चेहऱ्याच्या व्यायामाबाबत काही ऐकलं आहे का? चेहऱ्याच्या व्यायामाने केवळ रक्तप्रवाह चांगला होतो असं नाही तर चेहऱ्यावरील फॅट आणि सुरकुत्या घालविण्यासाठीही याचा उपयोग होतो. तसंच तुम्हाला तरूण दिसण्यासाठी याचा फायदा होतो आणि चेहऱ्यावरील अधिक चरबी निघण्यास मदत होते. आम्ही काही काही चेहऱ्याचे व्यायाम देत आहोत जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून घ्या आणि चेहऱ्यावरील डबल चिन हटवा. तसंच सोप्या मसाजचाही उपयोग होतो.

वॉर्मअप च्युइंग एक्सरसाईज (Warmup Chewing Gum Exercise)

सर्वात सोपा आणि सुविधाजनक असणारा असा व्यायाम. जो तुम्ही कुठेही आणि केव्हाही करू शकता. च्युईंगम हा एक चांगला व्यायाम आहे. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल. पण तुम्ही योग्य वाचत आहात. च्युईंगम चघळताना तुमच्या हनुवटीच्या मसल्सची गती कायम चालू राहते, ज्यामुळे अधिक आलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते. हनुवटी वर होऊन जबड्याच्या मसल्स अधिक मजबूत करण्यसाठी याचा फायदा होतो. 

पाऊट एक्सरसाईज (Pout Exercise)

आपण फोटो काढताना अनेक पाऊट करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, डबल चिनपासून सुटका मिळविण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो. तुम्हाला पाऊट करण्यात जर महारथ प्राप्त झाली असेल तर तुम्ही फिश फेस व्यायाम (Fish Face Exercise) करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकता. तुम्हाला गाल आतल्या बाजूला घ्यायचे आहेत आणि काही सेकंद तसंच ठेवावे लागतील. त्यानंतर एक ब्रेक घ्या आणि पुन्हा असचं करा. यामुळे हनुवटीवरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. तसंच चेहऱ्यावर तजेलदारपणा येतो. 

बॉल एक्सरसाईज (Ball Exercise)

टेनिस बॉलच्या मदतीने तुम्ही डबल चिन कमी करू शकता. या बॉल एक्सरसाईजमध्ये तुम्हाला बॉल हनुवटीखाली ठेवायचा आहे आणि आता हळूहळू बॉल दाबत एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे असं करत न्यायचा आहे. असं किमान 15-20 वेळा तुम्ही करू शकता. 

जीभेचा व्यायाम (Tongue Exercise)

जिभेचा व्यायाम करताना तुम्हाला जिभेच्या मसल्सचा वापर करावा लागतो. तुम्ही डोकं सरळ ठेवा आणि मग जीभ पुढच्या बाजूला काढून पुढे घ्या. आता तुमची जीभ नाकाच्या दिशेने वर घ्या. काही सेकंद थांबा आणि मग पुन्हा हा व्यायाम करा. यामुळे चेहरा ताणला जातो आणि त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

स्माईल एक्सरसाईज (Smile Exercise)

आपण दिवसातून खूप वेळा हसतो. पण यामुळे डबल चिन कमी होते असं तुम्हाला वाटतं का? तर याचं उत्तर हो असं आहे. तुम्हाला केवळ इतकंच करायचं आहे की, तुम्हाला तुमचं तोंड बंद ठेवायचं आहे आणि दात घट्ट मिटून ठेवायचे आहे. त्यानंतर ओठांचे कोपरे जितके ताणता येतील तितके ताणायचे आहेत. त्यानंतर तुम्ही तुमची जीभ टाळ्याला लावा. तुमच्या हनुवटीला ताण जाणवायला हवा. काही सेकंद थांबा आणि मग सोडा. असे किमान 4-5 वेळा करा. 

वजन कमी करायला जसा वेळ लागतो. तसंच तुम्ही हे व्यायाम करत राहाल तर तुमची डबल चिन कमी होईल. यासाठी थोडा वेळ लागेल. काही दिवसानंतर तुम्हाला बदल दिसून येईल. त्यामुळे आज चालू केलं आणि उद्या कमी झालं असं होणार नाही. थोड्या दिवसांनंतर तुम्हाला यातील फरक जाणवतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य