DIY सौंदर्य

शॅम्पू केल्यावरही लगेच केस होत असतील तेलकट तर करा हे उपाय

Trupti Paradkar  |  Sep 7, 2021
How to get rid of oily hair scalp home remedies

पावसाळ्यात जितक्या आरोग्य समस्या जाणवतात तितक्याच सौंदर्य समस्या जाणवतात. पावसाळ्यात तुम्ही केस कितीही वेळा धुतले तरी काही वेळाने ते पुन्हा अस्वच्छ आणि चिकट होतात. शिवाय केसांमधून घाणेरडा वासही सतत येतो. जर तुमचे केस मुळातच तेलकट असतील तर अशा लोकांना पावसाळ्यात केस चिकट होण्याचा त्रास नेहमीपेक्षा जास्त जाणवतो. पावसाळ्यात केस धुतल्यावर दोन दिवसाच्या आत ते पुन्हा धुणं गरजेचं आहे असं वाटू लागतं. तुम्हालाही सतत हा त्रास जाणवत  असेल तर या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगाच्या आहेत. 

केस सतत चिकट आणि तेलकट होत असतील करा  टिप्स फॉलो –

केस मऊ आणि चमकदार दिसावे यासाठी आपण शॅम्पू करतो. मात्र जर शॅम्पू केल्यावर दुसऱ्याच दिवशी जर तुमचे केस पुन्हा तेलकट, चिकट होत असतील तर तुमच्या केसांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. 

अशा वेळ केस चिकट होण्याचे मुख्य कारण तुमच्या ऑईली स्काल्प आणि बाहेरील दमट वातावरण आहे. कारण बाहेरील वातावरणामुळे तुमच्या स्काल्पमधून अतिरिक्त सीबमची निर्मिती होत असते.  यासाठीच या समस्येचे मुख्य कारण असलेल्या  तेलकट स्काल्पवर योग्य उपाय केला गेला पाहिजे. काही घरगुती उपाय करून तुम्ही ही समस्या रोखू शकता.

चहा पावडर

चहा पावडर फक्त चहा करण्यासाठीच नाही तर केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात एक मोठा चमचा चहापावडर मिसळा आणि पंधरा मिनीटे उकळा. हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि केसांच्या मुळांना कापसाच्या मदतीने लावा. अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवा. असं केल्यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक मिळेलच शिवाय तुमच्या केसांमधील चिकटपणा कमी होईल. 

कडिपत्ता आणि दही

कडिपत्ता आणि दही हे केसांच्या पोषण आणि स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरते. यासाठी एक कप कडिपत्त्याची पाने आणि एक कप दही एकत्र करा. दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा आणि अर्ध्या तासाने केस स्वच्छ करा. या पॅकमुळे तुमच्या केसांमधील तेलकटपणा आपोआप कमी होईल.

व्हिनेगर

केसांसाठी व्हिनेगर एखाद्या शॅम्पूप्रमाणे काम करतं. कारण त्यामुळे तुमचे केस स्वच्छ तर होतातच शिवाय केसांचा तेलकटपणा कमी होतो. यासाठी एक ते दोन चमचे व्हिनेगर पाण्यात मिसळून केसांच्या मुळांना लावा. थोड्या वेळाने केस साध्या पाण्याने धुवा.शँपू आणि कंडिशनर संपले असेल तर कसे धुता येतील केस, जाणून घ्या

पेरूची पाने 

केसांमधील तेलकटपणा कमी करण्यासाठी पेरूची पाने तु्म्ही नक्कीच वापरू शकता. यासाठी पेरूची कोवळी पाने घ्या आणि  पंधरा मिनीटे उकळा. हे पाणी थंड करून केसांच्या मुळांना लावा. केसांचा तेलकटपणा नक्कीच कमी होईल.

केसांचा गुंता सोडविण्यासाठी 5 सोप्या टिप्स, केस नाही तुटणार

मुलतानी माती

केसांना मुलतानी माती  लावण्यामुळेही तुमचे केस स्वच्छ आणि मऊ होतील. यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये थोडा टोमॅटोचा रस मिसळा आणि हा हेअर पॅक केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासाने केस स्वच्छ करा. ज्यामुळे केसांमधील जास्तीचे तेल निघून जाईल. 

घरगुती उपाय करून तुमचे केस करा डिटॉक्स, जाणून घ्या पद्धत

Read More From DIY सौंदर्य