Mental Health

आपल्याला एन्क्झायटी किंवा डिप्रेशन आहे की नाही हे कसे ओळखाल

Dipali Naphade  |  Oct 13, 2021
anxiety-or-depression

मेंटल हेल्थ डिसऑर्डर विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांमध्ये खूप सामान्य आहेत. WHO च्या अनुसार, डिप्रेशन हे विकृती आणि मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. एन्क्झायटी आणि डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आपल्या भोवती 5 पैकी 1 लोकांना प्रभावित करतात. त्याबद्दल जागरूकता वाढत आहे हे एक चांगले लक्षण आहे. कोविड महामारीने आत्मनिरीक्षण करण्यास प्रवृत्त केले आहे आणि आपल्या मानसिक आरोग्याबद्दल आपला दृष्टीकोन बदलला आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची एन्झायटी आहे हे आपण कसे ओळखू शकतो? याबाबत आम्ही अधिक जाणून घेतले डॉ. जल्पा भुटा , कंसल्टंट सायकिएट्रिस्ट, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून. 

जर आपल्याला आपले हृदय वारंवार धडधडत असेल तर आपण सतत तणावग्रस्त असतो, आराम करण्यास असमर्थ असतो आणि आपल्याशी होऊ शकणाऱ्या सर्व वाईट गोष्टींबद्दल जास्त चिंता करतो असे वाटत असेल, त्याचा परिणाम झोपेवर होतो आणि आपण सतत भीतीमध्ये राहतो, आपण कदाचित एन्झायटी डिसऑर्डरने ग्रस्त असू शकतो. याचे अनेक प्रकार आहेत, जसे की जनरलाइझ्ड एन्झायटी डिसऑर्डर, फोबिया, पॅनिक डिसऑर्डर, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर, इ ज्यामध्ये प्रत्येकात विविध वैशिष्ट्य असतात.

अधिक वाचा – कोरोनाच्या भितीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण – तज्ज्ञांचे मत

आपण डिप्रेसिव्ह डिसऑर्डर कसे ओळखू शकतो?

डिप्रेसिव्ह डिसऑर्डर अवघड आहेत. ते जास्त उदासीनता, रडणे आणि हताश वाटणे, निरुपयोगी वाटणे, प्रेरणा कमी होणे, इत्यादी स्वरूपात स्पष्ट असू शकतात. त्यांना मुखवटा घातला जाऊ शकतो, म्हणजे असे व्यक्ती उदास वाटत नाही, परंतु ते चिडचिडे होऊ शकतात, त्यांना थकवा वाटू शकतो, एकाग्रता आणि लक्ष कमी होऊ शकते, वारंवार आजारी पडू शकतात. त्यांना वैद्यकीयदृष्ट्या अस्पष्ट लक्षणे देखील असू शकतात, जी त्यांच्या जीवनाची गुणवत्ता प्रभावित करतात. जर वरील नमूद सर्व गोष्टी 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकल्या, जर त्यांचा झोप व भूक यावर परिणाम झाला असेल, तसेच नातेसंबंधांवर आणि कामाच्या कामगिरीवर परिणाम झाला असेल तर त्याला व्यावसायिकांच्या मदतीची गरज आहे.

अधिक वाचा – मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)

क्रॉनिक स्ट्रेसचा शरीरावर परिणाम

स्ट्रेस आपल्या मेंदूतील हायपोथालेमो-पिट्यूटरी ऍक्सिसवर परिणाम करतो. ते आपल्या कॉर्टिसॉलची पातळी वाढवते. हे आपल्या न्यूरोट्रांसमीटर बॅलन्समध्ये अडथळा आणते, आपल्या शरीरात अधिक साइटोकिन्ससह जळजळ निर्माण करते. ते आपल्या न्यूरो एंडोक्राइन सिस्टम आणि इम्यून सिस्टमवर परिणाम करते, ज्यामुळे इम्युनिटी कमजोर होते. अनेक आजार दीर्घकाळ उपचार न केलेल्या मानसिक आरोग्य विकारांशी जोडले जाऊ शकतात, जसे की; ऍसिडिटी, आयबीएस, क्रॉनिक डायरिया, मायग्रेन, उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, कर्करोग, दमा, त्वचेचे आजार, इत्यादी.

आपण काय करावे? 

आपल्या स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. जसे आपण शारीरिक तंदुरुस्तीसाठी करतो तसेच आपण मानसिक आरोग्याचे ही पालनपोषण करणे गरजेचे आहे. आपण आपल्या मनाला सकारात्मक विचार आणि आशावादी दृष्टीकोन ठेवण्यासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. वर्क-लाईफ बॅलेन्स महत्त्वाचा आहे. आपल्या स्वतःच्या आनंदासाठी नातेसंबंध जोपासायला पाहिजे.

तथापि जर आपण वरील लक्षणांनी ग्रस्त आहोत, तर जागरूकता आणि स्वत:ची स्वीकृती आवश्यक आहे. आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की शांतपणे दुःख सहन करण्याऐवजी मदत घेणे केव्हाही चांगले आहे. मेंटल हेल्थ डिसऑर्डरवर अनेक प्रभावी उपचार आहेत.

अधिक वाचा – तणावग्रस्त आहोत हे कसे घ्याल समजून, काय आहेत कारणे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Mental Health