फॅशन

शिफॉन साड्यांची काळजी घ्या अशी, वापरा या ट्रिक्स

Dipali Naphade  |  Aug 9, 2021
how to maintain chiffon sarees

आपल्याकडे बॉलिवूड मधून भारतात नवं नवीन साड्यांचे प्रकार किंवा ट्रेंड नेहेमीच बाहेर येत असतात. आपल्याकडे बॉलीवूड चित्रपटांमधून वर्षानुवर्षे नायिका बर्फाळ प्रदेशात शिफॉनच्या साडीत वावरताना दिसून येतात. शिफॉन साडी (chiffon sarees) ही नेहमीच ट्रेंडमध्ये असते. पण बॉलीवूड अभिनेत्रींची ही सर्वात जवळची साडी मानली जाते. एकतर ही अत्यंत हलकी असते आणि दिसायलाही तितकीच आकर्षक असते. चित्रीकरणाच्या वेळी ही सांभाळणे अत्यंत सोपे जाते. वजनाला हलकी असल्यामुळे अनेक महिलांना ही साडी आवडते. पण अन्य साड्यांच्या तुलनेत शिफॉनची साडी लवकर खराब होते. महिलांच्या वॉर्डरोबमध्ये शिफॉन साडी नाही असं होणे शक्य नाही. ऑफिसमध्ये जाताना असो अथवा कोणत्याही कार्यक्रमाला असो प्रत्येक लुकसाठी शिफॉन साडी हा चांगला पर्याय आहे. पण तुम्हाला शिफॉनची साडी नेहमी नवी दिसायला हवी असेल तर काही सोप्या ट्रिक्स तुम्हाला माहीत असायला हव्यात. काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा ही साडी वापरून वॉर्डरोबमध्ये ठेवता तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. याबाबत काही टिप्स. 

वॉशिंग मशीनऐवजी हाताने धुवा

Freepik

शिफॉनची साडी एकदा नेसली की लगेच धुण्याची खरं तर गरज नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की, साडी खराब झाली आहे. खूप घाम लागला आहे तर तुम्ही बादलीत पाण्यामध्ये डिजर्जंट मिक्स करा आणि साधारण 15 मिनिट्स साडी त्यात भिजवून ठेवा. 2-3 वेळा पाण्यातून धुऊन त्यातील साबणाचे पाणी काढून टाका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये ही साडी धुऊ नये. दुसरी गोष्ट हाताने धुतानादेखील अन्य कपड्यांसह ही साडी भिजवू नये. वेगळ्या बादलीत भिजवावी. शिफॉन साडीला अन्य कपड्यांचे डाग पटकन लागतात आणि नंतर हे डाग काढणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे तुम्ही ही काळजी नक्की घ्या. 

अधिक वाचा – साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

शिफॉन साडी तुम्ही उन्हात सुकवू नका 

काही जणांना साडी नेसून झाल्यावर हँगर लाऊन उन्हात सुकवायची सवय असते. तसंच काहींना धुतल्यानंतरही साडी डायरेक्ट उन्हात सुकवायची सवय असते. पण असे अजिबात करू नका. तसंच ही साडी खूप पिळू नका. त्यामुळे साडीवर सुरकुत्या येतात. घरात सावलीमध्येच ही साडी सुकवा. सूर्याची किरणे साडीवर पडू देऊ नका. साडी सुकल्यानंतर लगेच ती साडी फोल्ड करून अर्थात घडी घालून ठेऊ नका. काही शिफॉन साड्या अशाही असातात ज्यांना धुतल्यानंतर घडी केल्यावर अजिबात इस्त्रीची गरज भासत नाही. 

शिफॉन साडीला इस्त्री कशी कराल

तुम्हाला शिफॉन साडीला इस्त्री करायची असेल तर तुम्ही पेपरचा वापर करा. वास्तविक आपण इस्त्रीचे टेंपरेचर नीट सेट करू शकत नाही. त्यामुळे अधिक गरम झाल्यास शिफॉनची साडी जळण्याचा धोकाही असतो. शिफॉनच्या साडीवर जर जरीचे डिझाईन असेल तर त्यावर इस्त्री करण्यासाठी तुम्ही सुती कापडाचा वापर करा आणि मगच प्रेस करा. असे केल्यास कोणत्याही अडचणीशिवाय शिफॉनची साडी तुम्हाला इस्त्री करून घेता येते. 

अधिक वाचा – कॉटनची साडी नेसण्याची सोपी पद्धत, देईल एलिगंट लुक

घडी करताना करा वृत्तपत्राचा वापर 

Freepik

शिफॉन साडी तुम्ही व्यवस्थित फोल्ड करून नंतर वृत्तपत्रात बांधून आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवा. तुमच्याकडे एकपेक्षा अधिक शिफॉन साड्या असतील तर तुम्ही त्यादेखील अशाच स्वरूपात ठेवा. बऱ्याचदा आपण कपाटातून कपडे काढताना घाई करतो. त्यामुळे अशावेळी शिफॉनच्या साडीची घडी विस्कटण्याचा धोका असतो. पण वृत्तपत्रात बांधून ठेवली असल्यामुळे पटकन काढताही येते आणि खराबही होत नाही. तसंच शिफॉन साडी कपाटात हँगरवर लटकवून ठेऊ नका. यामुळे त्याचा कपडा खराब होतो. 

अधिक वाचा – लहरिया साडीचा ट्रेंड, कशी कराल कॅरी

जास्त वेळ घडी करून ठेऊ नका 

तुम्ही जर घडी घालून वृत्तपत्रातमध्ये साडी ठेवली असेल तर साधारण आठवडा अथवा दोन आठवड्यात तुम्ही तपासा. वास्तविक जास्त काळ तुम्ही घडी घालून ठेवली तर त्याला वेगळा वास येऊ लागतो. थोडा वेळा काढून तुम्ही बाहेर ठेवा आणि मग पुन्हा कागदात घडी करून ठेऊन द्या. 

तुम्हालाही शिफॉनची साडी नेसणे आवडत असेल तर आम्ही दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुम्ही अगदी तुमच्या जुन्या शिफॉनच्या साड्याही अशा जपू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From फॅशन