Ayurveda

अशी बनवा घरच्या घरी आवळा पावडर, फॉलो करा या टिप्स

Trupti Paradkar  |  Dec 23, 2021
how to make amla powder at home in marathi

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस, फायबर्स असे अनेक पोषक घटक असतात. आवळा आर्युवैदिक औषध आहे. त्यामुळे अनेक आजारांवर आवळ्याचे उपचार केले जातात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा खाणे फायद्याचे आहे. एवढंच नाही त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही आवळ्याचा फायदा होतो. यासाठीच अनेक सौंदर्योत्पदनात आवळ्याचा आवर्जून वापर केला जातो. फेस मास्क अथवा हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्हाला आवळा पावडर लागते. बाजारात तयार आवळा पावडरमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. यासाठी घरीच बनवा अशा सोप्या पद्धतीने आवळा पावडर

घरीच बनवा या चटपटीत आवळा रेसिपीज (Amla Recipes In Marathi)

आवळा पावडर बनवण्याची पद्धत

how to make amla powder at home in marathi

आवळा पावडर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे आवळा विकत घेणे. बाजारातून ताजे आणि हिरवेगार आवळे विकत आणा. एका भांड्यात आवळे स्वच्छ धुवून घ्या आणि उकळत ठेवा. तुम्ही मायक्रोव्हेवमध्येही आवळा स्टीम करून घेऊ शकता. शिजलेले आवळे छोटे तुकडे करून सुकवा. कडकडीत उन्हात आवळे सुकवा. दोन ते तीन दिवसानंतर ते व्यवस्थित सुकले की मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करा. अशा प्रकारे घरी तयार केलेल्या आवळा पावडरमध्ये केमिकल्स नसल्यामुळे ती तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी खूप लाभदायक ठरते. या पावडरचा वापर तुम्ही अनेक प्रकारच्या फेसपॅक, फेस मास्कमध्ये करू शकता. आजारपणात घरगुती औषध तयार करण्यासाठी घरात तयार आवळा पावडर असणे नक्कीच फायद्याचे ठरेल. 

मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई (How To Use Amla, Reetha And Shikakai For Hair)

आवळा पावडर कशी टिकवावी

आवळा पावडर घरी तयार करणं नक्कीच सोपं आहे मात्र ती जास्त दिवस टिकावी यासाठी नीट स्टोअर करायला हवी. आवळा पावडर तुम्ही एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीत साठवून ठेवू शकता. प्लास्टिक अथवा इतर कंटेनरमध्ये आवळा पावडर खराब होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय हवाबंद बरणीत आवळा पावडर जास्त काळ टिकेल. मात्र लक्षात ठेवा आवळा पावडर काढल्यावर झाकण पुन्हा घट्ट बंद करा आणि आवळा पावडरला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या. अशा प्रकारे जास्तीत जास्त दिवस तुम्ही घरात बनवलेली आवळा पावडर साठवून ठेवू शकता. ज्यामुळे घरच्या घरी सौंदर्योपचार करण्यासाठी तुमच्या घरात आवळा पावडर तयार असेल.

Hair Mehndi Tips In Marathi | केसांना मेहंदी लावण्याच्या सोप्या टिप्स

Read More From Ayurveda