DIY सौंदर्य

घरीच बनवा आंघोळीसाठी होममेड साबण आणि मिळवा हे फायदे 

Vaidehi Raje  |  Jun 8, 2022
Homemade Herbal Soap

आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे त्वचा होय. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. आजकाल बाजारात मिळणारे रासायनिक साबण त्वचेसाठी चांगले नाहीत. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता निघून जाते आणि त्वचा कोरडी होते.बाजारात मिळणाऱ्या साबणांमध्ये जे रासायनिक घटक सुगंधासाठी वापरले जातात ते त्वचेसाठी अजिबात चांगले नाहीत. त्यामुळे तुमचीही त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर फक्त घरगुती साबण वापरणे अधिक फायदेशीर ठरते जेणेकरून तुम्ही तुमच्या त्वचेची नैसर्गिकरीत्या काळजी घेऊ शकाल. तुम्ही घरीही अगदी सहज साबण बनवू शकता. तर आज जाणून घ्या घरच्या घरीच हर्बल साबण कसा बनवायचा. 

होममेड लेमन सोप

लिंबू हे त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. लिंबामध्ये असे औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यासोबतच त्वचेच्या इतर अनेक समस्या दूर होतात.

साहित्य- 2 कप ग्लिसरीन साबण, लिंबाचे साल, लेमन इसेन्शियल ऑइल, खाण्याचा रंग – पिवळा

कृती – लेमन सोप बनवण्यासाठी प्रथम दोन कप ग्लिसरीन साबण घ्या आणि तो वितळवा. त्यात लिंबाची साल बारीक किसून घाला आणि मग त्यात लेमन इसेन्शियल ऑईलचे काही थेंब व पिवळा फूड कलर घाला आणि चांगले मिसळा. हे तयार मिश्रण एका साच्यात घाला आणि सेट होऊ द्या. साधारण दोन-तीन तासांनी ते सेट होईल. तुमचा ट्रॉपिकल फ्रुटी सुगंधाचा लेमन सोप तयार आहे. 

Homemade Herbal Soap

होममेड नीम सोप

कडुलिंबातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या गुणधर्मांमुळे ते त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जर त्याचा त्वचेवर वापर केला तर तुम्हाला मुरुमांची समस्या उद्भवणार नाही. नितळ त्वचा मिळविण्यासाठी कडुलिंबाचा साबण वापरा. 

साहित्य- दोन मूठभर कडुलिंबाची पाने, चार ते पाच आंब्याची पाने, मूठभर तुळशीची पाने, गुलाब पाणी, लॅव्हेंडर ऑईलचे काही थेंब, ग्लिसरीन साबण बेस, लिंबाची साल

कृती-हा हर्बल साबण बनवण्यासाठी सर्वप्रथम सगळी पाने नीट धुवावीत. आता सर्व पाने आणि लिंबाची साल मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात थोडे गुलाबपाणी टाकून पेस्ट तयार करा. चाळणीच्या साहाय्याने ते गाळून घ्या.डबल बॉयलरमध्ये ओतून ग्लिसरीन साबण बेस वितळवा. नंतर त्यात तयार मिश्रण घालून मिक्स करा. तसेच, त्याला छान सुगंध देण्यासाठी त्यात लॅव्हेंडर ऑईलचे  काही थेंब मिसळा. साबण सेट करण्यासाठी कोणत्याही प्लास्टिकच्या साच्याच्या आतील कडांना व्हॅसलीन लावा. त्यात साबणाचे मिश्रण घालून चार ते पाच तास सेट होऊ द्या. तुमचा होममेड नीम सोप तयार आहे. 

Homemade Herbal Soap

कोरड्या त्वचेसाठी असा साबण बनवा 

तुमची त्वचा कोरडी असेल तर बकरीचे दूध, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल तेल आणि मधमाशीच्या मेणापासून बनवलेला नैसर्गिक साबण वापरा. हा साबण त्वचेसाठी अतिशय सौम्य असतो. यासोबतच त्यात कोको बटर आणि शिया बटर घातल्यास कोरड्या त्वचेला अधिक आर्द्रता मिळेल.

तेलकट त्वचेसाठी साबण 

 हा साबण बनवण्यासाठी तुम्हाला लव्हेंडर, कॅमोमाइल आणि टी ट्री ऑइल लागेल, जे तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय यात  तुम्ही क्ले, ग्रीन क्ले किंवा पिंक क्ले घातला तर त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यास मदत होईल. 

या साबणांमध्ये कोणतेही केमिकल नाही किंवा ते त्वचेसाठी कठोर नाहीत. यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि त्वचेला ओलावाही मिळतो. तसेच ज्यांना कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगाचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी नैसर्गिक होममेड साबण उत्तम आहे. एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या रोगांसाठी फक्त नैसर्गिक साबण वापरा. त्यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येणार नाही. 

अशा प्रकारे तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन घरीच हर्बल साबण बनवा. 

Photo Credit- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY सौंदर्य