टम्म फुगलेली गरम गरम पुरळपोळी त्यावर मस्त साजूक तुपाची धार…जगातील कोणताही गोड पदार्थ पुरणपोळी पुढे अगदीच फिका पडतो. पुरणपोळी करण्यासाठी बरीच मेहनत लागते. हे जरी खरे असले तरी देखील ती करणे फार काही कठीण नाही. योग्य प्रमाण आणि सरावाने तुम्हाला पुरणपोळी अगदी सहज करता येऊ शकते. एकदा का तिचे योग्य प्रमाण जमले की, अगदी डोळे झाकून तुम्ही मऊसूत, लुशलुशीत आणि चविष्ट अशा पुरणपोळ्या करुन शकता. पुरणपोळीचे इतके वर्णन ऐकल्यानंतर परफेक्ट पुरणपोळी शिकण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही मस्त ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याच्यामुळे तुमच्या पुरणपोळ्या होतील नेहमीच परफेक्ट. चला करुया सुरुवात
Kitchen Tips: चुकूनही वापरू नका फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक
अशी करा तयारी
पुरणाची पोळी किंवा पुरणपोळी करायची म्हणजे काही पूर्वतयारी आली ती काय आहे ते पाहुया
- पुरणाची पोळी करण्यासाठी सगळ्यात आधी पुरणाची तयारी करावी लागते. त्यासाठी चणाडाळ भिजत घातली जाते. साधारण 7-8 तास ही डाळ चांगली भिजायला हवी.
- डाळ चांगली भिजली की, ती मोठ्या पातेल्यात काढून शिजवून घ्यावी लागते. डाळ शिजवताना त्यातील पाण्यचा फेस सतत काढत राहा. (डाळ ज्या पाण्यात भिजवली आहे ते पाणी काढून टाका. नवीन पाणी घेऊन मगच डाळ शिजवा)
- डाळ शिजली की, नाही हे पाहण्यासाठी डाळ पलित्यावर घेऊन ती दाबली जाते की नाही पाहा. पुरण चांगलं व्हायचं असेल तर डाळ चांगली शिजणे फार गरजेचे असते.
- डाळ शिजत आली की, तिचा आकार आणि रंग दोन्ही बदलू लागतो. आता पुरणाची पुढची पायरी म्हणजे गुळ घालून पुरण शिजवणे. चवीनुसार आणि गोडाच्या अंदाजानुसार त्यामध्ये चिरलेला किंवा किसलेला गूळ घालावा. गूळ आणि डाळ चांगली एकत्र व्हायला हवी. त्याचा एक लगदा तयार व्हायला हवा. जर तुम्ही गुळाचे खडे घातले तर गूळ वितळायला फार वेळ लागेल. त्यामुळे तुम्ही गूळ किसून घेणे नेहमी बरे. मंद ते मध्यम आचेवर डाळ आणि गूळ जळू न देता ते सतत एकजीव करत राहा. त्यामध्ये जायफळ किंवा वेलची पावडर घाला ( काही जण रंग येण्यासाठी यामध्ये हळद देखील घालतात)
- आता पुरण यंत्र घेऊन पुरण चांगले बारीक वाटून घ्या. अनेक जण पुरण वाटण्यासाठी मिक्सरचा उपयोग करतात. पण पुरणयंत्र हे नेहमीच उत्तम.थोडी हाताची मेहनत लागली तरी देखील पुरण छान बारीक निघते.
पिकनिकसाठी भन्नाट स्नॅक्स आयडियाज, प्रवास होईल मस्त
आता वेळ पुरणपोळी करण्याची
आता अनेकांना जी गोष्ट जमत नाही असे वाटते ती म्हणजे पुरणपोळी लाटणं आणि त्यासाठी कणिक भिजवणे.
- जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र पुरणपोळ्या हव्या असतील तर तुम्ही मैद्याची पुरणपोळी करु शकता.याशिवाय मैदा आणि गव्हाची कणिक असे दोन्ही मिसळूनही खुसखुशीत पुरणपोळी करता येते.
- मैदा घेत असाल तर तो अगदी हलक्या हाताने मळा. यासाठी थोडा वेळ लागेल. पण हरकत नाही. पण चांगली पुरणपोळी करण्यासाठी थोडासा वेळ घ्या.
- आता पुरणाचा एक गोळा आणि पिठाचा गोळा घ्या. ज्यापद्धतीने पराठा लाटतो. अगदी तशाच हलक्या हाताने पुरळपोळ्या लाटायला घ्या. पुरण सगळीकडे पसरण्यासाठी त्या फार प्रेमाने आणि सावकाश लाटाव्या लागतात. एका बाजूने पुरणपोळ्या लाटू नका.सगळीकडे समान दाब देऊन पुरणपोळ्या लाटा.
- आता कोणत्याही पोळीप्रमाणे छान शेकून घ्या. जर पुरणपोळ्या छान लाटल्या असतील तर त्या टुम्म फुगतात.
पुरणपोळी झाल्यानंतर त्या तशाच नरम राहाव्यात म्हणून त्यावर तूपाची धार सोडा.
आता अशापद्धतीने लुसलुशीत पुरणपोळी करा.
लसूण आणि हिरव्या मिरचेचे चटपटीत लोणचे बनवा घरच्या घरी
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
gulmoharcook
homemademeals1962
mitalideliciouskitchen