बाहेर मस्त धो-धो पाऊस पडत असेल आणि घरी भजीचा कार्यक्रम होणार नाही असे मुळीच होणार नाही. भजी हा पावसाचा जणू आत्मा आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर अगदी हमखास बटाटा भजी ही करायलाच हवी हे शास्त्र आहे. पण खूप जणांच्या बटाटा भजी या खुशखुशीत होत नाही. पीठ एकीकडे आणि उघडा बटाटा असे खूप जणांचे होते. काही जणांचे बेसनचे पीठ हे फुलून येत नाही. मग काय भजीचा सगळा प्लॅन चौपट होतो. बटाटा भजी ही नेहमी चांगलीच व्हायची असेल तर तुम्ही काही ट्रिक्स फॉलो करायला हव्यात. बटाटा भजीच्या बाबतीत तुमच्याकडून अशाच काही चुका होत असतील तर ही भजी मस्त आणि चांगली करण्यासाठी या ट्रिक्स तुमच्या नक्की कामी येतील.
परफेक्ट आणि कुरकुरीत भजी करायच्या असतील तर फॉलो करा या टीप्स
बटाटा चिरताना
खूप जण भजीसाठी बटाटा चिरताना एकदम पातळ असे काप करतात. तसे करत असाल तर मुळीच करु नका. कारण बटाटा हा थोडा मध्यम आकारात चिरा. त्यामुळे भजीला पिठ राहण्यास आणि भजी खाण्याचा आनंदसुद्धा मिळतो. त्यामुळे सगळ्यात आधी बटाटा चिरताना तुम्ही थोडा मोठा बटाटा घेऊन तो मध्यम आकारात चिरा. म्हणजे तुम्हाला पुढचा त्रास होणार नाही. बटाट्याची ही ट्रिक अगदी हमखास लक्षात ठेवा. त्यामुळे आता बटाटा चिरताना या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या.
पावसाळ्यात हमखास ताव मारायला हवा या पदार्थांवर
भजीचे बॅटर करताना
आता जर तुम्हाला भजीचे बॅटर करायचे असेल तर बेसन, थोडी हळद, लाल तिखट आणि त्यामध्ये थोडासा ओवा घाला. भजीचे बॅटर फार पातळ झाले तर ते बटाट्याला धरुन राहात नाही. त्यामुळे भजी या चांगल्या होत नाही तर त्या सतत तेलकट होत राहतात. त्यामुळे भजीचे बॅटर थोडेसे जाडसर पण हातातून पडेल इतके असू द्या. म्हणजे भजी चांगल्या तळता येतील. त्यामुळे बटाटा चिरण्याबरोबरच भजीचे बॅटर चांगले असणेही तितकेच गरजेचे आहे.
सुक्या जवळ्यापासून बनवा या मस्त रेसिपी (Jawala Recipes In Marathi)
भजीच्या या टिप्सही ठेवा लक्षात
बटाटा भजी करताना तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील गरजेचे आहे. या भजीच्या टिप्स देखील तुम्हाला नक्कीच कामी येतील.
- भजी तळताना तेल नेहमी स्वच्छ आणि चांगले असू द्या. त्यामुळे तुमची भजी ही नेहमीच उत्तम होईल. तेल नवीन असेल तर भजीचा सोनेरी रंग यायला थोडासा वेळ लागतो. पण त्यामध्ये भजीला इतर कोणत्याही गोष्टीची चव येत नाही.
- भजी करताना बटाटा जास्त झाला की, तो आपण पाण्यात टाकून फ्रिजमध्ये ठेवून देतो. ही चुकी तुम्ही अजिबात करु नका. कारण अशा पाण्यात घातलेल्या बटाट्याचे काप हे काळे पडतात. त्याच्या भजी अजिबात चांगल्या होत नाही.
- भजीचे तेल हे कडकडीत गरम नको. भजीचे तेल हे मध्यम आचेवर गरम करा. त्यानंतरच त्यामध्ये भजी तळा मगच भजी या अधिक चांगल्या तळल्या जातात.
आता भजी करताना या ट्रिक नक्कीच लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या भजी छान खुसखुशीत होतील.