DIY सौंदर्य

त्वचा आणि केसांसाठी दिवसातून एक चमचा खा ही पूड, मिळेल फायदा

Leenal Gawade  |  Jul 19, 2022
त्वचा आणि केस होतील सुंदर

त्वचा आणि केसांच्या वाढीसाठी आज आम्ही तुम्हाला कोणतीही क्रिम, शॅम्पू किंवा कंडिशनर याविषयी कोणतीही माहिती देणार नाही. तर आज आम्ही तुम्हाला असा हेल्दी पर्याय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा आतून सुंदर आणि केसांची वाढ उत्तम होण्यास मदत मिळणार आहे. रोजच्या रोज या गोष्टींचे सेवन केल्यामुळे याचा फायदा लवकरच दिसण्यास तुम्हाला मदत होईल. चला तर मग आता कोणताही वेळ न दवडता तयार करुया त्वचा आणि केसांसाठी ही वरदान ठरणारी अशी पूड

शरीराला असते यांची गरज

शरीराचे कार्य सुरळीत ठेवायचे असेल तर त्याला अनेक पोषकत्वांची गरज असते. म्हणजे प्रोटीन, व्हिटॅमिन्सची कमतरता भरुन निघाली की, उत्तम केस आणि त्वचा मिळेतच. अनेकदा शरीरात यांची कमतरता जाणवू लागली ही आपोआप हे त्रास सुरु होतात. आता योग्य आहार घेणे सगळ्यांसाठीच शक्य नाही. कारण सगळ्यांनाच असा आहार त्यांच्या लाईफस्टाईलमुळे घेता येईल असेही होत नाही. अशावेळी जर तुम्हाला अशी गोष्ट मिळाली जी तुमच्या शरीराची कमतरचा एका चमच्यात भरुन काढत असेल तर अशा गोष्टींचे सेवन करणे आरोग्यासाठीही लाभदायक ठरु शकते. 

दिवसातून खा ही एक चमचा पूड

रोज करा याचे एक चमचा सेवन

आता ज्या गोष्टीचा आम्ही सतत उल्लेख करत आहोत. ही पूड आहे तरी काय? असा प्रश्न पडला असेल तर वाचा साहित्य आणि कृती 

साहित्य: 1 वाटी बदाम, अक्रोड, ¼ वाटी भोपळ्याच्या बिया, 2 मोठे चमचे अळशी आणि चिआ सीड्स 

कृती: 

  1. एका भांड्यात वरील सगळे साहित्य एकत्र करुन घ्या.हे सगळे साहित्य आपण कच्चे वाटू शकत नाही. त्यामुळे  एका जाड बुडाच्या कढईमध्ये हे सगळे काढून ते थोडे भाजून घ्यावे. त्यामुळे त्यातील मॉईश्चर निघून जाते. 
  2. चिआ सीड्स या भाजताना थोड्या उडतात. त्यामुळे थोडा गॅस बारीक करा. सगळे साहित्य खूप जास्त काळे होणार नाहीत याची काळजी घ्या. 
  3. साधारण 5 ते 7 मिनिटे फिरवल्यानंतर ते थंड करुन त्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्या. 
  4. तुमची केस आणि त्वचेसाठी वरदान असलेली पूड तयार 
  5. आता रोज एक चमचा ही पूड घेऊन त्यावर एक ग्लास पाणी, दूध किंवा कोणताही रस प्यायला अजिबात विसरु नका. 

का आहे ही पूड फायद्याची

यामध्ये असलेले सगळे साहित्य हे पाहिले तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आहेत. या शिवाय असे घटक आहेत जे त्वचा आणि केसांसाठी खूप गरजेचे असते. जसे की, बदाम आणि अक्रोडमध्ये व्हिटॅमिन E असते जे त्वचेला तजेला देण्याचे काम करते. अळशीमध्ये व्हिटॅमिन B असते जे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते. भोपळ्याच्या बिया यामध्ये व्हिटॅमिन k असते जे जखमा भरण्याचे काम चांगल्या पद्धतीने करते. त्वचेवर येणाऱ्या पिंपल्सवर ते अत्यंत परिणामकारण असे आहे.

आता लगेचच तुम्हीही ही पावडर/ पूड तयार करा आणि त्याचे रोजच्या रोज सेवन करा 

Read More From DIY सौंदर्य