बरेचदा आपण जेवण बनवायला घेतो आणि आपल्याकडे स्वयंपाकघरात कांदाच नाहीये हे लक्षात येतं. बरेचदा भाजीमध्ये कांदा (Onion) घातल्याशिवाय भाजीचा रस घट्ट होत नाही असा समज आहे. पण तुम्हाला कांदा न घालताही तितकीच चविष्ट आणि घट्ट भाजी नक्की तयार करता येते. अनेक भाज्यांमध्ये कांदा न घालता भाजी करता येते. पण बऱ्याचदा ग्रेव्हीची भाजी (Gravy) करताना कांद्याची गरज भासते. पण तुम्हाला कांदा न वापरताही ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरता येतात. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना? हो पण असं नक्कीच होऊ शकतं. यासाठी नक्की कोणत्या ट्रिक्स वापरायच्या (Tricks For Making Vegetable Gravy) ते आपण जाणून घेऊया.
दही आणि ताज्या मलईचा करा वापर
तुम्ही जर हा विचार करत असाल की, दही आणि मलईमुळे ग्रेव्ही कशी घट्ट होईल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही सर्वात सोपी पद्धत आहे. यामुळे तुमच्या भाजीची ग्रेव्ही केवळ घट्टच होणार नाही तर भाजीला चांगले टेक्स्चरही येईल. यासाठी तुम्हाला 3 चमचे दही (त्यातून पाणी काढून टाका) आणि 2 चमचे ताजी मलई (साय) एकत्र करून फेटायची आहे. हे व्यवस्थित फेटून झाल्यावर मंद आचेवर तुमची भाजी शिजत असताना हे मिश्रण तुम्ही त्यात घाला, त्यात मसाले घाला आणि भाजी शिजवा आणि गरम करून घ्या. काही वेळातच तुम्हाला भाजीचा रस्सा अधिक घट्ट आणि सुंदर दिसून येईल.
काजूच्या पेस्टने करा भाजीचा रस्सा घट्ट
पनीरच्या अथवा पंजाबी भाज्यांमध्ये सहसा काजूची पेस्ट वापरण्यात येते, जेणेकरून त्याचा मसाला आणि ग्रेव्ही अधिक घट्ट व्हावी. यामुळे स्वाद दुप्पट वाढतो आणि भाजीही दिसायला अधिक चांगली दिसते. तुम्हाला कांद्याशिवाय भाजीचा रस्सा घट्ट बनवायचा असेल तर तुम्ही एका कढईत तूप घ्या, त्यात काजू भाजून घ्या आणि मग त्याची पेस्ट तयार करा. तुम्हाला हवं असेल त्या भाजीमध्ये ही पेस्ट घाला आणि भाजीचा रस्सा बनवा अधिक घट्ट.
शेंगदाण्याचा करा वापर
अनेक नाश्त्यामध्ये आपण शेंगदाण्यांचा वापर करतो. याचा प्रयोग तुम्ही भाजीच्या रश्शामध्येही करू शकता. याबरोबर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील गव्हाचे पीठ जोडलेत तर अधिक चांगली ट्रिक तुम्हाला वापरता येते. त्यासाठी तुम्ही 2 चमचे गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात पाणी घालून थोडं जाडसर ग्रेव्ही करून घ्या. त्यानंतर कच्चे शेंगदाणे घ्या आणि भाजा. त्याची पेस्ट करून घ्या. आता गव्हाचे भिजवलेले पीठ आणि शेंगदाणा पेस्ट एकत्र करा आणि तुम्हाला ज्या भाजीची ग्रेव्ही घट्ट बनवायची आहे त्यात तुम्ही हे मिश्रण घाला आणि भाजी शिजवा. यामुळे तुमच्या भाजीचा रस्सा अधिक घट्ट होईल.
याशिवाय तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा उपयोग करून घेऊ शकता. यासाठी मंद आचेवर ग्रेव्ही ठेवा आणि त्यात कॉर्नफ्लोअर पाण्यात भिजवून घाला. जास्त पाणी घालून भाजीचा स्वाद तुम्ही बिघडवू नका हे तुम्ही लक्षात ठेवा.
तुम्हालाही या सोप्या टिप्सचा नक्कीच वापर करून चांगली भाजी मिळवता येईल याची आम्हाला खात्री आहे. या टिप्सचा वापर करा आणि तुम्ही स्वादिष्ट आणि घट्ट रश्शाची भाजी बनवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक