Fitness

दररोज व्यायाम करायचा कंटाळा येतो, या टिप्समुळे मिळेल प्रोत्साहन

Trupti Paradkar  |  Jul 1, 2022
दररोज व्यायाम करायचा कंटाळा येतो, या टिप्समुळे मिळेल प्रोत्साहन

व्यायाम शरीर आणि मन संतुलित राहण्यासाठी गरजेचा असतो. आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi फॉलो करून तुम्ही तुमचे आयुष्य निरोगी आणि आनंदी करू शकता. व्यायामाचे महत्त्व आणि फायदे माहीत असूनही बऱ्याचदा लोकांना  व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. व्यायामाचे महत्त्व नुकते माहीत असून फायदा नाही कारण जोपर्यंत तुम्ही व्यायामातून झालेले परिणाम डोळ्यांनी पाहणार नाही तुम्हाला व्यायामाची गोडी लागणार नाही. यासाठी तुम्ही दररोज स्वतःला व्यायाम करण्यासाठी प्रेरणा मिळेल असं काहीतरी करायला हवं. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत अशा गोष्टी शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला व्यायाम करण्याची प्रेरणा मिळेल.

वेळ ठरवा

एखादी सवय लावण्याची ती गोष्ट नेहमीच्या वेळी न चुकता करायला हवी. असं म्हणतात तुम्ही जर नियमित एकविस दिवस सातत्याने एखादी गोष्ट केली तर त्याची तुम्हाला सवय लागते. यामागे मानसशास्त्रातील संशोधन दडलेलं आहे. फार खोलात न जाता जर तुम्ही फक्त नियमित एकविस दिवस न चुकता दररोज एकच वेळ ठरवली, तर सहाजिकच तुम्हाला व्यायाम करण्याची आपोआप सवय लागेल. तुमच्या दैनंदिन कामात सकाळी अथवा संध्याकाळी यासाठी ठराविक मिनीटे जरूर राखून ठेवा.

पार्टनरसोबत व्यायाम 

व्यायाम अथवा वर्कआऊट करणं अगदी मजेशीर ठरू शकतं. जर तुमच्या जोडीने आणखी कोणी व्यायाम करत असेल तर… पार्टनर योगा अथवा वर्कआऊटचे अनेक प्रकार यासाठीच तयार करण्यात आले आहेत. एकमेकांच्या साथीने तुम्हाला व्यायामाचं प्रोत्साहन मिळू शकतं. असं असेल तर एखाद्या पार्टनरला जरी व्यायामाचा कंटाळा आला तरी दुसऱ्यासाठी ती व्यक्ती नक्कीच व्यायाम करण्यास तयार होते. हसतखेळत, मजामस्ती करत तुमचा व्यायाम कधी होतो हे तुम्हाला कळतदेखील नाही. यासाठी तुमचा जोडीदार, मित्रमैत्रीण, सहकारी यांना व्यायामासाठी पार्टनर करा.

व्यायाम मजेशीर करा

दररोज तुम्ही एकाच प्रकारचा व्यायाम करत असाल तर नक्कीच तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येऊ शकतो. यासाठी दररोज व्यायामाचे निरनिराळे प्रकार ट्राय करा. जसं की एक दिवस धावणे, एक दिवस चालणे, एक दिवस कार्डिओ, एक दिवस योगासने अथवा एखाद्या दिवशी डान्स, झुंबा, एखाद्या दिवशी बास्केटबॉल, बॅटमिंटन असे खेळ असं तुमचं टाईमटेबल बनवा. ज्यामुळे तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येणार नाही. सर्वात महत्त्वाचं आहे दररोज शारीरिक हालचाल होणं आणि त्यातुन तुमची शरीर प्रकृती ठणठणीत राहणं. त्यामुळे तुम्ही कोणता व्यायाम करता यापेक्षा व्यायामात किती रमता हे महत्त्वाचं आहे.

छोटं छोटं यश सेलिब्रेट करा

व्यायाम करताना स्वतःच स्वतःशी काही ध्येय ठरवा. सुरुवातील अगदी छोटी छोटी ध्येय ठरवा. जसं की, पाच किलोमीटर धावणे, वीस पुशअप करणे, अर्धा तास  एखादा खेळ खेळणे. जेव्हा तुम्ही ठरवलेलं टार्गेट साध्य कराल त्यानंतर पुढील ध्येय ठरवा. शिवाय टार्गेट पूर्ण झाल्यावर तो आनंद सेलिब्रेट करायला विसरू नका. ज्यामुळे तुमचा व्यायाम करण्याचा आनंद आणि आत्मविश्वास वाढू लागेल. अगदी थोडंसं वजन कमी झाल्यावर, बेली फॅटमध्ये छोटासा बदल झाला तरी तुम्ही तो आनंद सर्वांसोबत शेअर करायला हवा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Fitness