DIY फॅशन

बंद ब्लाऊजचे गळे असतील तर अशी करा साडी पिनअप

Leenal Gawade  |  Jul 1, 2022
अशी करा साडी पिनअप

फॅशन ही हल्ली प्रत्येक आठवड्याला बदलते. वेस्टर्न कपड्यांसोबत हल्ली साडी हा अनेकांचा आवडीचा पर्याय झाला आहे. आता साडी म्हटली की, साडीवर ब्लाऊज हा आलाच. ब्लाऊजच्या ट्रेंडमध्येही आता बरीच व्हरायटी दिसते. मध्यंतरीच्या काळात थोडे एक्सपोझ करणारे हॉट ब्लाऊज होते. पण आता पुन्हा एकदा बंद गळ्याचे ब्लाऊज ट्रेंडमध्ये आले आहेत. बंद गळ्याचे ब्लाऊज दिसायला एकदम रॉयल असा लुक देतात. पण अशा प्रकारचे ब्लाऊज घातल्यानंतर साडी पीनअप करण्याचा फारच त्रास होतो. खूप जणांना या साडीचा पीनअप कसा करायचा हे कळत नाही. मग होतं असं की, आपण हा ब्लाऊज का शिवला असे वाटू लागते. पण तुम्ही असा एखादा छानसा ब्लाऊज शिवला असेल तर आजची ही ट्रिक तुम्हाला कामी येईल.साडी कशी पिनअप करायचीसाडी नेसायची पद्धत ( Saree) माहीत असली तरी ब्लाऊज कसा पिनअप करायचा हे कळेल.

पिन निवडताना

saree Pin

 बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या पिना मिळतात. आता तरी साडीसाठी कित्येक व्हरायटीच्या पिना मिळतात. पण तुम्हाला कोणताही वेगळा पिन घेण्याची काहीही गरज नाही. याचे कारण असे की, आपण ज्या पद्धतीने पिनअप करणार आहोत तेथे पिन दिसू नये याची खातरजमा तुम्ही करायला हवी. त्यामुळे पिन हा तुमच्या साडीला मिळता जुळता म्हणजेच सोनेरी किंवा चंदेरी असावा. जास्तीत जास्त हल्ली रंगबीरंगी पिन मिळतात ते पिन घेतले तरी चालतील. 

टिप: पिन घेताना ते अणुकुचीदार असायला हवेत. तरच त्यामुळे पटकन पिन अप करण्यास मदत मिळते. 

बंद गळ्यांचे ब्लाऊज असतील तर…

बंद गळ्याचा ब्लाऊज

सगळ्यात आधी तुम्हाला साडी नेसून घ्यायची आहे. निऱ्यांचा भाग सिक्युअर करुन घेतल्यानंतर पदर लावताना अडचणी येत असतील तर या टिप्स करा फॉलो 

  1. बंद गळ्याचा ब्लाऊज असेल तर आपण जिथे रोज साडी पिन लावतो तिथे लावता येत नाही अशा वेळी ब्लाऊजचा मागचा भाग म्हणजे पाठीमागे जिथे ब्लाऊज संपतो. तिथे ब्लाऊज उलट करुन साडी आणि ब्लाऊज पिनअप करा. हे सगळ्यात सोपे जाते. 
  2. जर तुम्हाला मागे ब्लाऊजला पिन लावलेला अजिबात जमत नसेल तर अशावेळी तुम्ही ब्लाऊज थोडा वेळासाठी सैल करुन त्याला रोजच्या प्रमाणे पिन लावून घ्या. तुम्हाला ब्लाऊज अर्धवट काढल्याशिवाय हा पिन लावता येणे शक्य नसते. 
  3. सुळसुळीत आणि पातळ साड्या असतील तर तुम्हाला मागे साड्यांना पिन लावताना त्या अनेकदा पडण्याची शक्यता असते. म्हणजे मागे केवळ एकच पिन लावून चालत नाही. अशावेळी तुम्ही चांगल्या फिटिंगसाठी एक पाठीमागे आणि एक ब्लाऊजच्या शेवटी पिन लावा. 
  4. साड्या खूप जड असतील आणि खास दिवसासाठी तुम्हाला तयार व्हायचे असेल अशावेळी तुम्हाला कसेही पिनअप करुन चालत नाही. अशा साड्या तुम्ही अगदी व्यवस्थित पदर काढून मग त्याला आधी पिनअप करा. त्यासाठी तुम्हाला नीट माप घेणे गरजेचे आहे. तुम्ही तो पदराचा भाग शिवून घेतला तरी चालू शकतो. त्यामुळे ती साडी अगदी नीट राहते. 
  5. साड्या खूप पातळ आणि सहज फाटणाऱ्या असतील अशा वेळी साड्यांना खूप पिन लावणे टाळा. पिना लावताना त्याच्या आत रबर घाला. म्हणजे साडी फाटण्याची भिती राहात नाही. 

आता बंद गळ्यांचे ब्लाऊज पिनअप करताना तुम्ही अशा पद्धतीने साडी पिनअप करा. 

Read More From DIY फॅशन