ख्रिसमस म्हणजेच नाताळ भारतातही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भारतीय सण नसला तरी अनेकांना नाताळची सुट्टी असते. त्यामुळे ख्रिसमसच्या शुभेच्छा एकमेंकाना देणं हे आलंच. लहान मुलांना तर नाताळ खूपच आवडतो. कारण या दिवशी त्यांचा आवडता सांताक्लॉज त्यांच्यासाठी भेटवस्तू घेऊन येतो. मोठी माणसंही एकमेकांसोबत आनंद आणि भेटवस्तू शेअर करत नाताळ साजरा करतात. त्यामुळे नाताळपासून नववर्षांच्या सुरवातीपर्यंत वातावरणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतं. जर यंदा तुम्ही ख्रिसमस घरीच साजरा करायचा विचार करत असाल तर अशी करा पार्टीची तयारी.
असा साजरा करा घरीच ख्रिसमस
ख्रिसमस म्हणजे आनंद आणि मस्तीचे वातावरण, घरात सर्वांना एकत्र बोलवून, एकमेकांना खास भेटवस्तू देत तुम्ही ख्रिसमस साजरा करता. यंदा घरातच हा आनंद साजरा करण्यासाठी असं करा प्लॅनिंग
खास ख्रिसमस केक आणि कूकीज बनवा
लॉकडाऊनमुळे आजकाल प्रत्येक घरात कोणा ना कोणाला बेकिंगची आवड निर्माण झाली आहेच. दिवाळीत जसं आपण फराळ बनवतो तसं ख्रिसमसला केक आणि बेकरी प्रॉडक्ट बनवण्याची पद्धत आहे. यंदा घरीच ख्रिसमस साजरा करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी केक अथवा कूकीज बनवू शकता. ज्यामुळे तुमच्या घरच्यांना तुमच्या हातचे बनवलेले पदार्थ खाता येतील.
घराची अशी करा सजावट
ख्रिसमस साजरा म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत आनंद आणि उत्साहाने करणे. तुम्ही देखील यासाठी खास तयारी करू शकता. आजकाल बाजारात सजावटीचे सामान सहज मिळते. त्यामुळे घरी छान ख्रिसमस ट्री आणि रोशनाईचं सामान घेऊन या आणि तुमचं घर नववर्षाच्या स्वागतासाठी छान सजवा.
ख्रिसमस पार्टीसाठी तयार व्हा
ख्रिसमसला मिळणाऱ्या वस्तू आणि सांताक्लॉज एक्सेसरीज लाल रंगाच्या असतात. तुम्ही दुकानातून अथवा ऑनलाईन त्या मागवू शकता. आजच्या दिवशी खास लाल रंगाचे कपडे आणि थोडा बोल्ड मेकअप करा. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही सांताची टोपी घालू शकता. घरात लहान मुलं असतील तर सांताक्लॉडप्रमाणे तयार होऊन त्यांना भेटवस्तू देऊ शकता. घरातील प्रत्येकाला छोटीशी का होईना एक भेटवस्तू द्या आणि सर्वांसोबत हा आनंद शेअर करा.
ख्रिसमससाठी गिफ्ट आयडियाज (Christmas Gift Ideas In Marathi)
ख्रिसमसची गाणी लावा
ख्रिसमसच्या संध्याकाळी घरात मस्त पार्टीची गाणी अथवा ख्रिसमसची गाणी लावून घरच्यांसोबत अथवा मित्रमैत्रिणींसोबत डान्स करा. ज्यामुळे घरात छान नाताळचे वातावरण तयार होईल. सण कोणताही असला तरी तुम्ही तो कोणासोबत, कसा साजरा करता यावर आनंद निर्माण होत असतो. त्यामुळे तुमच्या प्रियजनांसोबत ख्रिसमस साजरा करा आणि सर्वांना आनंद द्या.
मुलांसाठी ख्रिसमसची खास 80 गिफ्ट्स (Christmas Gifts For Boyfriend In Marathi)
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar