लाईफस्टाईल

दिवाळी फराळाची अशी करा पूर्वतयारी, नंतर होणार नाही त्रास

Leenal Gawade  |  Oct 17, 2021
फराळाची पूर्वतयारी

 दसरा गेला की दिवाळीचे वेध सुरु होतात. आता दिवाळी म्हटली की, फराळ आलाच. प्रत्येकाच्या घरी दिवाळीची चाहुल लागल्यानंतर फराळाचा घमघमाट सुटू लागतो. आता लगेच दिवाळी फराळाची आठवण झाली असेल तर थोडा ब्रेक लावा. कारण फराळाला थोडा अवकाश आहे. पण आयत्यावेळी पूर्वतयारी करण्यापेक्षा आणि सगळा गोंधळ होऊन फराळ फसण्यापेक्षा तुम्ही फराळाची पूर्वतयारी कशी करावी ते देखील जाणून घेऊया. दिवाळीच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही आप्तेष्टांसोबत दिवाळी साजरी करु शकता. फराळाचे काम तुम्हाला आयत्यावेळी करायचे नसेल तर.चला जाणून घेऊया नक्की कशी करावी याची पूर्वतयारी

दिवाळी फराळाची यादी

Instagram

सगळ्यात आधी तुम्ही यंदा कोणता फराळ करणार आहात याची एक यादी करुन घ्या. कारण सगळ्यात महत्वाची पूर्वतयारी असते ती म्हणजे यादी बनवणं. प्रत्येक फराळाला लागणारे जिन्नस रेसिपीनुसार  बदलत असतात. हल्ली सगळेजण मॉल किंवा एखाद्या सुपर मार्केटमधून सामानाची एकदम खरेदी करतात. दसऱ्यानंतर तुम्ही याची शॉपिंग करुन ठेवली तर तुम्हाला दिवाळी दरम्यान होणारी दगदग आणि गर्दीचा त्रास होत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी फराळाची यादी करा. त्या यादीनुसार तुम्ही लगेेचच सगळा कच्चा माल आणून ठेवा.

साखर आणि वेलची पूड

फराळाला चव आणणारा असा पदार्थ म्हणजे साखर आणि खमंग सुवास देणारा पदार्थ म्हणजे वेलची.त्यामुळे तुम्ही घरी जास्तीची साखर, साखर पिठी घेत नसाल तर साखरेची पिठी करुन ठेवा. वेलची पूड ही लाडवापासून ते करंजीपर्यंत सगळ्यामध्ये लागते. करंजी रेसिपी, लाडू रेसिपी त्यामुळे तुम्ही अगदी हमखास साखर आणि वेलची पूड याची तरतूद करुन ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याचा वापर पटकन करता यऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घरात याची पूड करुन चांगल्या एअरटाईट डब्यात भरुन ठेवा.

सुकं खोबरं घ्या खवून आणि भाजून

 खूप फराळामध्ये  सुकं खोबरं वापरलं जातं. सुक्या खोबऱ्याची वाटी जरी विकत घेता येत असतील आणि ती बजेटमध्ये बसतेे. म्हणून अनेक जण खोबऱ्याची वाटी खरेदी करतात. सुकं खोबरं किसणं हे डोक्याला तापदायक असते. कारण खोबरं किसायला बराच वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही सुकं खोबरं किसून ते छान भाजून घ्या. चांगल्या एअर टाईट डब्यात सुकं खोबरं भाजलेलं ठेवून द्या. त्यामुळे ते जास्त काळासाठी टिकते. ज्यावेळी हवे तेव्हा तुम्हाला सुकं खोबरं थेट वापरता येते.

डाळी घ्या भाजून 

खूप जण घरी  डाळी भाजून त्याचे पीठ तयार केले जाते. त्यामुळे तुम्ही चांगल्या सुपर मार्केटमधून चणा डाळ आणून ठेवा. ती स्वच्छ करुन मग भाजली जाते. घरघंटीवर त्याचे पीठ तयार केले जाते. यालाच बेसन असे म्हणतात. पण दुकानातून रेडिमेड आणण्यापेक्षा घरी दळलेले पीठ हे नेहमीच चांगले असते. जर तुम्ही योग्यवेळी डाळ भाजली आणि ती दळायला दिली तर त्यामध्ये काहीही मिक्स होत नाही. 

तूप तेलाची खरेदी

Instagram

तूपाचे फायदे अनेक आहेत. पण दिवाळीत त्याचा वापर हा जास्तीत आहे. दिवाळीच्या दरम्यान तुम्ही खरेदी करायला गेल्यावर खूप जणांची तूपावर उडी असते. खूप जण जास्तीत जास्त तूप खरेदी करतात. तळणीपासून ते लाडू वळण्यापर्यंत खूप जणांचा फराळ हा अस्सल तुपाचा असतो. त्यामुळे तुम्हीही तुपाच्या पिशव्या जास्तीच्या आणून ठेवा. त्यामुळे आयत्यावेळी  गोंधळ होत नाही. तेल असा घटक आहे जो या सगळ्यामध्ये महत्वाचा रोल बजावतो. त्यामुळे तेलाचे कॅनही जास्तीचे आणून ठेवा. 

आता दिवाळीची अशाप्रकारे पूर्वतयारी करा आणि जास्तीत जास्त फायदे मिळवा. 

अधिक वाचा
अनारसे बनवण्याची रेसिपी जाणून घ्या (Anarsa Recipe In Marathi)

बेक्ड फराळ खरंच असतो का हेल्दी, जाणून घ्या सत्य

दिवाळीसाठी बनवा झटपट मावा अनारसा, वेगळी रेसिपी करा ट्राय

Read More From लाईफस्टाईल