Recipes

ताजे मटार साठवून ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Trupti Paradkar  |  Jan 29, 2020
ताजे मटार साठवून ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप-बाय-स्टेप टिप्स

हिवाळ्यात बाजारात भरपूर ताज्या आणि हिरव्यागार भाज्या उपलब्ध असतात. या दिवसांमध्ये मटार ही भाजी खूपच फ्रेश आणि स्वस्त असते. मटारचे दाणे भाजी, पुलाव मध्ये वापरले जातात. मटारमध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि कार्बोहायड्रेड मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे मटारचे दाणे खाणं नक्कीच फायदेशीर ठरतं. जसजसा हिवाळा संपत येतो तसतसा मटारच्या भाजीचा तुटवडा जाणवायला लागतो. शिवाय हिवाळ्यानंतर ही भाजी महागही होते. वास्तविक बाजारात फ्रोजन मटार बाराही महिने उपलब्ध असतात. मात्र ते लवकर शिजत नाहीत. शिवाय त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे ते खाण्यासाठी हितकारकही नसतात. जर तुम्हाला वर्षभर घरचे ताजे मटार हवे असतील तर  तर या स्टेप-बाय-स्टेप टिप्स जरूर फॉलो करा. 

मटार साठवण्याची सोपी पद्धत

ताजे मटार फ्रीजमध्ये साठवून ठेवणं अतिशय सोपं आहे

साहित्य – एक किलो मटार आणि दोन चमचे  साखर 

मटार साठवण्याची प्रक्रिया –

बाजारातून ताजे मटार विकत घ्या. साठवण्यासाठी तुम्ही दे मटार विकत घ्याल त्याच्या शेंगा सुकलेल्या, किडलेल्या, ओलसर नसतील याची काळजी घ्या. मटारचे दाणे सोलून घ्या. सोललेले मटारचे  दाणे स्वच्छ धुवून काढा. चाळणीत निथळत ठेवा ज्यामुळे ते कोरडे राहतील. एका भांड्यात मटारचे दाणे बुडतील एवढं पाणी उकळा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात दोन चमचे साखर घाला. उकळत्या पाण्यात मटारचे दाणे टाका आणि अगदी मोजून दोन मिनीटे दाणे पाण्यात ठेवा. दोन मिनीटांनी गॅस बंद करा आणि मटारचे  दाणे चाळणीत निथळून घ्या. मटारच्या दाण्यांमधील पाणी काढून टाका आणि एका थंड पाण्याच्या भांड्यात निथळलेले मटारचे दाणे टाका. मटार या पाण्यात थंड झाल्यावर ते पुन्हा चाळणीत निथळून घ्या. निथळलेले मटारचे दाणे कोरड्या कापडावर पसरून कोरडे करा. पाणी सुकून कोरडे झालेले मटारचे दाणे प्लास्टिकच्या झिप लॉक बॅगमध्ये भरून ठेवा. आता यानंतर मटारच्या बॅग तुम्ही वर्षभर वापरण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेऊ शकता. प्रक्रिया केलेले मटारचे दाणे अगदी ताज्या मटारच्या दाण्यांप्रमाणेच लागतात. तुम्हाला हवे त्यावेळी तुम्ही मटारचे दाणे वापरू शकता. 

मटारचे दाणे साठवण्यासाठी सोप्या टिप्स –

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा  –

Kitchen Tips : असं केल्यास वाया जाणार नाहीत ‘या’ गोष्टी

म्हणून आहारात हमखास हवी शेपूची भाजी

बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास खा कच्च्या केळ्याची भाजी

Read More From Recipes