Love

तुम्हालाही करायचं आहे का त्याला ‘प्रपोज’ (How To Propose A Boy In Marathi)

Trupti Paradkar  |  Oct 1, 2019
तुम्हालाही करायचं आहे का त्याला ‘प्रपोज’ (How To Propose A Boy In Marathi)

प्रेम ही एक अव्यक्त भावना आहे. डोळ्यांमधून अगदी न बोलताही ते व्यक्त होत असतं. कारण प्रेमाचे धागे नकळत जुळतात. मात्र तरिही समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबदद्ल प्रेमाच्या भावना आहेत की नाही हे जाणून घेणं फार गरजेचं असतं. कारण जर आपला अंदाज चुकला तर गैरसमज होण्याची दाट शक्यता असते. यासाठीच ज्यावर तुमचं मनापासुन प्रेम आहे. त्याला तुमचं प्रेम लगेचच व्यक्त करा. कारण उशीर झाला तर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तीला I Love You बोलण्यासाठी ही माहिती तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकते. जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला आय लव्ह यु सांगायचं असतं तेव्हा पोटात अचानक फुलपाखरं उडू लागतात, ह्रदयाची धडधड अचानक वाढते, हातपाय थंड पडतात, तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नाही. मात्र काहिही असलं तरी प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्व बळ एकवटावं लागतंच. यासाठीच प्रेम व्यक्त करण्यासाठी हे वेगवेगळे प्रकार तुम्हाला फायदेशीर ठरतील. 

shutterstock

प्रपोज करण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या (Take Care Of These Things Before Proposing)

तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास दिवसांची निवड करा. जसं की ‘त्याचा वाढदिवस’ ‘तुमचा वाढदिवस’ किंवा ज्या दिवशी तुम्ही ‘पहिल्यांदा’ भेटला होतात तो दिवस अशा स्पेशल दिवसांची तुम्ही नक्कीच निवड करु शकता. शिवाय प्रपोज करण्याआधी तुम्ही दोघंही आर्थिक आणि भावनिकरित्या या नात्यासाठी खरंच तयार आहात का हे अवश्य तपासा. जर लग्नाचा विचार करणार असाल तर हा निर्णय घेण्यापूर्वी पुढील पाच वर्षांचं नियोजन करा. ज्यामुळे तुम्हाला लग्नाचा निर्णय घेणं अधिक सोपं जाईल.

रोमँटिकली म्हणे मी लव यू (Romantically Say I Love You)

प्रपोज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला जर अगदी रोमॅंटिक पद्धतीने प्रपोज करायचं असेल तर या पद्धतीने तुमच्या भावना जरूर व्यक्त करा.

Read More: Gifts For Boyfriend In Marathi

1. इंटीमेट मेसेज करा (Get Intimate Message)

“जर तुला मी आवडत असेन तर…” किंवा अशा प्रकारच्या प्रेम कवितांच्या ओळी लिहून सिक्रेट नोट्स तयार करा. या नोट्स तुम्ही त्याच्या फोनशेजारी, बॅगेत किंवा वॉलेटमध्ये ठेऊ शकता. ज्या त्याला दिवसभर सापडतील. या चिठ्या वाचून तो विचारमग्न असताना अचानक त्याला प्रत्यक्ष भेटा आणि प्रेमपत्र देऊन तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.

2. ग्रॅन्ड प्रपोजल प्लॅन करा (Plan A Grand Proposal)

जर तुम्ही त्याची अगदी जवळची मैत्रीण असाल तर त्याला प्रपोज करण्यासाठी काहीतरी ‘हटके’ गोष्ट करा. जसं की पाच हजार गुलाबांचा बुके द्या, एखादी रिंग द्या, तलावाशेजारी फॅन्सी डिनर अरेंज करा. तुम्ही तुमच्या मनातील भावना शब्दातून देखील त्याच्यासमोर व्यक्त करू शकता. आम्हाला खात्री आहे या गोष्टी त्याला  नक्कीच आवडतील.

3. सिंपल प्लॅन करा (Make a Simple Plan)

जर तुमच्या बॉयफेन्डला खाजगी गोष्टी जगजाहिर करणं आवडत नसेल तर हे रोमॅंटिक क्षण तुमच्या दोघांमध्येच राहतील असं काहीतरी करा. एखादी मुव्ही नाईट अरेंज करा आणि त्याच्या आवडीचं स्नॅक्स मागवा. जसं की कॅन्डी किंवा पॉपकॉर्न वगैरे. त्या पॉपकॉर्नमध्ये त्याच्यासाठी आणलेली रिंग लपवा. ‘ती’ त्याच्या हाती लागल्यावर हळूच त्याला लग्नासाठी विचारा.

4. रिंग देऊन थेट मागणी घाला (Propose Him With A Ring)

पारंपरिक स्टाईलने मागणी घालणं नेहमीच फायद्याचं ठरतं. प्रेमाची कबुली देण्यासाठी त्याला डेटवर न्या. त्याच्यासमोर गुडघ्यावर बसा व रिंग देऊन तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे ते त्याला सांगा. या प्रकारामुळे त्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण तो खूश नक्कीच होईल हे खरं काळजी करू नका तुमच्या मनातील भावना प्रामाणिकपणे आणि मनापासून सांगा.

5. त्याच्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करा (Show Love To His Loved Ones)

जे आधीपासून लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्यासाठी हे ‘प्रपोजल’ नक्कीच फायद्याचं ठरेल. कारण तुम्ही आधीपासून त्याच्या मित्रांना आणि कुटुंबाला चांगले ओळखत असालच. यासाठी घरी एखादं  फॅमिली गेट-टूगेदर अरेंज करा. ज्यामुळे या खास क्षणांमध्ये तुम्ही त्यांच्या जवळच्या व्यक्तींनादेखील सामील करुन घेऊ शकाल. त्याला रिंग देऊन प्रपोज केल्यावर त्याचा फेव्हरेट केक दोघांनी मिळून कट करा. आम्हाला खात्री आहे यामुळे तो तुम्हाला नक्कीच हो म्हणेल.

6. फ्लॅश बॅक थीम (Flash Back Theme)

ही आठवण अगदी छोटी देखील असू शकते. जसं की तुम्ही पहिल्यांदा भेटला होता ते ठिकाण, तुमच्या रिलेशनशिपमधील एखादा महत्वाचा क्षण ही तुमच्यासाठी प्रपोज करण्याची एक भन्नाट कल्पना ठरू शकते. यासाठी तुम्ही पुन्हा त्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता जिथे तुम्ही पहिल्यांदा भेटला होतात. पूर्वी गेलेल्या एखाद्या हॉलिडेची आठवण म्हणुन पुन्हा तिथेच जाऊ शकता. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा त्याच्यासोबत पहिल्यांदा केलेल्या अनेक गोष्टींच्या ‘तारखा’ तुम्ही नक्कीच लक्षात ठेवता. त्याच क्षणांना उजाळा देत त्याला पटकन I love you म्हणा. 

7. त्याला चांगले वाटेल असं काहीतरी करा (Do Something That Makes Him Feel Good)

यासाठी त्याला जे केल्याने आनंद होईल असं सारं काही करा. जसं की तुम्ही त्याच्यासाठी त्याची आवडती कार दिवसभरासाठी हायर करू शकता. असं केल्याने तो त्याची फेव्हरेट कार दिवसभर ड्राईव्ह करू शकेल. त्याच्या आवडत्या बॅन्डच्या कॉन्सर्टचं तिकीट काढा आणि त्याला सरप्राईज द्या. तुम्ही यासाठी त्याच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी करू शकता. थोडक्यात काय त्याला खूश करुन एखाद्या आनंदी क्षणी तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी शोधा.

8. त्याच्या बेस्ट फ्रेंडला आधी सांगा (Tell His Best Friend First)

तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या बेस्ट फ्रेन्डला तुमच्या निर्णयाबाबत सांगा. बऱ्याचदा बेस्ट फ्रेन्ड एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करतात. त्यामुळे असं केल्याने नक्कीच काहीतरी चांगला मार्ग निघेल. त्याच्या कडून योग्य संकेत मिळाल्यावर त्याला I love you म्हणा.

9. कुटुंबाची संमती मिळवा (Get Family Consent)

त्याच्या कुटूंबियांसोबत वेळ घालवा. विशेषतः त्याच्या भावंडांसोबत मैत्री करा. जर तुम्हाला त्याच्यासोबर खरंच लग्न करायचे असेल तर त्याच्यासाठी ही एक फार मोठी हिंट असू शकेल. शिवाय लग्न झाल्यावर त्याच्या कुटुंबासोबत निर्माण झालेलं हे बॉन्डींग तुम्हाला भविष्यात देखील फायद्याचंच ठरेल. एकदा का तुम्हाला खात्री झाली की लगेच त्याला  थेट विचारा की तुझं माझ्यावर प्रेम आहे का?

10. त्याच्या आवडी-निवडींमध्ये रस घ्या (Become Interested In His Passions)

तुम्ही ज्याच्या प्रेमात आहात किंवा ज्याच्यासोबत तुम्हाला लग्न करावंस वाटतंय त्याला आधी समजून घ्या. ज्यामुळे प्रपोज करणं तुम्हाला अधिक सोपं जाईल. उदा. जर त्याला ट्रेकींग अथवा कॅम्पला जाण्याची आवड असेल तर त्यासाठी त्याला एखाद्या अॅडव्हेन्चर ठिकाणी प्रपोज करा. ज्यामुळे तो नक्कीच खूश होईल. पण जर तो फारच ‘फिल्मी’ वगैरे असेल तर मात्र तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी खासच करणं गरजेचं आहे. जसं की त्याच्या आवडीचं एखादं ‘चॉकलेट’ अथवा ‘फुलं’ देऊन तुम्ही त्याला अगदी सिनेमात दाखविल्याप्रमाणे प्रपोज करु शकता.

shutterstock

या क्रिएटिव्ह पद्धतीने म्हणा ‘I love you’ (Creative Ways To Tell Him ‘I Love You’)

तुम्हाला जर काहीतरी वेगळं करून प्रेम व्यक्त करायचं असेल तर हे प्रकार तुमच्यासाठी अगदी मस्त आहेत.

1. अशक्य गोष्ट करून दाखवा (Do The Impossible Thing)

प्रेमात यश हवं असेल तर तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्याबद्दल विश्वास वाटणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्याच्यासाठी काहिही करू शकता हा विश्वास वाटला तर होकार आलाच म्हणून समजा. यासाठी तुम्ही जी गोष्ट कोणासाठीही करणार नाही अशी गोष्ट त्याच्यासाठी करून दाखवा. केल्यावर तिला ‘आय लव्ह यु’ म्हणा आणि होकार मिळवा. 

2. एखाद्या वेगळ्या भाषेत प्रेम व्यक्त करा (Express Love In A Different Language)

तुमच्या मातृभाषेत अथवा इंग्रजी भाषेत थेट ‘आय लव्ह यु’ म्हणणं अगदी सोपं आहे. मात्र जर तुम्ही इतर एखाद्या भाषेत त्याला आय लव्ह यु म्हटलं आणि  मग त्याने त्याचा अर्थ शोधण्याचा आटापिटा केला तर क्या बात है…

3. एखादा अनपेक्षित किस आणि प्रपोज (An Unexpected Kiss And Prop)

कधी कधी तुमच्या मनात जे आहे तेच त्याच्याही मनात असतं मात्र तुम्ही जोपर्यंत व्यक्त होत नाही तोपर्यंत त्या भावना त्याला समजत नाहीत. यासाठी एखाद्या अनपेक्षित क्षणी तिला किस आणि प्रपोज करून त्याला चकित करा. तुमचं जर खरं प्रेम असेल तर त्याला या  भावना नक्कीच समजतील. 

4.आकाशात हाताने आय लव्ह यु लिहा (Hand Written I Love You in The Sky)

चंदेरी रात्र, लखलखत्या चांदण्या, तुम्ही दोघं आणि निवांत वेळ अशा वेळी अचानक आकाशात हाताने तुम्ही लिहीलेलं आय लव्ह यु त्याला तुमच्या प्रेमात पाडण्यासाठी अगदी भाग ठरेल. तुमच्या बेडरूमच्या छतावर आर्टिफिशिअल गॅलेक्सीने तुम्ही हा अगदी प्लॅन प्रत्यक्षात उतरवू शकता. 

5. सरप्राईझ द्या (Give Surprise)

तुमची तब्येत ठिक नाही असं सांगून तुम्ही त्याला घरी बोलावू शकता. घरी एन्ट्री करतात त्याच्या अंगावर फुलांची उधळण, घरात सगळीकडे केलेलं डेकोरेशन, तुमच्या दोघांचे फोटो असा प्लॅन करा. तो आश्चर्याने पाहिलेलं असताना त्याच्या  डोळ्यात पाहून तुमच्या मनातील भावना व्यक्त करा. 

6. लव्ह पझल (Love Puzzle)

जर तुम्हाला तुमचं खरे प्रेम हवं असेल तर ही कल्पना अगदी मस्त आहे. आजकाल बाजारात किंवा ऑनलाईन लव्ह पझल्स मिळतात. तुम्ही स्वत:देखील एखादं लव्ह पझल तयार करू शकता. हे पझल अथवा कोडं तुमच्या प्रिय व्यक्तीला सोडवण्यासाठी द्या आणि तुमचं  उत्तर मिळवा. 

7. सोशल मीडियावर पोस्ट करा (Post On Social Media)

तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. तुमचं कोणावर तरी प्रेम आहे आणि त्याच्या उत्तराची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात असं लिहा. जर त्याला तुमच्या मनातील भावना समजल्या तर तो सोशल मीडियावर लगेच रिअॅक्ट होईल. मग योग्य वेळ पाहून त्याला प्रपोज करा.

8. बेस्ट व्यक्तिमत्वाचा पुरस्कार द्या (Reward The Best Personality)

तुमची आवडती व्यक्ती जगातील एक बेस्ट व्यक्ती आहे असं त्याला सांगा. एखादे सन्मानचिन्ह त्याला देऊन त्याची प्रशंसा करा. सोबत अशा परफेक्ट व्यक्तीसोबत तुम्हाला संपूर्ण आयुष्य एकत्र राहायला आवडेल असं सांगा. ज्यामुळे तुमच्या मनातील भावना व्यक्त करणं सोपं जाईल. 

9. कॉफी आर्ट (Coffee Art)

कॉफी आणि बरंच काही हे तर तुम्हाला माहीतच असेल. सर्वात जास्त तरूण मुलं मुली एखाद्या कॅफेमध्येच भेटत असतात. तुमच्या प्रिय व्यक्तीला एखाद्या कॅफेमध्ये घेऊन जा आणि कॉफीवर तुमचा लव्ह मेसेज लिहून त्याला कॉफी स्वतः सर्व्ह करा.

10. डायरी गिफ्ट करा (Gift A Diary)

एका डायरीत तुम्ही पहिल्यांदा कधी भेटला, तुम्हाला  तो नेमका कधी आवडू लागला, तुम्ही एकत्र कुठे गेला, काय काय केलं याची नोंद करा. जेव्हा तुम्हाला त्याला प्रपोज करावसं वाटेल तेव्हा त्याला डायरी गिफ्ट करा.

shutterstock

या क्यूट पद्धतीने म्हणा ‘I love you’ (Tell Him You Love Him In A Cute Way )

तुम्ही जिच्यावर अथवा ज्याच्यावर प्रेम आहात ती व्यक्ती जर क्यूट स्वभावाची असेल तर या  पद्धतीने त्याला प्रपोज करा. 

1 . डिनर डेटला जा (Go To Dinner Date)

त्याला एखाद्या डिनर डेटला न्या आणि छान गप्पा मारा. बोलता बोलता अचानक त्याच्या डोळ्यात पाहून तुम्ही तुमच्या मनातील या गोड भावना व्यक्त करू शकता.

2. तुम्ही जसे आहात तसेच राहा (Be What You Are)

जे लोक क्रिएटिव्ह असतात ते एखादं रोमॅंटिक कार्ड अथवा हाताने तयार केलेलं हार्ट देऊन त्यांच्या मनातील भावना व्यक्त करू शकतात. मात्र जर तुम्हाला असं काही येत नसेल तर तुम्ही जसे आहात तसंच व्यक्त व्हा. तुमचा सच्चेपणा त्याला नक्कीच भावेल. त्याच क्षणी पटकन मनातल्या भावना व्यक्त करा. 

 

3. तिच्यासाठी प्ले लिस्ट तयार करा (Create A Playlist)

जर तुम्ही दोघंही गाण्याचे वेडे असाल तर हा प्लॅन अगदी परफेक्ट आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये आय लव्ह यु हे शब्द असलेल्या गाण्यांची प्ले लिस्ट तयार करा. त्याला भेटल्यावर दोघं मिळून ही गाणी ऐका. ज्यातून तुमच्या मनातील संकेत तिला समजतील.  

4.. रोझ गिफ्ट करा (Make A Rose Gift)

मुलींना फुलं आवडतातच. पण मुलांनाही फुलं आवडतात. जर तुम्ही त्याला रेड रोज अथवा त्याच्या आवडीच्या फुलांचा बुके गिफ्ट केला तर तो  नक्कीच समजून जाईल की तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे. या बुकेमध्ये आय लव्ह युची नोट नक्की लिहा.

5. रिंग देऊन थेट मागणी घाला (Propose Him with A Ring)

पारंपरिक स्टाईलने मागणी घालणं नेहमीच फायद्याचं ठरतं. प्रेमाची कबुली देण्यासाठी त्याला डेटवर न्या. त्याच्यासमोर गुडघ्यावर बसा व रिंग देऊन तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे ते त्याला सांगा. या प्रकारामुळे त्याला कदाचित आश्चर्य वाटेल पण तो खूश नक्कीच होईल हे खरं काळजी करू नका तुमच्या मनातील भावना प्रामाणिकपणे आणि मनापासून सांगा.

6. मुव्ही नाईट प्लॅन करा (Plan A Movie Night)

जर तुम्ही एखाद्या अशा मुलाला प्रपोज करताय जो खूप ‘फिल्मी’ आहे. तर मग त्याला त्याच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जा. एखाद्या लेटेस्ट मुव्हीसाठी तुम्ही थिएटरमध्ये जाऊ शकता. मात्र तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या रोमॅंटिक सीन पर्यंत जरुर थांबा. जर त्याला गर्दीच्या ठिकाणी जाणं आवडत नसेल तर त्याच्यासाठी घरीच एखादी मुव्ही डेट प्लॅन करा.

7. अनपेक्षित गिफ्ट द्या (Make An Unexpected Gift)

बऱ्याचदा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आवडी निवडी तुम्हाला माहीत असतात. ज्यामुळे तुम्ही त्याला अथवा तिला त्याच्या आवडीचं गिफ्ट देऊन आय लव्ह यु बोलता. मात्र तिला अथवा त्याला अशक्य वाटेल असं काहीतरी गिफ्ट द्या आणि चकित करा. ज्यामुळे तुम्ही तिच्यासाठी अथवा त्याच्यासाठी काहिही करू शकता हे त्यांना पटेल. 

या 5 हटके पद्धतीने म्हणा ‘I Love You’ (Check out these 5 easy ways to say ‘I Love You’)

जर तुम्ही इतरांपेक्षा थोडे वेगळे असाल तर तुमच्या सर्वच गोष्टी हटके असायला हव्या. मग प्रपोज करण्याची पद्धत तरी साधी असून कसं चालेल.

1.एखादी अॅडव्हेंचर ट्रीप प्लॅन करा (Plan An Adventure Trip)

तुमच्या जोडीदाराला सतत बाहेर फिरण्यात रस आहे का ? मग त्याच्यासाठी एखादी साहसी ट्रीप नक्कीच ऑर्गनाईज करा. ज्यामध्ये त्याच्या आवडीच्या सर्व अॅक्टिव्हिटीज असतील. जसं की, कॅम्पींग किंवा ट्रेकींग वगैरे. अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही फक्त ‘दोघं’च असाल तेव्हा त्याला प्रपोज करा. कारण जर या ट्रीपमध्ये तुमचे इतर मित्रमैत्रिणीदेखील सोबत असू शकतात. पण तरिही ‘या’ स्पेशल क्षणी तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. 

2. फन डे प्लॅन करा (Plan A Fun Day)

जर प्रपोज करण्यापूर्वी तुम्हाला त्याला अगदी खास फिल करायचं असेल तर त्याच्यासाठी एखादा ‘फन डे’ प्लॅन करा. यामध्ये लेझर टॅग, पेंटबॉल, मिस्ट्ररी रुम, ट्रॅम्पोलाईन पार्क अशा अॅक्टिव्हिटीजचा तुम्ही समावेश करू शकता. शिवाय यासाठी तुम्ही एखाद्या अॅडव्हेन्चर पार्कमध्ये देखील जाऊ शकता. पण या सर्व गोष्टींचा आनंद लुटताना त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य येण्याची वाट बघा. हाच तो क्षण हीच ती वेळ…या  आनंदी आणि अत्यंत ‘भावूक’ क्षणी आयुष्यभर असंच मजेत राहण्यासाठी मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असं सांगून मोकळे व्हा.

3. थेट लग्नासाठी मागणी घाला (Propose Him For Marriage)

जर तुमचं त्याच्यावर मनापासून प्रेम असेल तर त्याने पुढाकार घेण्याची वाट मुळीच बघत बसू नका. मात्र “तू माझ्यासोबत लग्न करशील का ?” असं थेट विचारण्यापूर्वी काही गोष्टींचं योग्य प्लॅनींग करा. लक्षात ठेवा तुम्ही कसं प्रपोज करत आहात हे खूप महत्वाचं आहे. सर्व गोष्टी त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेश्या असायला हव्या. 

4. भविष्याबाबत गप्पा मारत प्रपोज करा (Talk About Future)

त्याला तुमच्या दोघांच्या भविष्याबाबत काय वाटतं ते विचारा आणि तुम्हालादेखील तुम्हा दोघांच्या भविष्याबद्दल काय वाटतं हे त्याच्यासोबत शेअर करा. थोडासा अंदाज आला की त्याच्यासमोर तुमच्या मनातील त्या भावना व्यक्त करा.

5. आधी रिलेशनशिप प्लॅनिंग करा (Plan a Relation)

तुम्ही काही काळासाठी फक्त ‘रिलेशनशिप’मध्ये राहून मग पुढे जाऊ शकता. कधीकधी नातं पुढे गेल्यावर ते थोडसं त्रासदायक वाटू शकतं.  पण असं केल्यामुळे कदाचित तुम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखू लागाल. रिलेशनशिप मध्ये असताना तुम्हाला त्याचा मुळ स्वभावदेखील समजू शकेल. एकमेकांना समजून घेतल्यावर लग्नाचा निर्णय घेताना तुम्ही पुन्हा प्रपोज करुन डेटवरदेखील जाऊ शकता. प्रपोज करण्यासाठी  तुम्ही एखाद्या विकेंड रोड ट्रीपवर जाऊ शकता किंवा एखादा स्पेशल कॅन्डल लाईट डिनरदेखील प्लॅन करु शकता. थोडक्यात प्रपोज करण्यासाठी तुम्ही ‘ते’ सर्व काही करु शकता ज्यामुळे तुम्ही दोघं आयुष्यभर ‘या’ आठवणी विसरू शकणार नाही.

फोटोसौजन्य – 

हे ही वाचा

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

प्रेम..प्रेमाची गंमत…प्रेमाची व्याख्या सांगणारे Love Quotes in Marathi

प्रेम कधीच इतकं तितकं नसतं; ते एक तर असतं किंवा नसतं’

Read More From Love