मुलींना मासिक पाळी सुरु झाली की,त्यांना केस यायला सुरुवात होते. काखेत येणारे केस हे पौंगडावस्थेतील मुलींना अजिबात आवडत नाही. कारण याच वयात स्लिव्हलेस किंवा स्पगेटीवाले टॉप घालायला आवडतात. अशावेळी काखेतले केस काढून टाकायची खूप मुलींना इच्छा असते. चुकीच्या पद्धतीने केस काढल्यामुळे पुढे जाऊन केस काढताना अनेक तक्रारी निर्माण होतात. आपल्या पौंगडावस्थेतील मुलीने चुकीच्या पद्धतीने केस काढण्याआधीच तुम्ही तिला केस काढण्यासाठी योग्य मार्गदर्शन करा. कारण असे केले तरच त्यांना पुढे जाऊन केस काढताना कोणताही त्रास होणार नाही.
दर आठवड्यात का घ्यावी चेहऱ्यावर वाफ, काय आहेत फायदे
रेझऱ
कोणतेही केस काढण्यासाठी रेझर हा एक उत्तम पर्याय आहे. पण रेझरचा उपयोग करुन जर मुली केस काढणार असतील तर त्यांना महिलांसाठी मिळणारे खास रेझर घेऊन द्या. कारण अशा रेझरची धार इतर रेझरच्या तुलनेत फारच कमी असते.त्यामुळे त्याने दुखापतही होत नाही. त्यामुळे मुलींना कोणतेही रेझर घेऊन देऊ नका. त्यांना महिलांसाठी मिळणारे खास रेझरच घेऊन द्या.
टिप: रेझरचे ब्लेड योग्य वेळी बदलणे हे फारच गरजेचे असते. त्यामुळे रेझरचे ब्लेड हे काही काळाने बदलणे हे नेहमीच चांगले असते. रेझरचे ब्लेड कधी बदलावे याची योग्य माहितीही तुम्ही तुमच्या मुलींना द्या. म्हणजे स्वच्छताही राखली जाईल.
हाताचा कोपरा आणि गुढघ्याच्या त्वचेची कशी घ्याल काळजी
हेअर रिमुव्हल क्रिम
केस काढण्याचा आणखी एक साधा सोपा पर्याय म्हणजे हेअर रिमुव्हल क्रिम. ही क्रिम लावल्यानंतर तशीच ठेवून द्यावी लागते. त्यानंतर केसांचा रंग आणि आकार बदलू लागला की, आपोआपच केस पुसल्यानंतर निघून लागतात. यामध्ये मेहनत फार नसली तरी घाईच्या वेळेत ही ट्रिक कामी येत नाही. ज्यावेळी तुम्ही अगदी निवांत असता अशाच वेळी तुम्हाला हेअर रिमुव्हल क्रिमचा वापर करता येतो.
टिप: हेअर रिमुव्हल क्रिमचा जास्त वापर करु नये कारण या क्रिमच्या अति वापरामुळे त्वचा अधिक संवेदनशील होण्याची शक्यता असते.
चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय (Tips To Make Face Clean In Marathi)
पौंगडावस्थेतील मुलींना वॅक्स करावे का?
आता वरील दोन पर्याय पाहिल्यानंतर वॅक्स हा आणखी एक पर्याय सुचणं अगदी स्वाभाविक आहे. पण प्रश्न असा पडतो की, या वयातील मुलींनी वॅक्स करावे की नाही. तर याचे उत्तर स्वाभाविकपणे ‘नाही’ असे आहे. पौंगडावस्थेतील मुलींची त्वचा ही फारच नाजूक असते. वॅक्समध्ये केस काढण्यासाठी ते ओढले जातात. त्यामुळे त्यांची त्वचा दुखावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे साधाऱण 15 ते 16 या वयोगटातील मुलींना वॅक्स करुच नये. पार्लरमध्ये शक्यतो या वयाच्या मुलींचे केस काढत नाहीत. पण हल्ली या वयोगटातील मुली या फारच मोठ्या दिसत असल्यामुळे आणि त्यांच्या केसांच्या वाढीमुळे त्यांचे केस काढण्यास होकार दिला जातो. पण हा पर्याय तुम्ही शक्यतो टाळलेला बरा.
केस काढण्याची दिशा
- केस ज्यावेळी पहिल्यांदा काढले जातात. त्यावेळीच ते योग्य काढले गेले तर पुढे केस काढताना कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे केस हे एकाच दिशेने काढावे. त्यामुळे केसांची वाढही योग्य येते.
- केसांची पूर्ण वाढ झाल्याशिवाय केस काढायला लावू नये. कारण केस सतत काढण्यासाठी प्रयोग केल्यामुळे ती जागा काळी पडण्याची शक्यता अधिक असते.
आता तुमच्याही मुली वयात येत असतील तर या गोष्टींची काळजी जरुर घ्या. प्युबिक हेअर काढण्याची योग्य पद्धत शिकवा