DIY फॅशन

हाय हिल्स फुटवेअरची काळजी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Vaidehi Raje  |  Jun 29, 2022
taking care of high heels

हाय हिल्स वापरणे प्रत्येकालाच जमेल असे नाही पण प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिला सहजतेने हाय हिल्स कॅरी करता यावेत. कारण हाय हिल्स शरीराच्या पोश्चरला परफेक्शन देण्याबरोबरच आत्मविश्वास देखील वाढवतात यात शंका नाही. तुम्ही ऑफिसमध्ये असलात काय किंवा पार्टीत, एखाद्या लग्नकार्यात असलात किंवा मैत्रिणींबरोबर लंच डेटला गेला असलात तरी या पार्टी लव्हर हाय हील्स तुम्हाला ‘टॉप’ फिलिंग देतात. अनेक तज्ज्ञ सांगतात की सतत हाय हिल्स वापरणे आपल्या पाठीसाठी व टाचांसाठी देखील योग्य नाही. तरीही आपले हिल्स प्रेम काही कमी होत नाही. चान्स मिळेल तेव्हा आपण हाय हिल्स घालण्याची हौस भागवून घेतो. पण आपण आपल्या कपड्यांची, पायांची, टाचांची जशी काळजी घेतो तशीच हाय हिल्सची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे जेणेकरुन ते आपली पर्सनॅलिटी चांगली ठेवण्यासाठी आपल्याला दीर्घकाळ साथ देतील. तुमची सुंदर हाय हिल्सची पादत्राणे वर्षानुवर्षे नवीन कशी ठेवायची व त्यांची काळजी कशी घ्यायची हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. 

पादत्राणांच्या स्वच्छतेची काळजी घ्या 

जर तुमच्याकडे लेदर हाय हिल्स असतील तर त्या घालण्याआधी त्यांना मऊ कापडाने पॉलिश करा जेणेकरून त्या चमकदार दिसतील आणि जर तुमच्याकडे स्वीडिश हाय हिल्स असतील तर तुम्हाला त्यांची थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. या हिल्स स्वच्छ करण्यासाठी, स्वीड इरेजर वापरा जेणेकरून त्यावरील माती आणि डाग सहज काढता येतील. पाणी आणि घाणीच्या वारंवार संपर्कात आल्याने तुमच्या हाय हिल्स खराब होऊ शकतात.  म्हणून स्टोरेज करण्यापूर्वी त्यांना पूर्णपणे स्वच्छ करा आणि मगच त्यांना कपाटात ठेवा. जर तुम्हाला तुमच्या पादत्राणांचे  आयुष्य वाढवायचे असेल तर त्यांना पूर्णपणे स्वच्छ ठेवा. त्यांच्यावरील धूळ साफ करण्याव्यतिरिक्त, त्यांच्या मटेरियलनुसार आवश्यक तो स्प्रे वापरा. पादत्राणांवरचे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही जी काही पद्धत वापरत आहात त्यामुळे त्यांचा रंग खराब होणार नाही याची काळजी घ्या.

Taking Care Of High Heels

हिल्स योग्य ठिकाणी ठेवा 

दिवसभर हाय हिल्स घातल्यावर, घरी आल्यावर त्या काळजीपूर्वक काढून ठेवा. त्यांना पूर्णपणे स्वच्छ करा आणि दिवसभराच्या धावपळीत ते खराब झाले आहेत का ते तपासा. त्यांचे काही नुकसान झाले असेल किंवा त्यांच्यावर  ओरखडे आले असल्यास ते वेळीच दुरुस्त करून घ्या. तुमचे हाय हिल्सचे शूज असल्यास त्यात कोळसा ठेवा. त्यामुळे आर्द्रतेमुळे येणारा कुबट वास तुमच्या हिल्सला लागणार नाही. तसेच, तुमच्या पादत्राणांसाठी  एक चांगले कपाट निवडा जिथे ते भिजणार नाहीत व त्यांचे आर्द्रतेमुळे नुकसान होणार नाही. 

हिल्सची वेळोवेळी दुरुस्ती करून घ्या  

आपले शूज दिवसभर आपल्याला आधार देतात. अशा परिस्थितीत, त्यांचे नुकसान होणे अटळ आहे, जे आपण टाळू शकत नाही. जरी स्टॉपर्स, हिल्सच्या टोकाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात, तरीही सततच्या वापराने पादत्राणे खराब होताच. म्हणूनच ते पुन्हा परिधान करण्यापूर्वी, त्यांची दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. 

Taking Care Of High Heels

हिल्सला एक दिवस सुट्टी द्या 

दररोज हिल्स घालणे तुमच्या शरीराच्या पोश्चरसाठी आणि तुमच्या टाचांसाठी हानिकारक असू शकते. सतत हाय हिल्स वापरल्याने तुमच्या पायांना दुखापत होण्याचा धोका तर आहेच पण तुमच्या अमूल्य हाय हिल्सचेही नुकसान होईल. त्यामुळे हिल्सना मधून मधून विश्रांती द्या. यामुळे तुमच्या पायांना देखील आराम मिळेल. तसेच  हील्स घातल्यानंतर जोरात किंवा घाईत चालण्याऐवजी हलकेच चालावे हे लक्षात ठेवा. जर तुमची चालण्याची शैली योग्य नसेल तरीही तुमची पादत्राणे लवकर खराब होऊ शकतात. 

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हाय हिल्सची काळजी घेऊ शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन