DIY सौंदर्य

या वेडिंग सीझनमध्ये सतत मेकअप करुन घालवू नका ग्लो, फॉलो करा या टिप्स

Leenal Gawade  |  May 4, 2022
सतत मेकअप करताय

सध्या लग्नाचा सीझन जोरदार सुरु आहे. या सीझनमध्ये तुमच्याकडेही अनेक लग्न असतील. आता लग्नात जायचे म्हणजे नीट तयार होऊन जाणे आलेच. अशावेळी चेहऱ्याला मेकअप न करता जाणाऱ्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतील. तुम्ही सतत लग्नाला जात असाल किंवा तुमच्या घरात सतत काही कार्यक्रम असतील. सतत मेकअप होत असेल तर अशावेळी चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो जाण्याची शक्यता जास्त असते. या वेडिंग सीझनमध्ये तुमच्या चेहऱ्याचा ग्लो जाऊन नये असे वाटत असेल तर तुम्ही काही रुटीन फॉलो करायला हवे.

स्किनकेअर महत्वाचे

या काळात स्किनकेअर करण्याची टाळाटाळ अजिबात करु नका. मेकअप खूप करायचा नसेल तर तुमची स्वत:ची त्वचा चांगली असायला हवी.  त्यासाठी तुम्ही चांगले स्किनकेअर फॉलो करा. त्वचेला उत्तम मॉश्चरायझर लावा. त्यामुळे त्वचा आतून अधिक चांगली राहते. मेकअप ही चांगला राहतो. इतकेच नाहीतर तर मेकअप काढल्यानंतर त्वचाही चांगली राहण्यास मदत मिळते.

आईस आईस बेबी

उन्हाळ्यात त्वचा अति संवेदनशील झालेली असते. त्यामुळे त्वचेवर मेकअप केल्यानंतर तो फुटणे आणि काढल्यानंतर जळजळ जाणवणे अगदी स्वाभाविक आहे. मेकअप काढल्यानंतर त्वचा फुटल्यासारखी वाटत असेल तर तुम्ही मेकअप करण्यापूर्वी आणि काढल्यानंतर बर्फाचा शेक द्यायला अजिबात विसरु नका. त्यामुळे मेकअप चांगला राहतो. शिवाय मेकअपनंतर झालेली हानी भरुन निघण्यासही मदत करतो.

मेकअप लावताना

लग्नाच्या या सीझनमध्ये मेकअप करण्याची घाई आपल्याला इतकी असते की, कधी कधी मेकअप नीट केला जात नाही. म्हणजे सगळ्या स्टेप्स फॉलो होत नाही. पण कोणताही मेकअप करताना तुम्ही चेहरा मॉश्चराईज करणे आणि प्रायमर लावणे गरजेचे असते. प्रायमर लावल्यामुळे त्वचेवर एक संरक्षण कवच तयार होते. त्यामुळे त्वचा खराब होत नाही.

चांगले मेकअप प्रॉडक्ट

मेकअप प्रॉडक्ट हे देखील तुमच्या त्वचेसाठी मॅटर करतात. मेकअप प्रॉडक्ट उत्तम असतील तर तुमच्या त्वचेला हानी होत नाही. त्यामुळे मेकअप प्रॉडक्ट चांगले वापरा. सतत मेकअप करणारे असाल तर तुम्हाला असे करणे गरजेेचे आहे. चांगले मेकअप प्रॉडक्ट आणि क्लिनझर असेल तर त्वचा स्वच्छ राहण्यास मदत मिळते. 

आता या वेडिंग सीझनमध्ये मस्त मेकअप करा आणि त्वचेची काळजी ही घ्या.

Read More From DIY सौंदर्य