DIY सौंदर्य

हिटमुळे चेहऱ्यावर येत असतील मोठ्या पुळ्या, तर एकदा वाचा

Leenal Gawade  |  Apr 4, 2022
summer-pimples

 यंदा देशात जितकी थंडी अनुभवायला मिळली. त्या दुप्पट आता उन्हाळ्याचा त्रास होऊ लागला आहे. हवेत इतका दमटपणा आहे की घामाघुम झाल्यावाचून राहात नाही. त्यातच ज्यांची त्वचा ही अति संवेदनशील असते अशांना या दिवसात अनेक समस्या उद्धभवू लागतात. तुमचीही त्वचा नाजूक असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर इतरवेळी कधीही न येणाऱ्या पुळ्या येत असतील तर पॅनिक होऊ नका. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेता येईल. असे केले तर पुळ्या आल्यानंतर तुमच्या त्वचेची सूज आणि लालसरपणा कमी होण्यासही मदत मिळेल.

पाणी प्या

उन्हाळ्यात शरीराला खूप जास्त पाण्याची गरज असते. या दिवसात शरीर हायड्रेट ठेवणे फारच जास्त गरजेचे असते. शक्य असेल तेव्हा तुम्ही पाण्याचे सेवन करा. शरीराला आवश्यक असलेले पाणी तुम्ही प्या. त्यामुळे तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल.उन्हाळ्याच्या या दिवसात कैरी, आंबा असे आपण सेवन करत असतो. त्यामुळे शरीरात उर्जा वाढलेली असते. त्यामुळेही शरीरात उष्णता तशीच राहते. तुमच्याही शरीरातील उर्जा या काळात वाढली की, त्याचे रुपांतर मोठ मोठया पिंपल्समध्ये होऊ लागते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करा. त्याचा फायदा तुम्हाला होतो. 

चेहरा पाण्याने धुवा

चेहरा आपण फेसवॉशने धुतो. पण सतत फेसवॉशने चेहरा धुण्याची तशी काहीही गरज नसते. उन्हाळ्यात केवळ साधे नळाला येणारे पाणी जरी आपण तोंडावर मारले तरी देखील आपला एक थंडावा मिळतो. त्वचेवर ओपन झालेले पोअर्स त्यामुळे बंद होण्यास मदत मिळते. वातावरणामुळे आपल्या चेहऱ्यावरील पोअर्स ओपन झालेले असतात. त्यामध्ये धूळ, माती गेली मग आपल्याला पिंपल्स येण्याचा त्रास होत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही बागेरुन याल आणि थोडा वेळ थांबाल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा छान पाण्याने धुण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होतो आणि पोअर्स बंद होण्यास मदत मिळते. ज्यांना ओपन पोअर्सचा त्रास असेल अशांनी विशेष काळजी घ्यायला हवी आणि या गोष्टींचे पालन करायला हवे.

अति उष्णता देणारे प्रॉडक्ट टाळा

खूप जणांना नित्यनेमाने काही प्रॉडक्ट चेहऱ्यासाठी वापरण्याची सवय असते. त्यामध्ये जर उष्णता देणारे घटक जसे की, हळद, केशर, टी ट्री अति प्रमाणात असतील तर त्याचा त्रास त्वचेला नक्कीच होतो. संवेदनशील त्वचेवर हे उष्णता देणारे प्रॉडक्ट आपला विपरित परिणाम दाखवत असतात.  तुम्ही जे प्रॉडक्ट इतर वातावरणात वापरता ते तुमच्या त्वचेसाठी उन्हाळ्यात चालतील असे नाही. हे अगदी कपड्यांप्रमाणे आहे. तुम्हाला थंडीतील कपडे उन्हाळ्यात चालत नाहीत. तसेच तुम्हाला प्रॉडक्ट देखील या दिवसात चालत नाहीत. याचा विचार करुन तुमचे प्रॉडक्ट बदला. गुलाबपाणी किंवा ॲलोवेरा असे घटक असलेले प्रॉडक्ट वापरा. 

चेहऱ्यावर वाफ घेणे टाळा

उन्हाळ्याच्या या दिवसात अनेक लग्न कार्य असतात. अशावेळी फेशिअल करणे येतेच. पण तुम्हाला जर संवेदनशील त्वचेचा त्रास असेल तर तुम्ही चेहऱ्यावर वाफ घेणे टाळायला हवे. वाफ घेतल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.  जर तुम्हाला फेशिअल करायचेच असेल तर तुम्ही कमीत कमी वेळासाठी वाफ घ्या. त्यामुळेही तुमच्या पुळ्या नियंत्रणात राहतील. तुम्हाला इतर कसलाही त्रास होणार नाही.

पुळया फोडू नका

अनेकदा या आलेल्या पुळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पस साचतो. या पसमुळे खरंतर ही पुळी खूप जास्त दुखते. ही पुळी फोडून टाकावी आणि त्यातून मुक्त व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती फोडायच्या भानगडीत पडू नका. जर ती खूपच फुगली असेल आणि तिच्यातून पस बाहेर यायला सुरुवात झाली असेल तर ती पुळी थोडीशी दाबून स्वच्छ करणे कधीही चांगले. असे करताना तुम्हाला प्रोफेशनलची मदत घेता आली तर चांगले. कारण अशा पुळ्या सतत दाबणेदेखील चांगले नाही. खूप दाबल्यामुळे त्याचा त्रास अधिक होतो. त्याला आजुबाजूला सूज येते. त्यामुळे पुळी फोडणाऱ्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा. 

आता तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करा. 

Read More From DIY सौंदर्य