Recipes

ब्रेड सुकला असेल देऊ नका फेकून, असा करा वापर

Dipali Naphade  |  Nov 20, 2020
ब्रेड सुकला असेल देऊ नका फेकून, असा करा वापर

घरात बऱ्याचदा ब्रेड आणल्यानंतर काही स्लाईस उरतात अथवा शेवटचा आणि पहिला ब्रेड खाल्ला जात नाही. कधी कधी ब्रेड आणल्यानंतर वेगळा काहीतरी नाश्ता होतो आणि मग ब्रेडचे स्लाईस उरतात आणि ते सुकतात. अशावेळी ब्रेड खाताही येत नाही आणि टाकणंही जीवावर येतं. पण या सुकलेल्या ब्रेडचाही तुम्हाला उपयोग करता येऊ शकतो. ब्रेड सुकला असेल तर तो फेकून देऊ नका. त्याचा कसा उपयोग करायचा ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. त्यासाठी काही टिप्स तुम्ही जाणून घ्या आणि त्याचा वापर करा. तुम्हाला आम्ही काही सोप्या टिप्स देणार आहोत. ब्रेड सुकला असेल तर तुम्ही या टिप्स वापरून त्याचा वापर करा आणि कुकिंगसाठी उपयोग करा. शेवटच्या उरलेल्या ब्रेडच्या तुकड्यांचे आणि सुकलेल्या ब्रेडचा वापर करण्याच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घ्या.

सुकलेल्या ब्रेडचे बनवा ब्रेड क्रम्स

Instagram

सुकलेला ब्रेड फुकट न घालविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही ब्रेड क्रम्स बनवा. तुम्हाला ब्रेड क्रम्सचा उपयोग बरेच पदार्थ बनविण्यासाठी होऊ शकतो. विशेषतः कटलेट्स अथवा अन्य काही असे पदार्थ जे तुम्हाला कुरकुरीत करायचे आहेत त्यासाठी तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता. यामुळे ब्रेड फुकटही जात नाही आणि त्याचा व्यवस्थित उपयोगही होतो. तसंच तुम्हाला त्याचा अधिक स्वादही घेता येतो. ब्रेड क्रम्स तुम्हाला स्टोअरही करून ठेवता येतात.  काही वेळा ब्रेड खराब होतो असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स व्यवस्थित स्टोअर करून ठेऊ शकता. त्यासाठी तुम्ही ब्रेड क्रम्स थोडेसे रोस्ट करून घ्या आणि बरणीमध्ये गार झाल्यावर भरून ठेवा. हे ब्रेड क्रम्स जास्त काळ टिकतात आणि तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येतो. 

फिटनेससाठी ब्राऊन ब्रेड खाताय? जाणून घ्या ब्राऊन आणि व्हाईट ब्रेडमधील फरक

ब्रेड क्रूटॉन्स बनवा

Instagram

ब्रेड क्रूटॉन्स बनवून त्याचा तुम्ही टॉमेटो सूप्समध्ये वापर करून घेऊ शकतो. कधी कधी तुम्ही नुसते खाण्यासाठीही याचा उपयोग करून घेऊ शकता. ब्रेड क्रूटॉन्स बनविण्यासाठी तुम्ही सुकलेल्या ब्रेड्सचे बाजूचे काठ कापा आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे ब्रेड्स कापून घ्या. तुम्हाला सूपमध्ये ब्रेड क्रूटॉन्स वापरायचे असतील तर चौकोनी आकाराचे तुकडे तुम्ही वापरा आणि जर कोणत्या चटणीसह अथवा स्नॅक्स म्हणून खायचे असतील तर तुम्ही उभ्या चकत्यांच्या स्वरूपात कापा. असे करणे तुम्हाला जास्त सोयीस्कर आहे. मध्यम आचेवर गॅस ठेऊन तुम्ही हे तळून घ्या आणि याचा आस्वाद घ्या. तळून झाल्यावर तुम्ही सूप्समध्ये घालूनही खाऊ शकता अथवा तुम्ही कोणत्याही चटणीसह खाऊ शकता. जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करून घेऊ शकता अथवा आरोग्याची जास्त काळजी असेल तर एअरफ्रायरमधूनही काढू शकता.

घेर आलेलं पोट कमी करायचं असेल तर ‘हे’ पदार्थ खाणं करा बंद

 

ब्रेडचे करा चविष्ट समोसे

सुकलेल्या ब्रेडचे तुम्ही चविष्ट समोसेही तयार करू शकता.  कधीकधी संध्याकाळी काय खायचं याची चिंता असेल तर तुम्ही नक्की हे ट्राय करून पाहा. यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही सुकलेले ब्रेडचे काठ कापून घ्या.  त्यानंतर याचे काप करा आणि त्यांना समोशाचा आकार द्या. हाताला थोडं पाणी लावा आणि त्यामध्ये उरलेल्या भाज्यांचे बनवलेले सारण घाला.  तुम्हाला हवं तर यामध्ये चीजही तुम्ही किसून  घालू शकता. समोशाचा आकार देऊन तेलात तळा अथवा शॅलो फ्राय करा. चटणीसह खायला द्या. 

बेकरीसारखा लुसलुशीत लादीपाव करा घरीच,परफेक्ट रेसिपी

बर्गरवाले बन उरल्यास वापरा असे

Instagram

कधी कधी बर्गर करण्यासाठी आणलेले बन उरतात मग अशावेळी टाकून देण्यापेक्षा तुम्ही एका पाण्याच्या भांड्यातून हे  बन बाहेर काढा आणि केवळ 30 सेकंदासाठी मायक्रोवेव्ह करा. हे पुन्हा रिफ्रेश होतील. पण पाण्यात राहू देऊ नका. पटकन बाहेर काढा आणि त्यातील पाणी काढून टाका अथवा  दुसरी पद्धत म्हणजे ब्रशने या बनवर पाणी लावा आणि हा बन मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Recipes