DIY फॅशन

न्यूड ब्रा घालताना करू नका या चुका, वापरा अशा पद्धतीने

Dipali Naphade  |  Jun 14, 2022
how-to-wear-a-nude-bra-easy-tips-in-marathi

कोणताही ड्रेस अथवा कपडे तेव्हाच चांगले दिसतात, जेव्हा त्यातील इनर्स अर्थात ब्रा चे फिटिंग चांगले असते. चांगल्या ब्रा च्या फिटिंगसह कोणत्या कपड्यांवर कोणती ब्रा घालायला हवी हे माहीत असणंही तितकंच गरजेचे आहे. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा मिळतात. पण त्यातही आजकाल न्यूड ब्रा (Nude Bra) अधिक प्रमाणात वापरली जाते. न्यूड ब्रा वेगवेगळ्या आऊटफिट्ससह घातली जाते. मात्र अनेकदा न्यूड ब्रा चा वापर करताना महिला चुका करतात. तुम्ही जर न्यूड ब्रा वापरणार असाल तर तुम्ही काही चुका करणे टाळायला हवे. नक्की या कोणत्या चुका आहेत आणि न्यूड ब्रा कशी वापरावी याची महत्त्वाची माहिती. 

कोणत्या फॅब्रिकसह घालावी न्यूड ब्रा

न्यूड रंगाच्या अनेक ब्रा तुम्हाला बाजारात मिळतात. मात्र कोणत्या कपड्यांसह न्यूड ब्रा घालावी याची माहिती तुम्हाला असायला हवी. कारण ही माहिती नसल्यामुळेच अनेक चुका महिलांकडून घडतात. यासाठी काही सोप्या टिप्स – 

न्यूड ब्रा च्या शेड्सचीही घ्या काळजी (Nude Bra Shades)

तुम्ही एखाद्या विशिष्ट ड्रेससह न्यूड ब्रा घालणार असाल तर लक्षात घ्या की, ब्रा ची शेड निवडताना तुम्ही काळजी घ्या. वास्तविक न्यूड ब्रा तुमच्या स्किन टोननुसार बाजारातून मिळते. तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली तर तुमचा ड्रेसचा लुक खराब होणार नाही. तसंच ब्रा चा पट्टा कपड्यातून बाहेर आला तरीही पटकन एखाद्याच्या लक्षात येत नाही. न्यूड ब्रा मध्ये मोव्ह, सिनेमन, बदामी, मोका, एक्स्प्रेसो, कोको ब्राऊन, पीच, बेज, एपिकॉट असे अनेक रंग मिळतात. तुम्ही तुमच्या कपड्यांच्या रंगाच्या हिशेबाने या न्यूड ब्रा च्या शेडची निवड करावी. 

ब्रा चा आकार (Size Of Bra)

तसं तर तुम्ही न्यूड शेडची ब्रा घातली आहे किंवा कोणतीही इतर ब्रा घातली असेल तरीही तुम्ही ब्रा च्या आकाराचा विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही जर ब्रा चा योग्य आकार निवडला नसेल तर त्याचा तुमच्या आऊटफिट्सवर नक्कीच चुकीचा परिणाम होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्तनांच्या आकारापेक्षा कमी अथवा अधिक आकाराची ब्रा निवडू नका. तसंच तुम्ही तुमचे स्तन व्यवस्थित ब्रा मध्ये समाविष्ट करून घ्या. तरच आऊटफिट व्यवस्थित दिसू शकेल. स्वतःसाठी योग्य आकाराची ब्रा कशी निवडायची हे प्रत्येक महिलेला माहीत असायला हवे.

ब्रा ची पट्टी असायला हवी परफेक्ट (Perfect Bra Strips)

बाजारामध्ये ब्रा सह त्याची पट्टीदेखील वेगवेगळ्या पद्धतीची आणि डिझाईनर मिळू लागली आहे. तुम्ही जर न्यूड शेड ब्रा घालणार असाल तर त्याच्या पट्टीची निवड करतानाही तुम्ही काही काळजी घ्यायला हवी. तुम्ही ज्या न्यूड शेडची निवड केली असेल, त्याची पट्टीही त्याच रंगाची असायला हवी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला ट्रान्सपरंट (Transparent Bra Strips) अर्थात पारदर्शी पट्टीही लाऊ शकता. 

आम्ही तुम्हाला वर सांगितलेल्या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील आणि तुम्ही या टिप्सचा वापर करून अधिक स्टायलिश फॅशन करू शकता हे नक्की!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY फॅशन