डेनिम शॉर्ट्स अत्यंत कॅज्युअल असे आऊटफिट आहे आणि प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच डेनिम शॉर्ट्स असतात. पण काही मुली या डेनिम शॉर्ट्स (Denim Shorts) एकाच पद्धतीने घालणे याला प्राधान्य देतात. डेनिम शॉर्ट्स हे साधारणतः कॅज्युअल आऊटफिटमध्ये येते आणि तुम्ही नियमित याचा वापर करू शकता. पण डेटिंग करतानाही तुम्ही डेनिम शॉर्ट्स घालू शकता आणि तुमचा लुक अधिक युनिक बनवू शकता. इतकंच नाही तर डेनिम शॉर्ट्स नेहमी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तुम्ही करून वेगवेगळा नवा लुक करू शकता. वास्तविक तुम्ही जर कधी वेगळा लुक केला नसेल तर डेनिम शॉर्ट्स कसे वापरायचे याच्या सोप्या टिप्स तुम्हाला या लेखातून घेता येतील. तुम्हाला या टिप्स आणि आयडिया नक्कीच आवडतील.
कॅज्युअल टी-शर्टसह
तुम्हाला कॅज्युअलसह डेनिम शॉर्ट्स घालायचे असतील तर हा सर्वात सोपा आणि अप्रतिम पर्याय आहे. तुम्ही कोणत्याही कॅज्युअल टी – शर्टसह याचा वापर करू शकता. हा पेहराव तुम्हाला आरामदायी आणि स्टायलिश लुक देऊ शकतो. त्यासाठी तुम्ही केवळ टी-शर्ट सह डेनिम शॉर्ट्सची जोडी वापरा. तुम्ही हा लुक घरी असतानाही कॅरी करू शकता. तर बाहेर जाताना तुम्ही हा लुक केलात तर यावर स्निकर्स घाला. त्यामुळे तुमचा लुक अधिक उठावदार दिसून येईल.
क्रॉप टॉपमध्ये दिसाल स्टायलिश
तुम्ही सुट्टीवर असाल आणि फिरायला जाणार असाल अथवा कुठेही आऊटिंगला जाताना तुम्ही डेनिम शॉर्ट्स घालायचे असतील तर तुम्ही त्यावर क्रॉप टॉपचा पर्यायही निवडू शकता. तुम्ही डी व्ही नेक क्रॉप टॉप सह अनेक प्रकारच्या क्रॉप टॉपचा पर्याय यासाठी निवडू शकता. यासह डेनिम शॉर्ट्स घातल्यास, तुम्हाला एक वेगळा आणि स्टायलिश लुक मिळतो. तसंच यासह तुम्ही एक नाजूक पेंडंट, एक घड्याळ आणि स्निकर्स घातले की तुमचा लुक पूर्ण झाला.
टँक टॉपसह घाला डेनिम शॉर्ट्स
तुम्हाला तुमचा लुक अधिक वेगळा करायचा नसेल आणि काही त्यासह वेगळे प्रयोग करायचे नसतील तर तुम्ही डेनिम शॉर्ट्ससह टँक टॉप घालू शकता. तुम्हाला बाहेर जाताना अथवा मित्रमित्रिणींबरोबर फिरायला जाताना हा लुक करणे अतिशय आरामदायी आहे. यासह तुम्ही स्निकर्स आणि गॉगल्सचा वापर करा. तुमचे फोटोही मस्त येतील. तसंच तुम्ही स्ट्रीट लुक कॅरी करण्यासाठी यावर एक नाजूकसे पेंडंट घाला. तुम्हाला एक अप्रतिम लुक मिळेल.
अधिक वाचा –स्टायलिश दिसण्यासाठी व्हाईट शर्ट असा करा कॅरी
जॅकेटने करा कलर ब्लॉकिंग
डेनिम शॉर्ट्सह टॉप हा नक्कीच एक क्लासी लुक आहे. पण तुम्हाला हा लुक कलर ब्लॉकिंग करायचा असेल अथवा या लुकला एखादा ट्विस्ट द्यायचा असेल तर तुम्ही यासह रंगबेरंगी अथवा कलरफुल जॅकेटचा वापर करू शकता. टॉपवर तुम्ही असे जॅकेट घातल्यास अजून वेगळा लुक मिळतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा वापर करा आणि जॅकेटचा रंग निवडा.
अधिक वाचा – डेनिमचे जॅकेट आवडतात, मग हिवाळ्यात ट्राय करा हे प्रकार
ऑफ शोल्डर टॉपसह वापरा
ऑफ शोल्डर टॉप दिसायला अत्यंत सुंदर आणि क्लासी दिसतात. पण तुम्ही ते योग्यरित्या कॅरी करायला हवेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डेनिम शॉर्ट्ससह ऑफ शोल्डर टॉप वापरा. आपल्या जोडीदारासह ब्रंच प्लॅन असेल अथवा डेटवर जात असाल तर तुम्ही हा लुक नक्कीच करू शकता. आपला लुक अधिक उठावदार आणि फेमिनिन बनविण्यासाठी तुम्ही हाय हिल्सचा वापर करा आणि मोठे कानातले घातल्यास, गळ्यात काहीही घालू नका. जर तुम्ही गळ्यात पेंडंट घातले तर कानात काहीही घालू नका. हा तुमचा परफेक्ट लुक होईल.
शर्टासह करा स्टाईल
शर्टासहदेखील तुम्ही डेनिम शॉर्ट्स घालू शकता. तुम्ही यासह प्लेड शर्ट घाला अथवा अन्य पद्धतीनेही तुम्ही शर्टाचा वापर करू शकता. प्लेन पांढऱ्या टी-शर्टसह अथवा तुम्हाला आवडेल त्या फिकट रंगासह तुम्ही डेनिम शॉर्ट्सचा वापर करा. त्यावर तुम्ही रंगबेरंगी शर्टाचे लेअरिंग केल्यास अधिक सुंदर दिसेल. दोन्ही लुकमध्ये तुमची स्टाईल अधिक सुंदर दिसून येईल.
अधिक वाचा – ट्रॅव्हल फोटो चांगले येण्यासाठी अशी करा कपड्यांची निवड
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक