केस हे आपल्यासाठी सर्वात मोठं काळजीचं कारण असतं. आपल्याला सर्वांना मऊ, मुलायम आणि सुंदर केस आवडतात. पण ते तसेच राखून ठेवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. केसांची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आपण बरेचदा पार्लरला जात असतो. पण काही घरगुती उपायदेखील करत असतो. अशाच घरगुती उपायांपैकी एक आहे टॉमेटो. टॉमेटोदेखील केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. पण नक्की कसा याची तुम्हाला माहिती आहे का? या लेखातून हीच माहिती आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. टॉमेटो ही अशी भाजी आहे जी आपल्या प्रत्येकाच्या घरात कायमस्वरूपी असते. तसंच टॉमेटो अतिशय स्वस्तदेखील असतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांना पोषक असणारी तत्व यामध्ये आढळतात. त्यामुळे केसांसाठी टॉमेटोचा वापर करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पाहूया नक्की काय फायदे आहेत टॉमेटोचे आणि कसा वापरायचा टॉमेटो –
1. टॉमेटोचं सेवन केल्याने रूक्ष केसांमध्ये येते चमक
Shutterstock
टॉमेटोमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसंच आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं जातं की, टॉमेटोमध्ये विटामिन्सचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे केसांसाठी ही लागणारी पोषक तत्व यामध्ये अधिक प्रमाणात आढळल्याने तुम्हाला रोज दिवसातून एकदा तरी टॉमेटोचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही कच्चा टॉमेटो खाल्ल्याने तुमच्या शरीरातील अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण व्यवस्थित राहून तुमच्या रूक्ष केसांमध्येही चमक येण्यासाठी मदत मिळते. तसंच तुम्ही रूक्ष केसांसाठी टॉमेटोचा वेगळ्या प्रकारे प्रयोगदेखील करू शकता.
कसा वापर करावा –
- टॉमेटोचा रस काढून घ्या
- त्यामध्ये एक चमचा मध मिसळा
- हे मिश्रण केसांना लावा आणि मग अर्धा तास तसंच ठेवा
- नंतर केस थंड पाण्याने धुवा
केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स
2. टाळूमध्ये जास्त खाज येत असल्यास वापरा टॉमेटो
Shutterstock
टॉमेटोमध्ये असणारं अँटिऑक्सिडंट तुमच्या केसांमधील खाज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. टॉमेटोमध्ये जास्त प्रमाणात विटामिन ए आणि विटामिन सी आढळतं. त्यामुळे केसांवर याचा वापर केल्यास, केसांच्या स्काल्पला मजबूत होण्यासाठी याची मदत मिळते. तसंच खाज घालवण्याासाठी याचा उपयोग होतो.
कसा वापर करावा –
- साधारण 3 टॉमेटोचा पल्प काढून घ्या
- त्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस मिसळा
- हे मिश्रण तुमच्या टाळूला लावा
- अर्ध्या तासाने हे थंड पाण्याने धुवा (केस धुताना शँपूचा वापर करू नका)
3. केस होतात दाट
Shutterstock
टॉमेटोचा रस तुम्ही जर केसांना नियमित लावलात तर तुमच्या केसाची पीएच पातळी संतुलित राहाते आणि त्यामुळे केस घनदाट होण्यास मदत होते. घनदाट केस कोणाला आवडत नाही? त्यामुळे तुम्हाला तुमचे घनदाट केस हवे असतील तर तुम्ही हा उपाय नक्की वापरून पाहा
कसा वापर करावा –
- टॉमेटोचा रस काढून घ्या आणि त्यामध्ये 2 चमचा एरंडेल तेल मिसळा
- ही पेस्ट कोमट करून घ्या
- या पेस्टने टाळू आणि स्काल्पवर मालिश करा
- साधारण 2 तास तसंच राहू द्या आणि मग थंड पाण्याने केस धुवा
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
4. दुहेरी केसांच्या समस्येपासून मिळते सुटका
Shutterstock
दुहेरी केसांची समस्या ही आजकाल खूपच वाढली आहे. त्यासाठी बरेचदा पार्लरमध्ये जाऊन महागडी ट्रीटमेंट घेतली जाते. पण तुमची ही समस्या टॉमेटोच्या वापरानेदेखील संपते. याचा वापर करणं अत्यंत सोपं आहे.
कसा वापर करावा –
- साधारण 3 टॉमेटोचा पल्प काढून घ्या
- हा पल्प तुम्ही केसांना आंघोळीच्या आधी लावा
- साधारण एक तासानंतर केस धुवा
5. केसांना अधिक चमक देण्यासाठी
Shutterstock
टॉमेटो तुमच्या केसांना चमकदार बनवण्यासाठीही उपयोगी आहेत. टॉमेटोमधील अँटिऑक्सिडंट्स हे तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरतात
कसा वापर करावा –
- टॉमेटोचा रस काढून घ्या
- त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिसळा
- हे मिश्रण केसांना लावा आणि मग एक तासाने केस धुवा
आजच्या काळातंही तुम्हाला सौंदर्य मिळवून देतात या ‘पुरातन’ गोष्टी
POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.
तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.