मनोरंजन

‘हे’ चित्रपट केले असते तर आज वेगळ्याच उंचीवर असतं हृतिकचं करिअर

Aaditi Datar  |  Jul 9, 2019
‘हे’ चित्रपट केले असते तर आज वेगळ्याच उंचीवर असतं हृतिकचं करिअर

अनेकदा आपण भूतकाळात घेतलेले निर्णय नंतर विचार केल्यावर चुकीचे वाटतात. असं वाटतं की, तेव्हा ते निर्णय घेतले असते तर. असंच काहीसं झालं बॉलीवूडमध्ये पहिल्याच चित्रपटाने रातोरात स्टार झालेल्या अभिनेता हृतिक रोशनबद्दल. सत्य परिस्थितीत हृतिकला हे मेगास्टारपद फक्त होम प्रोडक्शनच्या चित्रपटांच्या बळावर मिळालं आहे. पण असं नाही की, हृतिकला बाहेरून कोणत्याही चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्याच नाहीत. काही ना काही कारणांमुळे हृतिकने या चित्रपटांना नकार दिला आणि त्याच्या हातातून खूप चांगले प्रोजेक्ट्स निसटले. त्याने नकार दिलेल्या चित्रपटांनी इतर स्टार्सचं करिअर घडलं. पाहा हृतिकने नाकारलेले हे चित्रपट –

रंग दे बसंती

या कल्ट चित्रपटासाठी खरंतर दिग्दर्शक ओम प्रकाश मेहराच्या डोक्यात आमिर खानसोबतच दुसऱ्या एका अभिनेत्याचं नाव डोक्यात होतं. तो अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. आमिर खानशिवाय एका दुसऱ्या भूमिकेसाठी हृतिकला अप्रोच करण्यात आलं होतं. पण हृतिकने या सेकंड लीडच्या भूमिकेला नकार दिला. नंतर मात्र हा चित्रपट खूप यशस्वी ठरला आणि यातील प्रत्येक भूमिकेचं कौतुक झालं. हे तर सगळ्यानांच माहीत आहे.

मैं हूं ना

किंग खान शाहरूख स्टारर या चित्रपटासाठी दिगदर्शक फराह खानने हृतिक रोशनला विचारलं होतं. हृतिकला शाहरूखच्या छोट्या भावाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात येणार होतं. पण हृतिकने कभी खुशी कभी गम चित्रपटाची पुनरावृत्ती नको म्हणून या चित्रपटाला नकार दिला. कारण त्याने अशीच भूमिका त्या चित्रपटातही केली होती. त्यामुळे पुन्हा छोट्या भावाची भूमिका करण्यास त्याने नाही म्हटलं. 

दिल चाहता है

बॉलीवूडमधील ऑल टाईम फेव्हरेट चित्रपट म्हणजे दिल चाहता है. आमिर खान स्टारर या चित्रपटासाठीही हृतिकला विचारण्यात आलं होतं. या चित्रपटात त्याला अक्षय खन्नाने साकारलेल्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण हृतिकने नकार दिला. त्यानंतर हीच भूमिका अभिषेक बच्चनला ऑफर करण्यात आली. पण त्यानेही नकार दिल्यावर झाली अक्षय खन्नाची एंट्री झाली. 

स्वदेस

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या या नावाजलेल्या चित्रपटातील शाहरूखच्या भूमिकेसाठी आधी हृतिकला विचारण्यात आलं होतं. लगान चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आशुतोषने सर्वात आधी आमिरची निवड केली होती. पण त्याने नकार दिल्यावर हृतिकला अप्रोच करण्यात आलं. पण त्याला ही भूमिका सूट झाली नाही आणि एंट्री झाली किंग खान शाहरूखची. आजही शाहरूखच्या निवडक आणि बेस्ट भूमिकांमध्ये स्वदेसची गणती केली जाते.  

बंटी और बबली

यशराज बॅनरच्या या सुपरहिट चित्रपटालाही हृतिक रोशनने नकार दिला होता. पण या नकारामागचं कारण होतं डेट्सचा प्रोब्लेम. कारण तेव्हा तो क्रिश चित्रपटाची तयारी करत होता.

पिंक पँथर 2

ऐश्वर्या राय बच्चनसोबत हृतिकची ऑन केमिस्ट्री प्रेक्षकांना जोधा अकबर आणि धूम 2 या दोन्ही चित्रपटात आवडली होती. त्यामुळेच पिंक पँथर 2 साठी त्याला विचारण्यात आलं. पण हृतिकने नकार दिला आणि नंतर हा चित्रपट हॉलीवूडमधील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला.

फास्ट अँड फ्युरीयस

हे ऐकून तर तुम्हाला मोठाच धक्का बसेल. हॉलीवूडच्या या मेगा एक्शन एंटरटेनर चित्रपटाच्या सीरीजमधल्या भूमिकेसाठी हृतिकला दिग्दर्शक रॉब कोहनने अप्रोच केलं होतं. त्यांना हृतिकचं काम खूप आवडलं होतं आणि म्हणूनच त्याला कास्ट करण्याची त्यांची इच्छा होती. पण हृतिकने तेव्हाही होम प्रोडक्शनच्या क्रिश सीरीजचं कारण देत ही ऑफरही नाकारली.

Instagram

काश… हृतिकने तेव्हा या फिल्म्सना नकार दिला नसता तर आज त्याचं करिअर कुठच्या कुठे असतं. असो प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे ठरलेले असतात. बेस्ट ऑफ लक फोर ‘सुपर 30’ हृतिक.

हेही वाचा –

VIDEO – सुपर 30 च्या सेटवर ऋतिक रोशन जेव्हा भोजपुरी ‘तू लगावे जब लिपस्टिक’वर करतो डान्स

चीनमध्ये हृतिक ठरला ‘दा शुई’, चीनच्या प्रेक्षकांना आवडला काबिल

कंगनाला पाठिंबा देत ह्रतिकच्या बहिणीने केले ह्रतिकवर गंभीर आरोप

Read More From मनोरंजन