आपल्या डोक्यात सतत काही ना काही उलथापालथ सुरूच असते. का झालं, कसं झालं हे आपल्याला जाणून घ्यायचं नसतं पण त्यामागील गुपितं जाणून घ्यायची उत्सुकता आपल्याला नक्कीच असते. मनोवैज्ञानिक आणि सायन्स रिसर्चनुसार आपल्या शरीरातील प्रत्येक हावभावाच्या मागे काही ना काही मनोवैज्ञानिक गोष्टी कारणीभूत असतात. ज्यानुसार आपण प्रत्येक गोष्टीवर रिएक्शन देत असतो. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही अनुभवांबदलची रंचक आणि मजेशीर माहिती सांगणार आहोत. जी जाणून घेतल्यावर तुम्ही पुढच्या वेळी इतरांपेक्षा नक्कीच स्मार्टरित्या रिएक्ट कराल. चला तर जाणून घेऊया आपल्या शरीराशी निगडीत हे शॉकींग फॅक्ट्स
1 – जी लोक सर्वात जास्त किस करतात. ती लोकं इतरांच्या तुलनेत जास्त दिवस जगतात.
2 – 90% लोक फक्त हसतात. जेव्हा त्यांना समोरची व्यक्ती काय म्हणत आहे, हे समजत नाही.
3 – कोणत्याही व्यक्तीला तुमच्यासोबत येण्याबद्दल विचारताना जर तुम्ही त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला किंवा खांद्याला हात लावला तर ती व्यक्ती होकार देण्याची शक्यता जास्त असते.
4 – असं म्हणतात की जेव्हा तुम्ही खोट बोलत असता तेव्हा तुमचं नाक गरम होतं.
5 – मानवी शरीरातून दर अर्ध्या तासाला एवढी उष्णता बाहेर पडते की, त्या उष्णतेच्या वापर केल्यास 2 लीटर पाणी उकळून घेता येईल.
6 – 100 वेळा हसणं हे एका दिवसात 15 मिनिटं सायकल चालवण्यासारखं आहे. तुम्हालाही वजन कमी करायचं असल्यास हा उपाय करून पाहू शकता.
7 – जी लोक आपल्या नवरा किंवा बायकोला चांगला मित्र समजतात, त्यांचं वैवाहीक जीवन इतरांच्या तुलनेत जास्त आनंददायक असतं.
8 – जसं तुमचा मेंदू विचार करतो तसंच तुमच्या सेल्स रिएक्ट करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा नकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटू लागतं.
9 – जर तुम्ही स्वप्नात स्वतःला लघवी करताना पाहिलं तर खरोखर तुम्हाला बेडमध्येच लघवी होण्याचे चान्सेस जास्त असतात.
10 – जेवण जेवल्यानंतर आपल्याला अनेकदा झोप अनावर होते. शरीरातील रक्ताच्या कमी दबावामुळे आपल्याला झोप येऊ लागते.
11 – तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? की, लोक तुमच्याबद्दल काही चांगलं ऐकलं तर लगेच विश्वास ठेवत नाहीत पण काही वाईट ऐकलं तर लगेच विश्वास ठेवतात.
12 – ज्या लोकांचा आत्मविश्वास कमी असतो ते लोक बरेचदा दुसऱ्यांची टीका करताना दिसतात.
13 – जी लोक स्वभावाने लाजाळू असतात ती लोकं इतरांच्या तुलनेत जास्त इमोशनल, दयाळू आणि विश्वासू असतात.
14 – जर कोणी व्यक्ती जास्त झोपत असेल तर ती व्यक्ती आतून जास्त उदास आणि वैतागलेली असते.
15 – तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमचा मृत्यू होण्याची शक्यताही कोणत्याही इतर दिवसांपेक्षा 14% जास्त असते.
हेही वाचा –
‘या’ कारणामुळे महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोपेची असते गरज
जाणून घ्या शरीरावरील तीळ काय सांगतात तुमच्याबद्दल
‘प्रेग्नंट होण्यासाठी रोज सेक्स करावा’ यासारखे काही गैरसमज आणि त्यामागील तथ्य
Read More From आपलं जग
नागपंचमी मराठी माहिती | Nag Panchami Chi Mahiti | Nag Panchami Information In Marathi
Aaditi Datar