xSEO

50+ लाडक्या नवऱ्यासाठी खास कोट्स | Married Life Husband Quotes In Marathi

Dipali Naphade  |  Feb 12, 2022
husband-quotes-in-marathi

नवऱ्याला कितीही नाव ठेवलं तरी त्याच्याशिवाय ना दिवस सुरू होत ना त्याच्याशिवाय दिवस संपत. लग्न लागल्यानंतर नवऱ्यासाठी उखाणे घेण्यापासून अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याभोवतीच अनेक बायकांचा दिवस फिरत असतो. अशाच नवऱ्याच्या वाढदिवसासाठी खास कोट्स लिहिणे (Husband Quotes In Marathi) अथवा नवऱ्याला तो आपल्या आयुष्यात काय आहे सांगण्यासाठी नवऱ्यासाठी खास कोट्स हे तर तुम्हाला माहीत असायलाच हवे. व्हॉट्स अप स्टेटस हा तर आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झालाय, त्यामुळे नवऱ्यासाठी प्रेमळ असे लव्ह स्टेटस (Love Quotes In Marathi For Husband) अथवा नवऱ्यासाठी खास कोट्स वा स्टेटसदेखील (love msg for husband in marathi) तुम्ही ठेऊ शकता. असे काही खास आणि सुंदर कोट्स (Love Quotes For Husband In Marathi) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हीही तुमच्या नवऱ्यासाठी रोमँटिक आणि खास प्रेमळ संदेश अथवा कोट्स (Husband Heart Touching Love Quotes In Marathi) ठेऊ शकता. 

Best Husband Quotes in Marathi | बेस्ट नवऱ्यासाठी खास कोट्स

Best Husband Quotes in Marathi

अनेक महिलांचं जग हे त्यांच्या नवऱ्याभोवती अधिक असतं. प्रेमळ नवरा असेल आणि साथ देणारा आणि कायम आपल्याला चांगल्या गोष्टी प्रवृत्त करणारा नवरा असेल तर नक्कीच त्याच्याभोवती आपलं जग असणं यात काहीच वावगं नाही. अशाच आपल्या उत्तम आणि सर्वोत्कृष्ट नवऱ्याला (Best Husband Quotes In Marathi) तुम्हाला भावना व्यक्त करायच्या असतील (Marathi Love Status For Husband) तर काही अप्रतिम कोट्स

1. नवरा हा आभाळासारखा स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा, जेणेकरून बायकोरूपी चंचल, आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल

2. वडिलांनंतर आपली जो काळजी करतो आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही त्याला नवरा म्हणतात

3. नवरा बायकोचे नाते म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ, ती ज्याच्याशी पडली तो कसाही तिला शोधत येतो, डोळ्यातून प्रेम पाझरत अन् दोन जीव एक होतात

4. तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं, मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं, कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा

5. नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात

6. नवरा मित्र असला पाहिजे कारण प्रेम संपू शकते पण मैत्री नाही

7. नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल पण आदर करणारा नक्की हवा आणि तसा तू आहेस त्यामुळे मी अधिक आनंदी आहे

8. प्रियकर नवरा बनला तर आपल्याला सोडू शकतो पण बेस्ट फ्रेंड नवरा झाला तर आयुष्यभराची साथ देऊ शकतो

9. आयुष्य खुप सुंदर आहे कारण माझ्या आयुष्यात तू आहेस सोबत आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत

10. तुझी बायको नाही तर तुझा श्वास बनून शेवटपर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे

11. छोटस हृदय आहे, त्याला आभाळा एवढ प्रेम झालंय ते पण तुझ्यावर

12. मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!

13. जीवनाच्या वाटेवर चालताना मी जगेन अथवा मरेन, पण शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुझ्यावरच प्रेम करेन

14. दिवसाची सुरवात आणि रात्रीचा शेवट ही तुझ्या सोबत पहायचा आहे. एकमेकांवरचा विश्वास आयुष्यभर कायम ठेवायचा आहे

15. जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूडला सांभाळून घेते, अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते जसा की तू

Married Life Husband Quotes In Marathi | मॅरीड लाईफ हसबंड कोट्स

Married Life Husband Quotes In Marathi

लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको खरं तर दोघांचंही आयुष्य बदलतं. नात्यातील चढउतार आणि प्रेम, दुरावा या सर्वच गोष्टी या नात्यामध्ये असतात. मॅरीड लाईफ हसबंड कोट्स (Married Life Husband Quotes In Marathi) तुम्हाला तुमच्या नात्यातील गोडवा, भावना जाणवून देण्यास नक्कीच मदत करतात. तुम्हाला तुमच्या नवऱ्यासाठी काही खास पाठवायचे असेल अथवा तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर नक्कीच हे कोट्स (Valentine Day Quotes In Marathi For Husband) तुम्हाला फायदेशीर ठरतील. 

1. नवरा तर असा पाहिजे जो मी न बोलता समजेल की मला काय बोलायचं आहे

2. आपल्याला कदाचित संपूर्ण जगावर प्रेम करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त एक व्यक्ती आवश्यक आहे, जो तुमच्यावर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतो 

3. आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाचे तरी असण्यात आनंद आहे

4. तुझ्या डोळ्यांना व ओठांना थोडं समजावून ठेव, तुझे डोळे मला वेड लावतात आणि तुझे ओठ मला तुझ्याकडे खेचतात

5. कळलंच नाही मला प्रेम तुझ्यावर नक्की कसं झालं, मी फक्त जीव लावला हृदय केव्हाच तुझं झालं, तू फक्त माझा आहेस 

6. मला कळत नाही की तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की जेव्हा तू माझ्या जवळ असतोस ना तेव्हा वाटते माझ्या जवळ सर्व काही आहे

7. एवढ्या जगात मी तुलाच निवडलं मग तूच ठरव तुझी किंमत काय असेल? खरं तर तू अत्यंत अनमोल आहेस 

8. पापण्यांच्या आड दडलेल्या लाल निळ्या काळोखाला तुझे नाव दिले आहे मी, बस इतकचं

9. काळजाचा समुद्र होतो अरे तुझ्या डोळ्यात पाहिले की, तू फक्त माझा आहेस 

10. शब्दांच्या अलीकडे फार गोंगाट आहे, चल ना आपण शब्दांच्या पलीकडे जाऊया..! कारण माझं जग फक्त तूच आहेस 

11. मनाचा चुरा करून ज्याच्या ओंजळीत देता येईल अशा माणसाची जागा पापण्यांवर असते कायम आणि माझ्या पापण्यांवर फक्त आणि फक्त तूच आहेस 

12. हा ऋतुही तुझा हा बहरही तुझाच, मी नुसती तुझ्या दारातील रिमझिम आहे साजणा!

13. साधचं आहे रे हे प्रेम वैगरे असणं, पण जीवाला जाळतं ते तुझं नसणं…! तू कायम सोबत राहा

14. जेव्हा अपेक्षा नसतानाही तू I Love You म्हणतोस ना, खूपच आपलेपणा वाटतो

15. नवरा बायको जेवढे अधिक भांडतात ना तितके ते एकमेकांवर अधिक प्रेम करतात

Love Quotes In Marathi For Husband | नवऱ्यासाठी खास प्रेमाचे कोट्स

Love Quotes In Marathi For Husband

प्रेमाशिवाय कोणतंच नातं टिकू शकत नाही आणि त्यातही नवरा बायकोचं हे नातं असेल तर त्यात प्रेम, जिव्हाळा, काळजी या भावना असणं अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय हे नातं खास होऊच शकत नाही. पण या नात्यात वेळोवेळी हे प्रेम व्यक्तही करावं लागते. असेच आपल्या नवऱ्यासाठी खास प्रेमाचे कोट्स (Navrya Sathi Status) तुमच्यासाठी आम्ही आणले आहेत. तुम्हीही अचानक नवऱ्याला असे प्रेमाचे कोट्स (Husband Quotes In Marathi) पाठवून द्या सरप्राईज. 

1. नवरा तो नवराच असतो, कितीही भांडण झाले तरी जवळ तोच घेतो 

2. माझं एक स्वप्न आहे, माझ्या स्वप्नात नेहमी तूच यावे

3. जर प्रेम खरं असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही आणि तू माझ्या नशिबात आल्यानंतर संपूर्ण जगच बदलले

4. कोणीतरी विचारलं की प्रेम कधी झालं होतं आणि मी हसून सांगितलं प्रेम तर आजही आहे आणि म्हणूनच आम्ही एकत्र आहोत 

5. मला तुझी सोबत जन्मभरासाठी नको तर जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय..हो आणि हे खरं आहे

6. कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक, प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल…कारण त्यात फक्त तूच राहतोस 

7. तुझं माझ्या आयुष्यात येणं हेच एक सुरेल गाणं आहे तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे

8. जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ…मला आहे याबाबत कायमचा विश्वास 

9. जर दोघांमध्ये प्रेम असेल आणि भांडण नाही झालं तर मग ते नातं प्रेमाने नाहीतर डोक्याने निभावतेत असं समजून जा. पण आपलं नातं हे अत्यंत सुंदर आहे 

10. खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका लपवण्यात आहे कारण जर एखादी सर्वगुण संपन्न व्यक्ती शोधायला गेलात तर मग एकटेच राहाल. त्यामुळे मी फक्त आणि फक्त तुला जपते 

Cute Husband Status Marathi | नवऱ्यासाठी क्युट स्टेटस

Cute Husband Status Marathi

नवऱ्याशी कितीही भांडण झाले तरीही त्याचा क्युटनेस हा कायम बायकोसाठी असतो. अशाच क्यूटनेसवर तुम्ही फिदा असता. नवऱ्यासाठी क्युट स्टेटस (Cute Husband Status Marathi) तुम्ही पाठवू शकता. नवऱ्यालाही तुम्ही पाठवलेले हे मेसेज नक्कीच आवडतील. 

1. माझं जग तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यावरच संपते I Love U

2. तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण स्वप्नवत आहे I Love U

3. काळाच्या ओघात कळलेच नाही आयुष्य कसे कुठे बदलले तू भेटलास आणि पुन्हा जगावेसे वाटले. तुझ्याशिवाय एकही क्षण राहणे मला शक्य नाही 

4. ज्या चहात साखर नाही, तो चहा पिण्यात मजा नाही, ज्या जीवनात प्रेम नाही, ते जगण्यात मजा नाही…तुझ्याशिवाय आयुष्यच नाही

5. प्रेम जर खरं असेल तर कधीच दूर जाण्याची कारणे दिली जात नाहीत उलट जवळ येण्यासाठी मार्ग काढला जातो. तुझ्यासारखा क्यूट दुसरा कुणीच नाही

6. रमत नाही मन कुठेच तुझ्या प्रेमात पडल्यावर हसू उमटते ओठावर तू असा समोर आल्यावर

7. चालता चालता भेटलास तू बघता बघता माझा झालास तू 

8. चंद्राला पाहून भरती येते सागराला तशी तुझी प्रेमाची साथ असू दे माझ्या जीवनाला

9. बंध विश्वासाचा तुझा माझा आयुष्यभर अगदी तळहातावर जपण्यासारखा आय लव्ह यू

10. I Love u रे, दरदिवशी डोक्यात येणारी पहिली शेवटची गोष्ट तू आहेस 

Msg For Husband In Marathi | लाडक्या नवरोबासाठी संदेश

Msg For Husband In Marathi

लाडक्या नवरोबासाठी संदेश द्यायचे (Marathi Love Status For Husband) असतील तर तुम्ही असे प्रेमळ मेसेज आपल्या नवऱ्याला पाठवा. 

1. मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात! तू मला नेहमीच समजून घेतोस 

2. दाटून असलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडते, तसाच काहीस पाऊस न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येते!

3. प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते आणि तू नेहमीच मला पाठिंबा देत आला आहेस 

4. शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे, ध्येयाविना जुळावे, स्पर्शावाचून ओळखावे “ तुझे माझे प्रेम”

5. सहवासात तुझ्या, आयुष्य म्हणजे नभात फुललेली चांदण्याभरात असेल, तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, अविरत बरसात असेल

6. प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसऱ्याची काळजी घेतात, माझ्यासाठी तूच आहेस माझ्या आयुष्यात 

7. जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं, माझं प्रेम फक्त तूच आहेस 

8. आपली काळजी जी व्यक्ती जास्त घेते…. जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते, तू माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहेस आणि माझं प्रेमही 

9. नवरा म्हणून तुझ्याकडून काहीच मागत नाही कारण तू नेहमीच काही न मागता सर्व काही द्यायला तयार असतोस 

10. खूप प्रेम करते तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, तुला तर माहीतच आहे. पण तू माझा आहेस हेच माझ्यासाठी सर्वात सुंदर क्षण आहेत

Love Poem For Husband In Marathi | नवऱ्यासाठी प्रेम कविता

Love Poem For Husband In Marathi

1. मला कापले पण तुझ्या डोळ्यात पाणी कसे रे…!!! 
सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 
दोन जीव वेगवेगळे पण काळीज कसे एक झाले…!!! 
सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 
आठवणीची साठवण माझ्या मनी, तुझ्याच येण्याने खुलते माझ्या गालावरी खळी…!!! 
सांग ना या साऱ्याचे गुपीत मला… 
माझ्या या भावना मी शब्दांनी का तोलते…??? 
तुझे मुके बोल कळू दे रे मला… 
सांग ना या साऱ्याचे गुपीत मला.

2. जोडीदार आयुष्याचा तु माझ्या 
जगण्याला माझ्या देतोस तु नवी दिशा… 
साथ सोबत असतो माझ्या तु सदा
तुझीच साथ पल्लवित करते नवीन आशा… 
आयुष्य माझे सारे तुझ्या सोबतचं असावे
प्रत्येक संकटाला तुझा हात माझ्या हाती असावा.. 
भिडण्या मग सदा या नव्या जगाला
भय आता कसे वाटेल या जीवाला… 

3. एकांतात बसले असले मी जरी
तुझेच बोल रेखाटते कागदावरी … 
असण्याची चाहुल भासते सदा 
अंगणी मोराचा पिसारा रेखाटते 
जसाच्या तसा..

4. आयुष्याची सुरुवात केली मी तुझ्यासोबत
जीवनाला नवीन दिशा मिळेल तुझ्यासोबत… 
मिळेल अर्थ माझ्या जगण्याला
मिळेल साथी हाती हात गुंफण्याला… 

5. एकांतातले माझे मधूर गाणे
मी गुणगुणत असते सदा… 
माझ्या या गुणगुण गाण्याला 
तुच तार छेडीतो सदा… 

6. समाधान द्यायला माझ्या मनाला 
तेव्हाही मदत मागशील ना ?
सांग तेव्हाही प्रेम करशील ना..
गोळ्या शोधत धडपडत असतील 
थरथरणारे तुझे हात,
आजोबा पडले पाय घसरून 
निरोप आणेल जेव्हा नातं…
आधार शोधत भिंतीचा मग  
याच त्वेषाने उठशील ना ?
सांग तेव्हाही प्रेम करशील ना..
तरुणपणाची सावली सरेल  
छळेल वार्धक्याचं ऊन,
केविलवाण्या चेहऱ्याने
पाहत राहील मुलगा सून…
गालात हसून आतासारखं
तेव्हाही सोबत चालशील ना ?
सांग तेव्हाही प्रेम करशील ना ?

7. प्रेम म्हणजे… ?समजली तर भावना…
पाहिले तर नाते…
म्हटले तर शब्द…
वाटली तर मैत्री…
घेतली तर काळजी …
तुटले तर नशीब….
पण मिळाले तर स्वर्ग….!!!
तुझ्यासाठी सर्व काही

8. घेऊन मला मिठीत शांत कर या मनाला
मी खूप समजावलंय आता तूच समजावं याला

9. तू आहेस सोबत म्हणूनच शब्द बोलत आहेत
अबोल्याचे क्षण त्यांनी कित्येक दिवस पाहिले आहेत

10. तुझी मिठी म्हणजे चंद्र चांदण्यांचा भास
मिलन ह्रदयाचा व्हावं एकत्र येऊन तुझा-माझा श्वास..

तुम्हीही तुमच्या नवऱ्याला असे खास कोट्स पाठवून करा आनंदी आणि ठेवा त्याच्यासाठी खास स्टेटस! तुम्हाला आवडले असतील स्टेटस आणि कोट्स तर नक्की पाठवा. 

Read More From xSEO