बॉलीवूड

केसरीतील लुकमुळे जगले ‘सारागढी’ युद्धाचा काळ- परिणिती चोप्रा

Leenal Gawade  |  Mar 11, 2019
केसरीतील लुकमुळे जगले ‘सारागढी’ युद्धाचा काळ- परिणिती चोप्रा

सारागढीच्या युद्धावर आधारीत ‘केसरी’ हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या चित्रपटात परिणिती चोप्रा काम करत आहे. तिला हा सिनेमा कसा मिळाला आणि तिच्या या चित्रपटातील कामाचा अनुभव कसा होता हे आम्ही जाणून घेतले. तिच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा Pop Xo मराठीच्या प्रेक्षकांसाठी

१. केसरी चित्रपटात काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?

एका सैनिकाचे घर कसे असते याचा मला अनुभव आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चित्रपटात काम करण्याची मला संधी मिळाली ही चांगली गोष्ट आहे. मी स्वत: पंजाबी आहे. शिवाय आर्मी घरात जन्माला आल्यामुळे  या चित्रपटात जितके काम केले तितका मला तो काळ जगण्याचा अनुभव मिळाला. मी सारागढीचा तो काळ जगले असेच मी म्हणेन. मला सांगायला आवडेल की, या चित्रपटात माझा रोल फार मोठा नाही. मी त्या चित्रपटातील एक प्रेमाचा भाग आहे. पण तरीही या चित्रपटातून सारागढीचा काळ, शीखांचे ते बलिदान मला पुन्हा जगता आले.

वाचा काय म्हणाला अक्षय त्याच्या ‘केसरी’ चित्रपटाच्या अनुभवाबद्दल

२. तुझ्या लुकबद्दल आणि सेटवरील काही अनुभवाविषयी काय सांगशील?

प्रत्येक चित्रपटातील लुकमुळे तुमच्यात बराच फरक पडत असतो. यात मी एक शीख आहे. म्हणजे ज्यावेळी हा चित्रपट मला ऑफर केला. त्यावेळी लुकबद्दल आमच्या मिटींग्ज झाल्या. त्या काळानुसार माझा एक लुक फायनल करण्यात आला. म्हणजे जर तुम्ही पोस्टर पाहिले असेल, गाणं पाहिलं असेल तर मी त्यात साधा पंजाबी ड्रेस आणि डोक्यावरुन ओढणी घेतलेली अगदी साधी शीख मुलगी आहे. त्यामुळे त्या लुकमधून एक साधेपणा नक्कीच पाहायला मिळतो.  आता जर तुम्ही सेटवरील अनुभवाविषयी विचाराल तर मी आधीच म्हटलं की, मी फार कमी वेळ काम केलं. कारण ही शूरवीर शीखांची कहाणी आहे. त्यामुळे मी ज्यावेळी सेटवर जायचे. त्यावेळी सगळे अगदी घामाघूम असायचे. कोणासोबत युद्ध करणे ही साधी गोष्ट नाही. अगदी तसेच हे सगळे स्क्रिनवर दाखवणे खूप कठीण असते. यासाठी मुलांनी खूप मेहनत घेतलेली मी पाहिली आहे. अक्षय तर मला सेटवर आल्यावर म्हणायचे आम्ही इथे मेहनत करतोय आणि ही मुलगी बघा.

केसरीमधील अक्षय परिणितीचा हटके लुक तुम्ही पाहिलात का?

३. तुझ्याकडे हा चित्रपट कसा आला?

केसरीसाठी सगळ्यात शेवटी जे कास्टिंग झालं ते कदाचित माझं असेल. कारण या चित्रपटात शीख तरुणांचे योगदान आहे. त्यांचे कास्टिंग महत्वाचे होते. मला सगळ्यात शेवटी करणने या चित्रपटासाठी तुला एक रोल आहे असे सांगितले मला तीन चार ओळीत स्टोरी सांगितली आणि मी तिसऱ्या मिनिटाला सिनेमाला होकार दिला. मी माझा रोल किती मोठा? हा प्रश्न केला नाही.

केसरीचा ट्रेलर पाहिलात का?

४. बायोपिक सिनेंमाबद्दल तुझे काय म्हणणे आहे?

प्रेक्षकांचा मूड ना पटकन बदलत असतो. सध्या लोकांना बायोपिक, रिअल लाईफ स्टोरी पाहायला आवडत आहे. मी या आधी अशा चित्रपटात काम केले नाही. पण आता मला अशा चित्रपटात काम करायला नक्की आवडेल. विशेषत: रिअल लाईफ स्टोरीज जर मला पुढे करता आल्या तर मी माझे भाग्य समजीन की मला अशा चित्रपटात काम करायला मिळाले.

५. असं कधी झालं आहे का की तू एखादा चित्रपट पाहिला आहेस आणि तुला तो करावासा वाटला आहे?

प्रत्येक अभिनेत्याला वा अभिनेत्रीला चांगल्या चित्रपटात काम करण्याची इच्छा असते. मला पण आहे. असं खूप वेळा होतं की मी एखाद्याला एका रोलमध्ये पाहते आणि म्हणते अरे यार जर मी पण पुरुष असते तर कदाचित मी हा रोल करु शकले असते. म्हणजे प्रत्येक वेळा ते हिरोईनला ऑफर होणारे रोल नसतात. तर मी हिरोला ऑफर केल्या जाणाऱ्या रोलमध्येही मला शोधते.

Read More From बॉलीवूड