Recipes

#Maggie नक्की किती वेळ शिजवावं…जाणून घ्या

Aaditi Datar  |  Aug 12, 2019
#Maggie नक्की किती वेळ शिजवावं…जाणून घ्या

जर काही झटपट बनवायचं असेल तर सर्वात आधी मनात विचार येतो तो मॅगी नूडल्स बनवण्याचा. यामागील एक कारण म्हणजे सर्व वयोगटांमध्ये मॅगी आवडीने खाल्लां जातं. मग ती लहान मुलं असोत वा वयोवृद्ध सगळे आवडीने मॅगी खातात. तसंच दुसरं कारण म्हणजे हे बनवायला लागणारा वेळ. अगदी काही मिनिटांत शिजून मॅगी तयार होतं.

2 मिनिटात होणारं मॅगी

Instagram

असं म्हणतात की, मॅगी अवघ्या 2 मिनिटात तयार होतं. पण असं खरंच आहे का की मॅगी लगेच 2 मिनिटात शिजतं. जर तुम्ही नियमितपणे मॅगी बनवत असाल तर तुमचं उत्तर नक्कीच नाही असं असेल. मग चला जाणून घेऊया. मॅगीला शिजायला खरंच किती वेळ लागतो ते. 

प्रत्येकाची पद्धत वेगळी

खरंतर मॅगी बनवायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आणि अनुभव असतो. मॅगी बनवण्यासाठी लागणारा वेळही त्यावरच अवलंबून आहे. जर तुम्ही भाज्या घालून मॅगी बनवणार असाल तर साहजिकच त्याला जास्त वेळ लागतो. पण तुम्ही मॅगीच्या पाकिटावर दिलेल्या सूचनांनुसार प्लेन मॅगी करणार असाल तर मात्र कमी वेळ लागतो.

गुगलवर आहे मॅगी बनवण्याची योग्य रेसिपी

Instagram

मॅगीबाबतच्या याच मुद्द्यावर गुगलवर सर्च केलं असता आम्हाला क्वोरावर आढळली एक रेसिपी. एका युजरने मॅगी बनवण्याची योग्य पद्धत यावर दिली आहे. या युजरने मॅगी शिजवण्याबाबत काही प्रयोग केले आणि त्यातूनच समोर आली ही मॅगी बनवण्याची परफेक्ट रेसिपी.

मॅगी बनवण्याची परफेक्ट रेसिपी

– सर्वात आधी एका पॅनमध्ये 300 मिली पाणी घ्या आणि ते पाणी गरम करायला ठेवा.

– जसं हे पाणी उकळू लागेल त्यात मॅगी घाला.

– 2 मिनिटं गॅस कमी करा आणि नूडल्समधील थोडं पाणी काढा किंवा नूडल्स ड्रेन करून घ्या. पण एवढं पाणी ठेवा की, त्यात मसाला मिक्स करता येईल.

– मंद आचेवर नूडल्स शिजू द्या आणि यात मॅगी मसाला घालून चांगलं मिक्स करा.

– मग गॅस बंद करून 1-2 मिनिटं तसंच ठेवा.

– आता हे मॅगी खाऊन बघा. तुम्हाला नक्कीच वेगळी चव लागेल.

जाणून घ्या चमचमीत नुडल्सच्या रेसिपी

बटर आणि भाज्या घालून मॅगी करताना

वरील रेसिपी ही सिंपल मॅगीची होती. ज्याला फारच कमी वेळ लागतो. पण जर भाज्या घालून मॅगी करायचं असल्यास जास्त वेळ लागतो. पाहा कसं बनवाल भाज्या घातलेलं मॅगी

– एका पॅनमध्ये तूप/बटर किंवा तेल गरम करा.
– नंतर यात जिरं, हळद, थोडंसं मीठ आणि आवडत्या भाज्या घालून 5-7 मिनिटं शिजवून घ्या. तुम्ही हवं असल्यास उकडलेल्या भाज्याही वापरू शकता.
– जेव्हा भाज्या शिजतील तेव्हा त्यात बॉईल्ड नूडल्स आणि मॅगी मसाला घाला. मग मिक्स करा.
– जर तुम्हाला ज्यूसी किंवा सूपी मॅगी हवं असल्यास थोडंसं पाणी घाला.

अशाप्रकारे मॅगी बनवण्यासाठी कमीत कमी 15-20 मिनिटं लागतात. आता तुम्हाला कळलं असेल की, मॅगी नूडल्स काही दोन मिनिटात तयार होत नाहीत.

Instagram

लक्षात ठेवा बरेचदा आपण मॅगी शिजण्यासाठी त्यात जास्त पाणी घालतो आणि मग तेच आटवण्यासाठी मॅगी जास्त शिजवतो. असं केल्याने त्या नूडल्स चिकट होतात किंवा ओव्हर कुक होतात. मग पुढच्या वेळी मॅगी बनवताना या रेसिपीज नक्की करून पाहा. तुमचीही काही मॅगी बनवायची हटके रेसिपी असल्यास #POPxoMarathi सोबत नक्की शेअर करा.

हेही वाचा –

या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी

‘या’ कारणांसाठी पावसाळ्यात हे पदार्थ मुळीच खाऊ नका

संध्याकाळी काय खाऊ हा पडतो प्रश्न, मग खा हे हेल्दी पदार्थ

Read More From Recipes