आरोग्य

तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत आहेत, मग या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या

Dipali Naphade  |  Jul 30, 2021
pregnancy problem

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गर्भधारणेकरिता प्रयत्न करणा-या प्रत्येकी सहा जोडप्यांपैकी एका जोडप्याला गर्भधारणेसंबंधी अडचणी अथवा तक्ररींचा सामना करावा लागतो. जेव्हा आपण गर्भधारणेकरिता प्रयत्न करीत असतो तेव्हा मात्र जीवनशैली हा घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे. जरी आपण प्रजननासंबंधी उपचार घेत असलो तर या लहानसहान गोष्टीं लक्षात घेऊन काही गोष्टींचे पालन केले तर नक्कीच उत्तमरित्या गर्भधारणेकरिता मदत होऊ शकते. यासाठी आम्ही अधिक माहिती जाणून घेतली आहे, डॉ. सुलभा अरोरा, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ, मुंबई यांच्याकडून. वंध्यत्व म्हणजे गर्भवती होण्याचा प्रयत्न केल्यापासून एका वर्षाच्या आत गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागणे, गर्भधारणा न राहणे. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी ही मर्यादा केवळ सहा महिन्यांकरिता असते. वय, हार्मोनल असंतुलन, ट्यूबल ब्लॉकेज, गर्भाशयाचे फायब्रॉईड्स, एंडोमेट्रिओसिस, पीसीओएस किंवा ओव्ह्युलेशन, मासिक पाळी अनियमितता यासारखे घटक वंध्यत्वास कारणीभूत ठरु शकतात. निरोगी जीवनशैलीचा स्विकार केल्यास गर्भधारणेची शक्यता अधिक वाढते.

प्रजनन क्षमता कशी वाढविता येईल तसेच गर्भधारणेकरिता काही महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे –

गर्भधारणा नक्की का होत नाही आणि तुमची प्रजनन क्षमता कसी वाढवता येईल याबाबत काही महत्त्वाची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तुम्हीदेखील या बाबींचा विचार करा आणि त्याप्रमाणे पावले उचला. 

अधिक वाचा – गरोदरपणाच्या 9 व्या महिन्यात कशी घ्याल काळजी, तुमच्यासाठी टिप्स

तणावाचे व्यवस्थापन करा –

Freepik

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तसेच अभ्यासानुसार तणावामुळे गर्भधारणेवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्याकरिता तणावाचे व्यवस्थापन करणे अधिक गरजेचे आहे.  अनेक स्त्रिया त्यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात येणा-या तणावावर मात करण्यासाठी धूम्रपान,  मद्यपान किंवा उत्तेजन पेयाचे सेवन आणि अतिरेक करतात. हे याचा थेट परिणाम महिलेच्या आरोग्यावर तिच्या रोगप्रतिकारकशक्तीवर दुष्परिणाम करतात. यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि एखाद्याला गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागू शकेल. अशा प्रकारे, तणावाचे व्यवस्थापन केल्यास प्रजनन क्षमता नक्कीच वाढू शकते. आपण तणावाचा सामना करण्यासाठी समुपदेशनाची निवड करू शकता किंवा स्वत:शी चर्चा करण्याची सवय लावू शकता. मनन करणे, प्रियजनांबरोबर वेळ घालवणे, पुरेशी झोप व विश्रांती घेणे ताणतणावावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे.

वजन नियंत्रणात ठेवणे –

Freepik

एखाद्याच्या प्रजननात अडचण येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे वाढलेले वजन आहे. तज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार जास्त वजन असणे किंवा वजन कमी असणे या दोन्ही बाबी गर्भवती होण्याच्या शक्यतेवर परिणामकारक ठरतात. कमी वजनाच्या आणि जास्त वजनाच्या स्त्रियांना हार्मोनल असंतुलन आणि ओव्हुलेशन सारख्या अडचणी येऊ शकतात. त्यांना गरोदरपणात गुंतागुंत होण्याचा धोका देखील उद्भवू शकतो. म्हणूनच, आपण योग्य वजन राखणे गरजेचे आहे. जेणेकरून आपला बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) सामान्य श्रेणीत (18.5 ते 24.9) असेल.

अधिक वाचा – वजन कमी करण्यासाठी नेमकं किती पावले चालणं आहे गरजेचं

सक्रिय रहा – 

आपण दररोज आपल्या वेळापत्रकातून थोडा वेळ काढून व्यायाम करा. मग, आपण हे सर्व चुकीचे करीत आहात. व्यायामाने गर्भधारणेची शक्यता नक्कीच वाढू शकते. बैठी जीवनशैली असणार्‍या महिलांच्या तुलनेत सक्रिय जीवनशैली असलेल्या महिलांची प्रजनन क्षमात अधिक चांगली असते. व्यायामाने शारीरीक तसेच मानसिक स्थिती सुधारता येऊ शकते. आपण आपल्या प्रजननक्षमतेस चालना देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस व्यायाम करणे.चालणे,  धावणे, योगसाधना, पोहणे, पायलेट्स, एरोबिक्स, फंक्शनल ट्रेनिंग सारख्या शारीरीक क्रिया करणे हे उत्कृष्ट पर्याय आहेत. आपण ज्याचा सर्वाधिक आनंद घ्याल तो पर्याय निवडा. काहींना फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करण्याची आवश्यकता असू शकते.

संतुलित आहाराची निवड करा – 

healthy food

चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार घेण्याची सवय लावा.  काही व्यक्ती तणावग्रस्त असताना उच्च कॅलरीयुक्त पदार्थ खाणे किंवा खुप खाणे किंवा न खाणे अशा प्रकारे कमी-अधिक आहार घेतात ज्याचा परिणाम शरीरावर होतो.  तसे न करता ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे, तृणधान्य, बियाणे, शेंगदाणे आणि डाळींचा आहारात समावेश करुन प्रयत्न करणे चांगले योग्य राहिल. आपण काय खात आहात त्यापासून आपल्याला सर्व आवश्यक पोषक मिळतात की नाही याची खात्री करा. प्रक्रिया केलेले, हवाबंद डब्यातील पदार्थ, तेलकट आणि खारट पदार्थ, धूम्रपान, जास्त प्रमाणात मद्यपान आणि उत्तेजक पेयांचे सेवन टाळा.

अधिक वाचा – PCOS बरा करण्यासाठी आर्युवेदामार्फत आहार (PCOS patients diet)

पुरेशी झोप –

Shutterstock

बर्‍याच अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की प्रजनन क्षमतेवर तसेच गर्भधारणेवर अपुरी झोप दुष्परिणाम करू शकते. झोपेच्या अभावामुळे ताणतणावासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गर्भधारणेकरिता प्रयत्न करताना झोपेच गणित बिघडू देऊ नका. दररोज किमान 8 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. मेलाटोनिन-चक्राचा प्रभाव फक्त आपल्या वजनावर नाही आणि आपले आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवर होतो. त्याला “ब्युटी स्लीप” असे संबोधले जाते.

निरोगी मन, निरोगी शरीर आणि निरोगी प्रजनन प्रणालीसाठी चांगले पोषण आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची भूमिका बजाविते.

Read More From आरोग्य