आयुष्य

लग्न समारंभात या कारणांसाठी लावतात वर आणि वधूला ‘हळद’

Trupti Paradkar  |  May 14, 2019
लग्न समारंभात या कारणांसाठी लावतात वर आणि वधूला  ‘हळद’

भारतीय संस्कृतीत लग्न आणि लग्न सोहळ्यातील विधींना अनन्यसाधारण महत्व आहे. लग्नाआधी आणि लग्नानंतर अनेक विधी केले भारतीय लग्नात केले जातात. यातील अनेक विधी वधू आणि वरांला भावी आयुष्यात सौख्य लाभावे यासाठी केले जातात. आजकाल प्रि – वेडिंग सेलिब्रेशन फारच लोकप्रिय होत आहे. त्यामुळे साखरपुडा, मेंदी, हळद, संगीत असे अनेक कार्यक्रम धुमधडाक्यात करण्याची पद्धत रुजू होत आहे. या सर्व विधींमध्ये वधूवरांना हळद लावण्याचा विधी अगदी मस्ट आहे. रजिस्टर मॅरेज करणारे बरेच वधू आणि वर देखील लग्नाच्या आदल्या दिवशी घरगुती हळद समारंभ करतात. कारण त्या निमित्ताने घरातील जवळची मंडळी आवर्जून लग्नकार्यात सहभागी होतात. नवरा नवरीला हळद लावण्यामागे अनेक शास्त्रीय कारणेदेखील असतात. अनेकांच्या मनात लग्नात वधू आणि वराला हळद का लावली जाते या विषयी उत्सुकता असते. यासाठीच जाणून घेऊया हळदीचे लग्नसमारंभातील महत्व.

हळदीने सौंदर्य वाढते

हळदीमध्ये असे अनेक अॅंटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि निर्जंतूक होते. लग्नाचा दिवस हा प्रत्येक वधू आणि वरासाठी महत्त्वाचा दिवस असतो. सर्वांचे लक्ष लग्नात नवरा-नवरीकडे असते. अशावेळी त्यांनी इतरांपेक्षा वेगळं आणि सुंदर दिसणं अपेक्षित असतं. पूर्वीच्या काळी मात्र आतासारख्या ब्युटी ट्रिटमेंट अथवा पार्लरची व्यवस्था नव्हती. त्यामुळे वधू आणि वराचे सौंदर्य खुलविण्यासाठी लग्नात नवरा नवरीला हळद लावण्याची पद्धत रूजू झाली.

पिवळा रंग शुभ असतो

पिवळा रंग हे ऐश्वर्य आणि समृद्धीचा प्रतिक असतो. म्हणूनच काही लग्न पद्धतीत नववधू पिवळ्या रंगाचे महावस्त्र परिधान करते. पिवळा रंगाला धार्मिक महत्व आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी केल्या जाणाऱ्या विधींना देखील वधूवर पिवळ्या रंगाचे कपडे घालतात. पिवळ्या रंग शुभ मानला जात असल्यामुळेच लग्नात हळदी समारंभ सुरू करण्यात आला असावा.

हळदीचे धार्मिक महत्व

लग्नात वधूवरांची सौभाग्य गाठ बांधली जाते. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे. शिवाय हळदीला सर्वच धार्मिक विधीत एक महत्त्वाचं स्थान आहे. हळदीकुंकू वाटताना आधी हळद आणि मग कुंकू लावलं जातं. हळद पवित्र मानली जात असल्यामुळे लग्नात वधूवरांना हळद लावली जात असावी.

हळद आहे आरोग्यदायी

हळद हा एक मसाल्याचा पदार्थ असून आरोग्यासाठी ती फार उपयुक्त आहे. हळदीचा अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. त्वचेच्या अनेक समस्या हळदीच्या लेपाने दूर होतात. एखादी गंभीर जखम असो वा साधं सर्दी-पडसं कोणताही आजार हळदीमुळे कमी करता येतो. आयुर्वेदातदेखील हळदीला महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच नववधू आणि वराला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी लग्नात हळद लावण्याची पद्धत सुरू झाली असावी.

हळदी समारंभाने घरातील ताणतणाव कमी होतो

त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी हळद फारच उपयुक्त आहे. हळद एक उत्तम स्क्रबर असल्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते. डेड स्किन निघून गेल्यामुळे आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे तुमची त्वचा एकदम फ्रेश दिसू लागेल. त्वचेला पुरेसा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. लग्नाच्या धावपळीमुळे वधूवर आणि घरातील मंडळी थकलेली असतात. मात्र हळद लावणे आणि हळद खेळणे या विधींमुळे घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. शिवाय यामुळे तुमचा ताणतणावदेखील कमी होतो.

लग्नसराईमध्ये या 15 गाण्यांनी मोहरेल नववधूचे मन (Marathi Wedding Songs)

नववधूच्या बॅगेत ‘या’ गोष्टी असायलाच हव्या

नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From आयुष्य