आयुष्य

लग्नाआधी या गोष्टी मुलामुलींना माहीत हव्या, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Trupti Paradkar  |  Jan 21, 2022
marriage tips for bride and groom should do these things before wedding

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असते. कारण हा आयुष्याचा असा टप्पा असतो ज्यामुळे तुमच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते. लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात. जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलतो.  मात्र काही लोकांना आयुष्यात झालेला हा बदल लगेच स्वीकारता येत नाही. ज्यामुळे नाते टिकवण्यात अनेक अडचणी येतात. यासाठीच लग्न ठरण्याआधीच मुलामुलींना लग्नाबाबत, लग्नानंतर होणाऱ्या बदलांबाबत आणि भाी जोडीदाराच्या आयुष्याबद्दल, नव्या कुटुंबाबद्दल सर्व काही माहीत असायलाच हवे. तसंच सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स (Tips For Happy Married Life)

लग्नाआधी मुलामुलींना काय माहीत हवे

लग्न म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी आहे. जी आयुष्यभर पतीपत्नीने एकत्र सांभाळायची असते. यासाठीच लग्नाआधी या गोष्टी जाणून घ्या.लग्न ठरण्याआधीच काही गोष्टी स्पष्ट केलेल्या असतील तर लग्नानंतरचे बदल स्वीकारणं नेहमीच सोपं जातं.

भावी जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला

लग्न ठरण्याआधी ज्याच्यासोबत तुम्हाला तुमचे आयुष्य काढायचे आहे त्याच्याशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलायला हवे. तुमच्या जोडीदाराचे त्याच्या भविष्याबद्दल, तुमच्याबद्दल आणि तुमच्या संसाराबद्दल काय विचार आहेत हे आधीच माहीत असेल तर निर्णय घेणं तुमच्यासाठी सोयीचं ठरू शकतं. कारण बोलण्यातूनच माणसाचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व समोर येतं. यासाठी लग्न ठरण्याआधी कमीत कमी एक ते दोन वेळा प्रत्यक्ष भेटा आणि दररोज फोनवरून संवाद साधा.

जोडीदाराला काही प्रश्न अवश्य विचारा 

लग्न ठरण्याआधी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटाल तेव्हा त्याला तुमच्या मनातील काही प्रश्न थेट विचारा. जसं की लग्नानंतर कुठे सेटल होणार, दोघांच्या करिअर बद्दल काही प्रश्न, आर्थिक व्यवहार कसे असतील असे काही मोजके पण गरजेचे प्रश्न आधीच विचारण्यामुळे पुढे तुम्हाला आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. शिवाय समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करते हे देखील तुमच्या लक्षात येईल. यासोबतच वाचा 50+ Relationship Quotes And Status In Marathi | मराठी स्टेटस नाती | Nati Quotes In Marathi

लग्नासाठी तुम्ही नक्की तयार आहात का

बऱ्याचदा घरच्यांची इच्छा असते म्हणून, काही अडचणी असतात म्हणून अथवा कोणीतरी जबरदस्ती करत आहे म्हणून लग्नाचा निर्णय घेतला जातो. मात्र असं केल्याने तुम्ही स्वतःचे आणि जोडीदाराच्या आयुष्याचे नुकसान करत असता. यासाठी या लग्नासाठी आधी तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्टीने तयार आहात का याचा तपास घ्या आणि मगच लग्नाचा निर्णय घ्या.

marriage tips for bride and groom should do these things before wedding

लग्न म्हणजे जबाबदारी 

लग्न करणं सोपं असलं तरी लग्नाची जबाबदारी आयुष्यभर पेलणं खूप मोठं आव्हान असतं. जेव्हा पती पत्नी मिळून ही जबाबदारी प्रेमाने स्वीकारतात तेव्हाच लग्न आयुष्यभर टिकतं. शिवाय लग्नानंतर तुम्हाला जोडीदाराच्या कुटुंबाची जबाबदारीदेखील स्वीकारावी लागते. यासाठीच लग्न करण्याआधी या सर्व गोष्टींचा नीट विचार करा. जेव्हा तुम्ही ही जबाबदारी आनंदाने स्वीकारण्यास तयार असाल तेव्हाच लग्न करण्याचा निर्णय घ्या. 

Love Msg And Quotes For Wife In Marathi | बायकोसाठी प्रेमाचे संदेश

Read More From आयुष्य