लग्न म्हणजे धामधूम आणि शॉपिंगसाठीची नुसती रेलचेल. जर लग्न घरातील मुलीचे असेल तर मग काय पाहायलाच नको. मुलीच्या लग्नाची शॉपिंग ही काही संपता संपत नाही. शेवटपर्यंत मराठी उखाणे असो वा इतर तयारी काहीतरी लगबग सुरुच असते. लग्नातील प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. पद्धत कितीही वेगळी असली तरी देखील काही पद्धती या हिंदू धर्मात साधारणपणे सारख्याच असतात. अनेकांकडे साखरपुड्याला हिरवी साडी नेसण्याची पद्धत आहे. काही जणांकडे लग्नासाठी पिवळी साडीच नेसली जाते. हल्ली वेगवेगळ्या साड्या नेसल्या जातात. पण लग्नाला पिवळी साडी का नेसली जाते या मागे काही कारणं आहेत? जाणून घेऊया का नवरी पिवळी साडी नेसते.
पिवळा रंग असतो शुभ
पिवळा रंग हा ऐश्वर्य आणि समृद्धीचा मानला जातो. त्यामुळे पिवळ्या रंगाला विवाहात फारच जास्त महत्व आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावली जाते. त्यामागेही नितळ कांती आणि सुंदरता असते. लग्नाच्या आधी हळद लावल्यामुळे नववधूच्या आणि वराच्या सौंदर्यात भर पडते असे म्हणतात. त्यामुळे हळद लावली जाते. याशिवाय लग्नात हळदीचे महत्व आहे. आता पिवळा रंग शुभ असल्यामुळे त्याचा वापर अधिकाधिक केला जातो. हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल.
साडीचा रंग दिसतो खुलून
पिवळा हा असा रंग आहे जो कोणीही नेसला तरी तो खुलूनच दिसतो. त्यामुळे शुभ रंग म्हणून आणि शोभून दिसणारा रंग म्हणून पिवळ्या रंगाची खास निवड यासाठी केली जाते. अनेक ठिकाणी आजही नवरीला पिवळ्या रंगाची साडी नेसवली जाते.
पूर्वी साड्यांमध्ये इतकी विविधता मिळत नव्हती. इतकेच नाही तर सतत साड्या घेण्यासाठी फारसा पैसाही नसायचा. त्यामुळे बाजारात मिळणारा आणि उठून दिसणारा रंग घेतला जायचा. पिवळा रंग हा कायम उठून दिसतो. शिवाय ही साडी नंतरही काही काळ नवरीला नेसाव लागायची. नवी नवरी ओळखता येण्याचा हा सोपा मार्ग होता. त्यामुळे पिवळी साडी नेसली जायची.
पिवळा रंग हा आनंद घेऊन येतो. त्यामुळे जर नवरीला समृद्ध आणि आनंद देणाऱ्या रंगामध्ये ठेवले तर तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यामुळे की काय नवरीला पिवळ्या रंगाची साडी नेसवली जाते.
2022 मध्ये लग्न मुहूर्तांचा धमाका, वेळीच ठरवा तारीख
हल्ली दिसते विविधता
लग्नात काही विधींपुरतीच पिवळी साडी नेसवली जाते. पण वरासाठी कोणताही खास असा रंग नसतो. हल्ली थोडासा मॅचिंग आऊटफिट घालण्याचा काळ असल्यामुळे खूप जण वेगवेगळे रंग घेताना दिसतात. साडीच्या रंगामध्ये विविधता आणली तर आताच्या काळात चालून जाते. कोणताही शुभ रंग घेऊन तुम्ही लग्नात उभे राहू शकता. त्यामुळे तुम्ही योग्य रंग निवडून तो रंग परिधान करायला हवा. काळा, करडा रंग सोडून तुम्हाला कोणता रंग शोभून दिसतो याचा विचार तुम्ही नक्की करायला हवा.
आता नववधू म्हणून पिवळी साडी घेताना वरील गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा.