केस

हेअर एक्सटेन्शन करायचा विचार करताय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leenal Gawade  |  Jan 24, 2022
हेअर ए्क्स्टेन्शन करताना

 खूप लांब केस आवडतात? केसांचा वॉल्युम ही हवा आहे का?  केसांना इन्स्टंट अशा या सगळया गोष्टी हव्या असतील तर तुम्हाला ‘हेअर एक्सटेन्शन’ हा प्रकार नक्की ट्राय करायला हवा. सध्या सगळ्या सुसज्ज अशा क्लिनिकमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. तुमच्या केसांची लांबी कितीही असली तरी देखील तुम्हाला तुमच्या आवडीनुसार केसांची लांबी करुन मिळू शकते. पण केसांना हेअर एक्स्टेन्शन करताना काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात.जाणून घेऊया हेअर एक्स्टेन्शनची सगळी माहिती

नैसर्गिक पद्धतीने घरीच करा केराटिन ट्रिटमेंट, सोपी पद्धत

हेअर एक्सटेन्श कोणासाठी?

हेअर एक्स्टेन्शन केल्यानंतर

हेअर एक्स्टेन्शन हे सगळ्यांसाठी असते. असे सांगितले जाते. पण ज्याच्या केसांची वाढ चांगली आहे. केस चांगले जाड आहेत. अशांना तशी काहीही गरज नसते. पण तरीदेखील खूप जणांना थोडा और म्हणत… हे एक्स्टेन्शन करायला आवडतात. हेअर एक्स्टेशन लावताना त्याचा उल्लेख स्ट्रँड असा केला जातो. तुमच्या केसांना किती स्ट्रँड लागतील याचा अंदाज तुम्हाला दिला जातो. तुम्ही अचानक केस कापून लेंथ कमी केले असतील आणि तुम्हाला काही खास कार्यक्रमांसाठी लांब केसांची गरज असेल तर तुम्ही अगदी हमखास केसांना एक्स्टेन्शन करुन घेऊ शकता. हेअर एक्स्टेन्शसाठी वापरले जाणारे केस हे खरे केस असतात. त्यावर प्रक्रिया करुन ते एकत्र केले जाते.

हिवाळ्यात किती दिवसांनी धुवावेत केस

कसे केले जाते हेअर एक्स्टेन्शन?

वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही हेअर एक्स्टेन्शन करायचे निश्चित केले असेल. तर तुम्हाला लगेचच त्यासाठी हेअर स्ट्रँड किती लागतील याचा अंदाज दिला जातो. शिवाय केसांची लांबी देखील सांगितली जाते. तुम्हाला किती लांबी हवी त्यानुसार ते खास बनवून घेतले जातात. काही क्लिनिक इतके मोठे असतात की त्यांच्याकडे या वेगवेगळ्या लेंथच्या स्ट्रँड उपलब्ध असतात. हेअर स्ट्रँड घेतल्यानंतर तुमच्या कोणत्या भागाला जास्त गरज आहे . त्याच्या रुट्सपासून थोडीशी जागा सोडून मग एका विशिष्ट मशीन आणि गोंदने तो केस चिकटवला जातो.त्यानंतर त्या ठिकाणी तो इतका चांगला बसतो की तो पटकन निघत नाही. तुम्ही अगदी कसेही केस विंचरले आणि धुतले तरी देखील ते निघत नाही. तुम्हाला ते चांगली वॉरंटी देखील दिली जाते.त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त तुम्हाला हवी तशी हेअरस्टाईल करता येते.

केस काढण्याची पद्धत

तुम्हाला हेअर स्ट्रँड नको झाले असतील म्हणजेच ते काढायचे असतील तर तर तुम्ही ते खेचून काढू शकत नाही. अशी चुकी तुम्ही कधीही करु नका. याचे कारण असे की, केस काढण्यासाठीही खास पद्धत असते. त्यामुळे तुम्ही केस खेचून अजिबात काढू नका. कारण त्यामुळे केसांना दुखापत होऊ शकते. केसांना लावलेला एक ग्लू असतो. तो कसाही काढता येत नाही. त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला केस काढून टाकायची इच्छा असेल तर अशावेळी तुम्ही थेट तुम्ही केलेले सलोन किंवा क्लिनिक गाठा. ते तुम्हाला योग्य पद्धतीने ते काढून देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या केसांना दुखापत देखील होत नाही. शिवाय जर तुम्हाला ते काढून न टाकता फक्त काळजी घ्यायची असेल तर तुम्ही चांगला हेअर वॉश देखील करुन घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला केस चांगले ठेवण्यासाठी मदत मिळेल. पण पैसे वाचवण्यासाठी अजिबात घरात ओढून किंवा व्हिडिओ पाहून केस बांधायची चुकी अजिबात करु नका. 

हेअर एक्स्टेन्शन म्हणजे काय? ते जाणून घेतल्यानंतर नक्कीच ते एकदा ट्राय देखील करा.

Read More From केस