DIY फॅशन

यंदा लग्नसोहळ्यासाठी घ्या इंडियन फ्युजन वेअर आणि दिसा उठून

Leenal Gawade  |  Dec 22, 2019
यंदा लग्नसोहळ्यासाठी घ्या इंडियन फ्युजन वेअर आणि दिसा उठून

सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. तुमच्या मैत्रिणीचं, खास मित्राचं लग्न असेल आणि तुम्ही आतापर्यंत काहीही खरेदी नसेल तर यंदा काही तरी हटके ट्राय करा. कारण तुम्हाला इंडियन किंवा वेस्टर्न वेअरपेक्षाही फ्युजन वेअर हा चांगला पर्याय सध्या उपलब्ध आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही हटके फ्युजन वेअर सांगणार आहोत ज्यांचा पॅटर्न हटके आहेत. शिवाय हटके पॅटर्नमुळे हे ड्रेस उठूनसुद्धा दिसतात. पाहुयात असेच काही हटके इंडियन फ्युजन वेअर

असा ब्लाऊज शिवल्यास जाड हातही दिसतील बारीक

रेडी टू वेअर धोती साडी

Instagram

लग्न म्हटले की, हमखास साडी नेसली जाते. साडी नेसायला अनेक जणांना आवडते. तुम्ही ही  #sareelover असाल तर तुम्ही हा हॅटन वापरुन पाहायला हवा. साडीप्रमाणे या पॅटर्नला स्टायलिश ब्लाऊज असतो. बॉटमला धोती असते आण तुमच्या साडीच्या पदराप्रमाणे याला एक पदर असतो आता या पदराला थोड्या फ्रिल्स लावल्यामुळे या साड्या छान उठून दिसतात. तुम्हाला साडीत वावरायचे कसे असा प्रश्न पडला असेल किंवा साडीत तुम्हाला पटपट चालता येत नसतील तर तुम्ही अशा प्रकारच्या साडी नेसून पाहा तुम्हाला नक्कीच आवडतील. 

ट्रेंडी गाऊन

Instagram

हल्ली गाऊन या प्रकाराची फारच चलती आहे. जर तुम्हाला गाऊन हा प्रकार आवडत असेल तर तुमच्याकडे अशा पद्धतीचा एक तरी गाऊन असायला हवा. ऑफ शोल्डर, सील्हवलेस, नेटेड, शीमर, लाईड वेट अशा वेगवेगळ्या स्वरुपात तुम्हाला गाऊन मिळू शकतात. पण गाऊनची निवड करताना तुम्हाला हलक्या गाऊनची निवड करणे नेहमीच बेस्ट राहील कारण ते कॅरी करायला फारच सोपे असतात. त्यामुळे तुम्ही गाऊनची निवड करताना या गोष्टी हमखास लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा गाऊन तसाच पडून राहणार नाही.

साडी गाऊन

Instagram

साडीमध्ये तुम्हाला इतक्या व्हरायटी मिळतात की, तुम्ही कधी नाहीच म्हणू शकत नाही. गाऊन आणि साडी असं एक कॉम्बिनेशनही तुम्हाला अगदी हमखास पाहायला मिळेल. तुमच्या रेग्युलर स्ट्रेट गाऊनला एक पदारासारखा भाग जोडलेला असतो. त्यामुळे वरुन पाहिल्यानंतर तुम्ही साडी नेसली असा भास होतो. आता यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारतले नेक मिळतात. तुम्हाला जर थोडा फँन्सी लुक हवा असेल तर तुम्ही ऑफ शोल्डर किंवा हॉल्टर नेक असे काही पॅटर्न निवडायला काहीच हरकत नाही. 

उंची कमी असली तरी तुम्ही घालू शकता ‘मॅक्सी’ ड्रेस, वाचा टीप्स

थ्री पीस सेट

Instagram

सध्या तुम्हाला ट्रेडिशनलवेअरमध्ये जॅकेट हा प्रकार सगळ्यात जास्त पाहायला मिळतो. म्हणजे ब्लाऊज किंवा टॉप, स्कर्ट, पँट किंवा पलाझो आणि त्यावर जॅकेट घालण्याचा एक ट्रेंडच सध्या आहे. या भरगच्च ड्रेसमुळे तुम्हाला यावर फार काही ज्वेलरी घालण्याची गरज नसते. अनेकदा या ड्रेसचे गळे इतके बंद असतात की, ज्वेलरीची फार गरज भासत नाही. तुम्ही एखादं मोठं कानातलं घातलं तरी चालून जातं.

स्ट्रेट फिट पँट ड्रेसेस

Instagram

जर तुम्ही अजिबातच ट्रेडिशनलवेअर घालत नसाल तर मात्र तुम्हाला कितीही वेगळे कपडे घेऊन फायदा नसतो. कारण असे कपडे बरेचदा घातले जात नाही. जर तुम्ही या प्रकारातले असाल तर तुम्ही स्ट्रेट फिट पँट घ्या. कारण तुम्हाला जीन्स किंवा इतर पँटप्रमाणेच त्याची फिटींग वाटेल. आता तुम्हाला थोडा फँन्सी प्रकार चालणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच व्हरायटी मिळू शकेल. यामध्येही तुमचा लुक नक्कीच खुलून दिसेल, 


आता लग्नासाठी काय घेऊ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्यासाठी #indowesternfusion प्रकारातील ड्रेस आहेत हे विसरु नका.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From DIY फॅशन