मनोरंजन

Indian Idolचे हे विजेते सध्या काय करत आहेत, जाणून घ्या

Leenal Gawade  |  Aug 4, 2019
Indian Idolचे हे विजेते सध्या काय करत आहेत, जाणून घ्या

आता सगळ्या चॅनेलवर रिअॅलिटी शोजचा पाऊस सुरु आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या देशातील पहिला रिअॅलिटी शो होता Indian Idol.संगीतावर आधारीत असलेला हा पहिला वहिला रिअॅलिटी शो इतका गाजला की या रिअॅलिटी शोजनंतर एकामागोमाग एक अनेक रिअॅलिटी शोसुद्धा सगळ्या चॅनेलवर सुरु झाले. या टॅलेंट शोच्या माध्यमातून उत्तम गायक देशाला मिळाले. Indian Idol हा रिअॅलिटी शो 2004 साली सुरु झाला. त्यानंतर आजपर्यंत याचे 10 सीझन झाले आहेत. 11 वा सीझन लवकरच येणार आहे. पण तुम्हाला पहिल्या 5 सीझनचे विजेते सध्या काय करत आहेच माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया.Indian Idol या रिअॅलिटी शोजचे पहिल्या 5 सीझनचे विजेते सध्या काय करत आहेत.

बॉलीवूडचे हे कलाकार आहेत ‘शुद्ध शाकाहारी ‘ 

अभिजीत सावंत (Abhijeet sawant)

Instagram

Indian Idolच्या पहिल्या सीझनचा विजेता मुंबईचा मराठमोळा मुलगा अभिजीत सावंत झाला. जिंकण्याचा कोणताही विचार केलेला नसताना त्याने हे टायटल त्याच्या टॅलेंटवर मिळवले. त्याने या सीझनमध्ये गायलेले ‘ज्युली’ हे गाणं त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं. अमित साना आण अभिजीत सावंत यांच्यामध्ये अखेरपर्यंत ही लढत पाहायला मिळाली. पण यामध्ये अभिजीत सावंतने बाजी मारली. पहिल्या सीझनचे अनेक चेहरे आजही त्यांचा ठसा उमटवून आहेत. प्राजक्ता शुक्रे, राहुल वैद्य, अमित टंडन, मयांग चँग यांना या रिअॅलिटी शो चा चांगलाच फायदा झाला. अभिजीत सावंतला Indian Idol जिंकल्यानंतर अनेक गाण्यासाठी प्ले बॅक सिंकींगच्या ऑफर्स मिळाल्या. ‘आशिक बनाया आपने’, ‘जवानी दिवानी’, ‘तीस मार खान’, ‘मंगलाष्टक वनस्मोर’, ‘डिश्श्युम’ या चित्रपटांसाठी त्याने प्ले बॅक सिंगिग केले आहे. तो अनेक स्टेज शोज करतो.शिवाय मालिका आणि चित्रपटांमध्येही त्यांनी गेस्ट अपिअरंस दिला आहे. 

संदीप आचार्य (Sandeep acharya)

Instagram

Indian Idol सीझन 2 चा विजेता संदीप आचार्य. आता कोणाला फारसा लक्षातही नसेल कारण Indian Idol ही स्पर्धा जिंकल्यानंतर अगदी 6 वर्षांत त्याचे निधन झाले. त्याने काही काळ काम केले. पण त्यानंतर तो आजारी होता. त्याच्या प्रदीर्घ आजारातच त्याचे निधन झाले. तो 29 वर्षांचा होता. Indian Idol जिंकल्यानंतर त्याने एक वर्षभर sony music सोबत काम केले. बिकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या संदीपचा मृत्यू गुडगावच्या एका हॉस्पिटलमध्ये झाला. त्याने अनेक जुन्या गाण्यांची कव्हर सॉंग गायली होती. या सीझनचा रनरअप एन.सी. करुण्य होता. मुळचा हैदराबादचा असलेल्या करुणाने अनेक तेलगु चित्रपटासाठी गाणी गायली आहेत.

दिशा पटनीच्या या नखऱ्यांमुळे निर्माते झाले हैराण

प्रशांत तमांग (Prasaht tamang)

Instagram

Indian Idol सीझन 3 चा विजेता झाला प्रशात तमांग. दार्जिलिंगचा प्रशांत हा मूळ नेपाळी असून या सीझनमध्ये अमित पॉल हा रनरअप होता. ही स्पर्धा जिंकल्यानंतर प्रशांत तमांगने नेपाळी चित्रपाटातून काम करायला सुरुवात केली. त्याने आता पर्यंत तीन चित्रपटांमध्ये काम केले असून ‘गोरखा पलटन’ हा त्याचा पहिला चित्रपट..या चित्रपटासाठी त्याने प्ले बॅक सिंगिंगही केली होती. 2016 साली त्याने ‘ये माया हनैमा’ या चित्रपटात काम केले. निशाणी आणि परदेशी हे दोन त्याचे गाजलेले चित्रपट. तर या स्पर्धेचा रनर अप असलेल्या अमित पॉललाही अनेक चित्रपटांसाठी प्ले बॅक सिंगर म्हणून गाण्याची संधी मिळाली. 

सुरभी ठेबारमा (Sourbhee debbarma)

Instagram

Indian Idol सीझन4 ची विजेती सुरभी ठरली. हीच तिच सुरभी ठेबारमा आहे जिने तिच्या नावी गिनीझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तिने अपसाईड डाऊन गाण्याचा रेकॉर्ड केला. पहिल्यांदाच या सीझनची विजेती ही महिला झाली. या आधीही कधीही या रिअॅलिटी शोमध्ये मुलगी शेवटपर्यंत पोहोचली नव्हती. मुळची त्रिपुरा येथील सुरभी सध्या अनेक अल्बमसाठी गाणी गाते. तिन तिची अनेक सोलो गाणी देखील गायली आहेत. या सीझनचा रनरअप ठरला होता कपिल थापा.या कपिल थापासोबतच सुरभीने लग्न केलं.

बॉलिवूडमधील हे सेलिब्रिटी आहेत यंग.. जाणून घ्या त्यांचे वय

श्रीरामचंद्रा (Sreeramachandra)

Instagram

Indian Idol सीझन 5 चा विजेता ठरला तो श्रीरामचंद्रा. मूळ आंध्रप्रदेशातील श्रीरामचंद्रा सध्या हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टी गाजवत आहे. श्रीरामचंद्राचा करिअर ग्राफ चढाच आहे. त्याने अनेक मोठ्या चित्रपटांसाठी प्ले बॅकसिंगिंग केलेले आहे. अनेक दिग्गज कंपोझरसोबत त्याने काम केले आहे. त्याने अनेक जुन्या गाण्यांचे रिमेक व्हर्जन गायले आहे.त्याने गाण्यासोबतच साऊथच्या चित्रपटातही काम केले आहे. त्याने त्याच्या अॅक्टिंगची झलक इन्स्टाग्रामवरही पोस्ट केली होती. दिसायला हँडसम असलेल्या श्रीरामचा फॅनफॉलोईंग खूप मोठा आहे. 50 हून अधिक गाणी त्याने आतापर्यंत गायली आहेत. या सीझनचा रनरअप राकेश मिआमी ठरला.

तर हे आहेत Indian Idol च्या 1 ते 5 सीझनचे विजेते जे आता त्यांच्या क्षेत्रात चमकत आहेत. दुर्दैवाने यातील एक तारा फारच आधी निखळला. पण या स्पर्धेतील विजेतेच नाही तर स्पर्धकही चमकत आहेत.

Read More From मनोरंजन