आरोग्य

वारंवार झोप येत असेल तर तपासून घ्या, झाला नाही ना ‘हा’ आजार

Dipali Naphade  |  Jan 1, 2020
वारंवार झोप येत असेल तर तपासून घ्या,  झाला नाही ना ‘हा’ आजार

तुम्हाला सतत झोप येत आहे का? तरीही तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सतत कोणत्याही क्षणी आणि कुठेही तुम्हाला झोप येत असेल आणि झोपेवर नियंत्रण राहात नसेल तर तुम्हाला नार्कोलेप्सी या आजाराने घेरलं असण्याची शक्यता आहे. तुम्ही वेळीच याकडे लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. खरं तर ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे असं म्हटलं जातं. पण याची लक्षणं आणि त्यावरील उपायदेखील माहीत असणं आवश्यक आहे. नार्कोलेप्सीची नक्की लक्षणं काय आहेत? हा आजार कसा ओळखायचा याबद्दल बऱ्याच जणांना माहीत नसतं. सतत थकवा येत आहे म्हणून झोप येत असेल असं समजून या आजाराकडे दुर्लक्ष करण्यात येऊ शकतं. पण याबद्दल वेळीच जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही या लेखातून तुम्हाला नार्कोलेप्सी या आजाराबद्दल माहिती देणार आहोत. तुम्हालाही  झोप आवरत नसेल तर तुम्ही ही लक्षणं जाणवत आहेत का हे तपासून घ्या. 

नार्कोलेप्सीची लक्षणं

नार्कोलेप्सीची नक्की काय लक्षणं आहेत हे आपण पाहूया – 

1. कधीही आणि केव्हाही झोप येणं

Shutterstock

तुम्हाला अगदी रात्री झोप पूर्ण झाली असली तरीही झोप येत असेल. कुठेही तुम्ही बसल्याजागी झोपत असाल अथवा तुमचं तुमच्या झोपेवर अजिबात नियंत्रण नसेल तर तुम्हाला नक्की नार्कोलेप्सीचा त्रास आहे. अगदी ऑफिसमध्ये काम  करत असतानाही तुमच्या डोळ्यावर झोप येत असेल आणि सतत होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता आहे. 

2. सकाळी उठायला सतत उशीर होणे

Shutterstock

रात्री वेळेवर झोपूनही सकाळी रोज उठायला उशीर होत असेल अथवा डोळ्यावरची झोप उडतच नसेल. तर नक्कीच तुम्ही स्वतःला तपासून घ्यायला हवं. सकाळी डोळे उघडल्यानंतरही पुन्हा पुन्हा झोपायला तुम्ही जात असाल तर तुम्हाला हा आजार असल्याचं लक्षण आहे. 

3. स्लीप पॅरालिसिसची समस्या उद्भवू शकते

अति झोपण्याने तुम्हाला स्लीप पॅरालिसिसची समस्याही उद्भवू शकते.  झोपेतच पॅरालिसिसचा अटॅक येण्याचं प्रमाण आजकालच्या जीवनशैलीमुळे वाढलं आहे. त्यामुळे अति झोप येत असेल तर तुम्हाला झोपेतच असा झटका आल्यास तुमच्या प्राणावर बेतू शकतं याचा नीट विचार करा आणि जर सतत झोप येत असेल तर वेळीच सावध व्हा. 

4. सतत आळस अथवा थकवा जाणवत राहणं

खरं तर हे मूळ कारण आहे. सतत आणि थकवा जाणवत राहण्याने झोपावं वाटतं. हे लक्षण सर्वात महत्त्वाचं आहे. हे लक्षण जाणवू लागल्यानंतरच तुम्ही डॉक्टरकडे जायला हवं. या कारणाने झोप अधिक येत राहाते आणि कामाने थकवा अथवा आळस आला आहे असा आपला अंदाज असतो त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. पण हे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. 

शांत झोप येण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

5. सतत झोप येणं

Shutterstock

सतत झोप येणं हेदेखील महत्त्वाचं लक्षण आहे. कितीही काहीही केलं तर डोळ्यावरील झोप न उडणं आणि तासनतास झोप काढणं हे या आजाराचं लक्षण आहे. त्यामुळे तुम्हीही तासनतास झोपत असाल तर वेळीच याकडे लक्ष द्या. 

नार्कोलेप्सवरील उपाय

नार्कोलेप्स हा आजार झाला आहे म्हणजे त्यावर उपायही नक्कीच असणार आणि त्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही. अगदी सोपे उपायदेखील यावर आहेत. 

तुम्हाला झोपायला आवडतं?, मग जाणून घ्या झोपण्याची योग्य पद्धत

1. डॉक्टरांचा सल्ला घेणे

सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे. असं कोणत्याही प्रकारचं लक्षण दिसू लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे डॉक्टरांकडे जाणं आणि त्यांच्याकडून योग्य सल्ला घेणं. त्यामुळे वेळीच तुम्ही झोपेवर नियंत्रण आणू शकाल. 

2. झोपण्याच्या आणि उठण्याची वेळ निश्चित करा

तुम्ही किती वाजता झोपणार आणि उठणार याची एक वेळ निश्चित करा आणि ती पाळा. कितीही झोप आली तरीही तुम्ही निश्चित केलेली वेळ पाळणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला कितीही त्रास होत असला तरी हा उपाय केल्यास हळूहळू तुम्हाला सवय होईल आणि तुमची झोप कमी होण्यास मदत होईल. मुळात 8 तासापेक्षा अधिक झोपू नका. त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. 

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

3. रिकाम्या वेळी डुलकी घ्या

Shutterstock

दिवसभरात जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा मात्र साधारण 15 मिनिट्सची डुलकी घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्ही थकलेले असता त्यामुळे अशी डुलकी काढणं नक्कीच योग्य आहे. त्यामुळे तुम्ही फ्रेशही राहाता आणि सतत झोपही डोळ्यावर राहात नाही. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

Read More From आरोग्य