लाईफस्टाईल

आंतरराष्ट्रीय कामगार दिन माहिती | International Labour Day Information In Marathi

Trupti Paradkar  |  Apr 26, 2022
आंतरराष्ट्रीय कामगार दिन माहिती | International Labour Day Information In Marathi

१ मे या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे कारण या दिवशी महराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र एवढंच नाही १ मेला आंतरराष्ट्रीय महत्त्वदेखील आहे. कारण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या एका कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजही जगभरात साजरा करण्यात येणारा हा एक खास दिवस आहे. भारतात कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. विशेष म्हणजे जगभरात अनेक देशांमध्ये हा दिन निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो.यासाठीच जाणून घ्या १ मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरा केला जातो. यासोबतच सर्वांना द्या कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कामगार दिनामागचा इतिहास – History Behind International Labour Day

कामगार दिन साजरा करण्याची सुरुवात कामगारांच्या हितानिमित्त झालेल्या एका चळवळीतून झाली. १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका तीव्र चळवळीला सुरूवात झाली. ज्यात कामगारांच्या  हितासाठी काही मागण्या करण्यात आल्या होत्या. पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी केली होती. दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत यासंदर्भात ही मागणी होती. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ पुढे मग अमेरिका, कॅनडामधील कामगार संघटनांनी पुढाकार घेत १९८६ मध्ये कामगारांच्या  हितासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. अशाच एका मोर्च्यामध्ये शिकागो मधील सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. ज्याबद्दल कामगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पोलिसांवर राग व्यक्त करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने  बॉंम्ब टाकला आणि त्यात आठ पोलिसांचा मृत्यू आणि पन्नास पोलीस जखमी झाले होते. याची शिक्षा म्हणून आठ आंदोलन कर्त्यांना फाशी देण्यात आली होती. मात्र त्यामुळे जगभरात संतापाची लाट पसरली कारण त्या आठ जणांपैकी एकानेही बॉंम्ब फेकलेला नव्हता. या रक्तरंजित इतिहासानंतर या आंदोलनाला एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. १९९० ला कामगारांची ही चळवळ यशस्वी झाली. शिकागोमधील या घटनेचे स्मरण करण्यासाठी रेमंड लेविन यांनी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी केली. त्यांनी ही मागणी १९८९ साली आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरीस परिषदेत केली होती. त्या परिषदेमध्ये १ मे १८९० हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढे १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक मान्यता देण्यात आली. ज्यामुळे आज जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. 

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे महत्त्व – Significance Of International Labour Day

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा का केला जातो याविषयी काही महत्त्वाची माहिती

भारतातील कामगार कायदे – Labour Act In India

ज्या लोकांकडे पुरेसे शिक्षण नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा लोकांना आयुष्यात भरपूर कष्टाची कामे करावी लागतात. जगण्यासाठी पुरेसा पैसे कमवणे याची चिंता करण्यात त्यांचे आयुष्य जाते. कामगार चळवळीनंतर कामगाराच्या हितासाठी प्रत्येक देशात काही कायदे करण्यात आले आहे. भारतीय कामगार कायदा म्हणजे भारतातील कामगारांचे नियम करणारा कायदा. भारतात कामगारांना योग्य संरक्षण मिळावे यासाठी काही कायदे करण्यात आलेले आहेत. यात २०० राष्ट्रीय आणि ५० केंद्रिय कायद्यांचा समावेश आहे. भारतातील कामगार कायद्यांची व्याख्या एकसंध नाही. कारण सरकार स्थापना आणि भारतीय घटनेच्या समवर्ती यादीत कामगार हा एक विषय असल्यामुळे ते प्रत्येक राज्यात भिन्न आहेत. मात्र भारतात यासंदर्भात एक महत्त्वाचा कायदा नक्कीच करण्यात आले आहे. जो आहे “दी चाईल्ड लेबर अॅक्ट ऑफ 1986” थोडक्यात बालकामगार कायदा. लहान मुलांच्या हितासाठी करण्यात आलेला हा कायदा आहे. बऱ्याचदा लहान वयातच कष्टाची कामे करावी लागल्यामुळे अनेक लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या कायद्यानुसार भारतात चौदा वर्षांखाली बालकांना मजूरी अथवा काम करण्यास मनाई आहे. कामगारांच्या कामाची गुणवत्ता वाढवणे तसेच लहान मुलांचा मजूरीसाठी गैरवापर आणि छळवणूक टाळणे यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. 

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम – Theme Of International Labour Day

जगभरात दररर्षी कामगार दिन साजरा करण्याबाबत एक खास थीम ठरवण्यात येते.

२०१६ साली यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीचा उत्सव साजरा करणे ही थीम होती. 

२०१७ साली कामगार दिनाची थीम होती राष्ट्रीय वारशाचे जतन करणे. 

२०१८ साली सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे ही थीम राबवण्यात आली. 

२०१९ ची थीमदेखील होती सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे.

२०२० साली कोरोना व्हायरस महामारीमुळे कामाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षितता राखणे ही थीम ठेवण्यात आली होती. यंदा देखील जगभरात कोरोना व्हायरसचे सावट पसरलेले आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षित राहून काम करणे हेच जीवनासाठी महत्त्वाचे आहे. 

२०२१ साली आंतराष्ट्रीय कामगार दिनाची थीम होती, आताच कृती करा, बालमजुरी बंद करा.

२०२२ म्हणजेच यंदाची आंतराष्ट्रीय कामगार दिनाची थीम आहे.बालमजुरीविरूद्ध जनजागृती करणे आणि बालमजुरीचे प्रमाण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर लक्ष केद्रिंत करणे.

You Might Also Like

Labour Day Poem is English
Labour Day History & Significance in English

Read More From लाईफस्टाईल