घर आणि बगीचा

कपडे इस्त्री करण्याचा वेळ वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

Trupti Paradkar  |  Apr 11, 2021
कपडे इस्त्री करण्याचा वेळ वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

कडक इस्त्रीचे कपडे वापरणं हा आजकाल प्रतिष्ठेचा  प्रश्न आहे. बऱ्याचदा कपडे धुतल्यानंतर इस्त्री करण्यासाठी लॉन्ड्रीत दिले जातात. असे टापटीप कपडे वापरणं प्रत्येकाला आवडत असेलच. पण सध्या कोरोनामुळे सर्वजण घराबाहेर लॉन्ड्रीत कपडे इस्त्री करण्यासाठी देण्याऐवजी ते घरीच इस्त्री करणं सुरक्षित समजतात. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एवढी काळजी तर प्रत्येकाने घ्यायलाच हवी. पण यामुळे तुमच्या घरकामात आणखी एका कामाची भर पडते.  घरी इस्त्री करणं कितीही सोपं असलं तरी यात तुमचा बराच वेळ वाया जातो. यासाठीच आम्ही तुम्हाला कपडे इस्त्री करण्यासाठी  अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ वाचू शकेल. 

इस्त्रीवरील योग्य टूल्स वापरा –

जर तुम्हाला झटपट आणि कमीत कमी वेळात तुमचे कपडे इस्त्री करायचे असतील तर योग्य टूल्सचा वापर करा. आजकाल यासाठी अत्याधुनिक इस्त्रीची साधनं उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पाणी शिंपडून स्टीम देण्याची सोय केलेली असते. ज्यामुळे तुमच्या कपड्यांवरील चुरघळ्या झटकन कमी होतात. शिवाय कोणत्या कपड्यासाठी इस्त्रीचा कोणता मोड वापरावा हे समजले की तुमचे काम सहज होते. कारण इस्त्रीवर सिल्क, कॉटन, वुलन, शिफॉन, पॉलिस्टर अशा निरनिराळ्या कापडासाठी निरनिराळे मोड असतात. कपडे इस्त्री करण्याआधी तुम्हाला त्याच्यासाठी हे मोड सिलेक्ट करावे लागतात. योग्य मोड सिलेक्ट करून इस्त्री केल्याने तुमचा खूप वेळ वाचू शकतो.  

pexels

कपडे सुकवणे आणि घडी घालणे आहे महत्त्वाचे –

कपडे धुतल्यावर ते व्यवस्थित वाळत न घातल्यामुळे अथवा सुकल्यामुळे योग्य पद्धतीने घडी करून न ठेवल्यामुळे जास्त प्रमाणात चुरघळतात. अशा चुरघळलेल्या कपड्यांना इस्त्री करण्यास खूप वेळ आणि मेहनतीची गरज असते. लॉन्ड्री मध्ये असे कपडे  करण्यासाठी खास इस्त्री असते. मात्र तुमच्या घरातील इस्त्री तितकी पॉवरफुल नसते. त्यामुळे असे कपडे घरी इस्त्री करणं एक प्रकारची डोकेदुखीच ठरू शकते.  मात्र जर तुम्ही कपडे धुतल्यावर ते नीट झटकून वाळत घातले आणि सुकल्यावर ते व्यवस्थित घडी घालून ठेवले तर तुमचा इस्त्री करण्यासाठी लागणारा वेळ वाचू शकतो. तुमचा अमुल्य वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी तुम्हाला ही सोपी युक्ती  फॉलो करायलाच हवी. 

न चुरघळणाऱ्या कापडाचे आऊटफिट निवडा –

इस्त्री करण्यात तुमचा फारच वेळ वाया जात असेल तर सरळ अशा प्रकारच्या कापडाचे कपडे वापरा जे लवकर चुरघळत नाहीत. पॉलिस्टर आणि पॉलि ब्लेंडेड कपड्यांना इस्त्री करण्याची मुळीच गरज लागत नाही. मुळात धुतल्यावर ते जास्त चुरगळत नसल्यामुळे वाळल्यावर तुम्ही इस्त्री न करताच असे कपडे वापरू शकता. शिवाय अशा कपड्यांवर थोडीशी गरम इस्त्री फिरवूनही तुमचे  काम होऊ शकते. यासाठीच जर तुम्हाला घरी इस्त्री करण्यास मुळीच वेळ नसेल तर अशा प्रकारच्या कापडाचे कपडे निवडा. 

हेअर ड्रायर अथवा स्ट्रेटनरचा वापर करा –

कपडे आधीच इस्त्री केल्यावरही ते ठेवून ठेवून चुरघळतात. जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असतं तेव्हा नेमकं कुठेतरी एखादी मोठी फ्लेट तुम्हाला दिसते. अशा वेळी पटकन कपडे फक्त नीट नेटके करायचे असतील तर ही युक्ती अगदी सोयीची आहे. कारण अशा वेळी तुम्ही परत तुमचे कपडे इस्त्री करत बसू शकत नाही. मग अशा वेळी काय करायचं तर तुमच्या घरी हेअर ड्रायर अथवा हेअर स्ट्रेटनर असेलच. साडीचा पदर, प्लेट्स अथवा शर्टाची  कॉलर, कफ अशा ठिकाणी पटकन हा स्ट्रेटनर गरम करून फिरवा. ज्यामुळे तुमचे कपडे घालण्यासाठी परफेक्ट रेडी होतील. 

फोटोसौजन्य – Pexels


अधिक वाचा –

सिल्कचे कपडे घरीच ‘ड्राय क्लीन’ करण्यासाठी सोप्या टिप्स

उन्हाळ्यासाठी निवडा या प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे, त्वचेसाठी ठरतील बेस्ट

कधीच वापरू नयेत न धुता नवीन कपडे, होऊ शकतं त्वचेचं नुकसा

Read More From घर आणि बगीचा