श्रीदेवीचं अचानक जाणं जसं चाहत्यांच्या मनाला चटका लावणारं होतं. तसंच जान्हवी कपूरचं बॉलीवूडमध्ये पदार्पण पचवणं होतं. कारण श्रीदेवी सारख्या दिग्गज अभिनेत्री आणि बोनी कपूरसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी हे बिरूद जान्हवीवर आपोआप चिकटलं. घरात एवढे दिग्गज कलाकार असण्यामुळे जान्हवीकडून सुरूवातीपासूनच दर्जेदार अभिनयाची अपेक्षा केली गेली. जान्हवी मात्र या सर्व गोष्टींची पर्वा न करता तिला जमेल तसा बॉलीवूडमध्ये जम बसवत आहे. आजवर ती एकूण चार चित्रपटांमधून झळकली आहे. हळू हळू तिच्या अभिनयामध्ये चकाकी येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र आता जान्हवीला करिअरवर फोकस करण्याऐवजी लग्नाची स्वप्नं पडू लागली आहे. म्हणूनच की काय तिने चाहत्यांसोबत चक्कं तिचा वेडिंग प्लॅन शेअर केला आहे.
कसा असेल जान्हवीच्या लग्नाचा थाट
जान्हवीचा अगदी बॅचलर पार्टीपासून ते लग्नसोहळ्यापर्यंतचा पूर्ण वेडिंग प्लॅन तयार आहे. तिला धूमधडाक्यात नाही तर अगदी साधेपणाने लग्न करायचं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवीने तिच्या लग्नाबाबत खूप मोठा खुलासा केला आहे. तच्या मते तिची बॅचलर पार्टी केप्रीमध्ये असेल तर लग्न मात्र पारंपरिक पद्धतीने तिरूपतीमध्ये होईल. जान्हवीचा मेंदी आणि संगीत सोहळा मयलापूरमध्ये होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर तिला लग्नानंतर रिसेप्शनच करायचं नाही. तिच्या मते लग्नानंतर रिसेप्शनची खरंच गरज असते का. कारण लग्नसोहळा फक्त दोनच दिवसांचा असावा असं जान्हवीचं म्हणणं आहे. लग्न मात्र तिला विधीपूर्वक करायचं असून लग्नासाठी सजावट मोगऱ्याच्या फुलांची आणि पणत्यांची असावी असं तिला वाटत आहे.
जान्हवीचा वेडिंग आऊटफिट
लग्न सोहळा म्हटला की नवरीचा लुक आणि कपडे याची उत्सुकता सर्वांना असते. जान्हवी कपूरनेही तिचं नववधूचं रुप कसं असेल याबाबत खुलासा केला आहे. तिच्या मते ती लग्नात पारंपरिक कांजिवरम पट्टू पावडाई साडी नेसणार आहे. जी गोल्डन रंगाची असेल. मेंदीसाठी ती गुलाबी रंगाचा लेंगा आणि संगीत सेरेमनीसाठी पिवळ्या रंगाचे आऊटफिट परिधान करणार आहे. जान्हवीच्या लग्नात तिची ब्राईडमेड्स असणार आहेत. खुशी कपूर आणि अंशुला कपूर. कारण जान्हवीला वाटत आहे की लग्नात खुशी आणि तिचे वडील बोनी कपूर नक्कीच भावूक होतील तेव्हा तिची अंशुला दिदी सर्वांना सांभाळून घेईल.
खतरों के खिलाडीमध्ये टीव्हीवरील आदर्श सून करतेय जबरदस्त स्टंट
कोण आहे जान्हवीच्या आयुष्याचा जोडीदार
जान्हवीने एवढा वेडिंग प्लॅन शेअर केला आहे म्हणजे तिचा भावी पती कोण? याबाबत सर्वांना नक्कीच जाणून घ्यायचं असेल. मात्र जान्हवीने ते अजून शेअर केलं नाही कारण ती अजून अशा कोणत्याच व्यक्तीला भेटलेली नाही ज्याला ती आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारले. थोडक्यात जान्हवीने तिचं लग्नाबाबत असलेलं स्वप्न चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. मात्र तिचा भावी पती कसा असावा याचा अंदाज तिने सर्वांना दिला आहे. तिच्या मते तिचा पती समजूतदार असावा आणि तिच्यावर प्रेम करणारा असावा. असो… लवकरच जान्हवीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळावा आणि तिच्या मनाप्रमाणे तिचा लग्नसोहळा पार पडावा हीच इच्छा.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या घरी दुहेरी गोडवा, जुळ्या मुलांचा जन्म
‘सुपर डान्सर’ च्या मंचावर शिल्पा शेट्टी आता दिसणार नाही, वेगवेगळ्या सेलिब्रिटींची हजेरी
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade