लॉकडाऊनच्या काळात सगळे सेलिब्रिटी आपल्याला हवा तसा वेळ सध्या घालवत आहेत. कोणी आपला छंद जोपासत आहे. कोणी घरी राहून घरातील कामे शिकून घेत आहे. यामध्ये सोशल वर्क करणाराही एक गट आहे अनेक पद्धतीने मदत करण्यासाठी पुढे येत आहे. आता ही मदत म्हणजे अन्नधान्य पुरवठा, मुक्या प्राण्यांना जेवू घालणे असे सगळे अगदी व्यवस्थित सुरु आहे. क्योंकी सास भी कभी बहू थी फेम…. जया भट्टाचार्यने मात्र आणखी एक पाऊल पुढे जात समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅन्सरच्या रुग्णांसाठी तिने आपले केस दान केले आहेत. तिने चक्क केसांचे टक्कल केले आहे. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अंडरवर्ल्डच्या संपर्कामुळे संपले या अभिनेत्रींचे करिअर
का केले टक्कल?
जया भट्टाचार्यने हा व्हिडिओ शेअर करत तिने करत असलेल्या कामाबद्दल सांगितले आहे. तिच्या परीसरातील काही लोकं रस्त्यावरील प्राण्यांना जेवण वाढण्यासाठी जातात. हे सगळे करताना तिला खूप घाम येतो. कोरोनामुळे घरातून बाहेर पडल्यानंतर तिला घरी परत येऊन आंघोळ करावी लागते. कपडे धुवावे लागतात. यामध्ये केसांचे ओझे खूप तापदायक होत आहे. त्यामुळेच तिने केस काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केस काढतानाचा हा व्हिडिओ करताना तिने एक महत्वाचा संदेश दिला आहे तो म्हणजे तिने हे केस कॅन्सर रुग्णांसाठी वीग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तिने तिचे केस जपून ठेवले आहेत.
शेअर केला जोक
बरं हे सगळं करताना जयाने एक विनोदही केला आहे तो असा की, लॉकडाऊनमुळे सगळे काही बंद आहे. सगळी दुकाने बंद आहेत. आता या काळात मला केसांना बांधण्यासाठी रबरही मिळत नाही. त्यामुळे डोक्यावरचे हे ओझे काढून टाकणेच चांगले असे म्हणत तिने केस काढून टाकले आहेत.
लग्न तुटल्याच्या बातमीवर गायिका सुनिधी चौहानचं मौन पण…
चित्रपटांमधूनही केले काम
जयाच्या कामाचा आलेख पाहायचा झाला तर जयाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ते ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेमधून यामध्ये तिच्या ग्रे शेडमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली. तिच्या अभिनयामुळे तिला अनेक ठिकाणी संधी मिळाली. पण ती सध्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. पण तरीही तिच्या सोशल मीडियावर ती कायमच अॅक्टिव्ह असते.
लॉकडाऊनमध्ये टायगर आणि दिशा पटानी लिव्ह-इनमध्ये रहात असल्याची चर्चा
भूतदयावर ठेवते विश्वास
जया भट्टाचार्य कायमच तिच्या सोशल अकाऊंटवरुन अॅक्टिव्ह असते. ती तिच्या करीअरपेक्षाही भूतदयेवर जास्त विश्वास ठेवते. त्यामुळेच तिच्या इन्स्टाग्रामवर तुम्हाला प्राण्यांची काळजी घेणाऱ्या पोस्ट अगदी हमखास दिसू शकतील. तिच्या या कामाची अनेक लोकं तारीफ करतात. या लॉकडाऊनच्या काळातही सगळ्या नियंमाचे अगदी तंतोतंत पालन करुन ती या प्राण्यांची काळजी घेताना दिसत आहे.
सध्या तरी तिच्या या नव्या कामामुळे ती चर्चेत आली आहे.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade