बॉलीवूड

झाशीच्या राणीऐवजी पद्मावतीची वर्णी

Aaditi Datar  |  May 5, 2019
झाशीच्या राणीऐवजी पद्मावतीची वर्णी

बॉलीवूडमध्ये कोणाचा ना कोणाचा पत्ता कट होत असतो आणि त्या जागी नव्याची वर्णी लागत असतेच. असंच काहीसं झालं आहे कंगना रणौत आणि दीपिका पदुकोण यांच्याबाबत. सूत्रानुसार, बॉलीवूडच्या पद्मावतीने झासीची राणी कंगनाला रिप्लेस केलं आहे. कधी कधी या रिप्लेसमेंट्समुळेच अनेक बॉलीवूड चित्रपट सुपरहीट ही होतात.

दीपिका इन कंगना आऊट  

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बासूने आपल्या आगामी बिग बजेट चित्रपटासाठी कंगना रणौत साईन केलं होतं. पण कंगना तिच्या आगामी ‘पंगा’ या कबड्डीवरील आधारित सिनेमामध्ये बिझी असल्यामुळे तिला अनुरागच्या चित्रपटाला मुकावं लागलं आहे. तिचा पत्ता कट होताच दीपिकाची वर्णी अनुराग बासूच्या ‘ईमली’ या चित्रपटात लागली आहे.

सूत्रानुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दीपिका पदुकोणला ‘ईमली’साठी अप्रोच केलं आहे. दीपिकाने या चित्रपटाला हिरवा कंदील दिल्याचं कळतंय. पण याबाबत अजून चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अनुरागच्या आगामी ईमली बाबत फारच चर्चा आहे.

कंगना रणौत कशी साकारणार जयललिता यांची भूमिका

दीपिकाचा ‘छपाक’ तर कंगनाचा ‘पंगा’

दीपिका पदुकोणबाबत बोलायचं झाल्यास ती सध्या मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडीता लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दीपिका दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीचं दीपिकाच्या ‘छपाक’मधील लुकचे फोटो व्हायरल झाले होते. रणवीर सिंगशी लग्न झाल्यानंतर दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा आहे. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नामुळे दीपिकाने बराच काळ कोणताही चित्रपट साईन केला नव्हता. या मोठ्या ब्रेकनंतर आता तिचा आगामी छपाक हा 10 जानेवारी 20202 ला रिलीज होईल.

तर दुसरीकडे कंगनाबाबत बोलायचं झाल्यास ती सध्या ‘पंगा’ या आगामी चित्रपटाचं शूटींग मुंबईत सुरू आहे. मुंबईनंतर या चित्रपटाचं शूटींग कोलकता, भोपाळ आणि दिल्लीमध्ये होणार आहे. या चित्रपटात कंगणा रणौत कबड्डी प्लेयरच्या भूमिकेत दिसणार आहे.

आता पाहूया ही ‘ईमली’ दीपिकासाठी गोड आणि कंगनासाठी आंबट ठरते का?

Read More From बॉलीवूड