बॉलीवूड

Good News : कपिल आणि गिन्नीकडे आली गोड परी

Aaditi Datar  |  Dec 9, 2019
Good News : कपिल आणि गिन्नीकडे आली गोड परी

कपिल शर्मा आणि त्याची बायको गिन्नी चतरथसाठी आज खूपच आनंदाचा दिवस आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी हे दोघं आईबाबा झाले असून गिन्नीने गोड मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी कपिलने ट्वीट करून सगळ्यांना दिली. कपिलने त्याच्या ट्विटमध्ये लिहीलं आहे की, ‘आम्हाला मुलगी झाली आहे. तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. सर्वांना प्रेम. जय माता दी’ कपिलने हे ट्वीट करताच फॅन्सनी शुभेच्छा द्यायला सुरूवात केली. 

कपिलने या गोड बातमीचं ट्वीट पहाटे 3.30 केलं आहे. रॅपर गुरु रंधावाने कपिलला शुभेच्छा देत लिहीलं की, ‘बधाई हो मेरे पाजी. आता मी ऑफिशियली काका झालो आहे.’ तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही कपिलला शुभेच्छा दिल्या. त्यांनी शुभेच्छांमध्ये लिहीलं की, ‘मुलगी झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.’

कॉमेडियन आणि यूट्यूबर भुवन बामने लिहीलं आहे की, ‘भाइया आपको बधाई’ फॅन्सनीही कपिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कपिल शर्माने ऑक्टोबरमध्ये बेबी शॉवर पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटीजसोबतच द कपिल शर्मा शोमधली अनेक स्टार्सही उपस्थित होते. एवढंच नाहीतर काही दिवसांपूर्वीचं कपिलने गिन्नीला बेबीमूनसाठी कॅनडालाही नेलं होतं. 

कपिल आणि गिन्नीचं लग्न मागच्या वर्षी 12 डिसेंबर 2018 ला जलंधरमध्ये झालं होतं. त्यानंतर या सेलिब्रिटी कपलने दिल्ली आणि मुंबईत ग्रँड रिसेप्शन दिलं होतं. ज्याला बॉलीवूड आणि टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटीजनी उपस्थिती लावली होती. 

कॉलेजपासून होती कपिल आणि गिन्नीची जोडी

Instagram

कपिल आणि गिन्नी एकमेंकाना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतात. आधी या दोघांच्या लग्नाला घरच्यांकडून संमती नव्हती. पण नंतर त्यांनी होकार दिला. 2017 मध्ये जेव्हा कपिलचा वाईट काळ सुरू होता तेव्हा गिन्नीनेच त्याची साथ दिली.

कपिल घेत होता गिन्नीची काळजी

काही दिवसांपूर्वी जेव्हा एका मुलाखतीत कपिलला विचारण्यात आलं की, होणाऱ्या बाळासाठी कपिलची तयार सुरू आहे का, तेव्हा कपिलने सांगितलं होतं की, ‘मी काय तयारी करणार…मला काहीच आयडिया नाही याबाबत. पण संपूर्ण कुटुंब यासाठी उत्सुक आहे. आम्ही सगळेच नव्या सदस्याला येणार म्हणून खूप उत्सुक आहोत. मुलगा असो वा मुलगी आम्हाला फक्त बाळ हेल्दी असावं असं वाटतं. तयारीबाबत सांगायचं झालं तर गिन्नी आणि मी काही गोष्टींची खरेदी केली असून आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पण आत्ताची खरेदी आम्ही मुलगा किंवा मुलगी या हिशोबाने केलेली नाही. बाळाच्या उपयोगी पडेल अशा गोष्टी आम्ही आणल्या आहेत.

#POPxoMarathi कडून कपिल आणि गिन्नीला खूप खूप शुभेच्छा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

 

हेही वाचा –

Good News: अर्जुन रामपाल पुन्हा होणार बाबा

Good News : अनुष्का – विराटच्या घरी येणार नवा पाहुणा

 

Read More From बॉलीवूड